गोडाचे लिंबू लोणचे (Sweet Lemon/Lime Pickle)
Sweet Lemon Pickle
चटण्या-लोणची प्रकरणे माझ्या फारशी आवडीची नाहीत. अलीकडे मैत्रीणीला हवे होते म्हणुन केले थोडे आणि विचार केला लिहुन ठेवावी पाककृती.
७ रसरशीत पिवळी लिंबे
३/४ कप साखर
१/२ चमचा लाल तिखट
३ टेबल्स्पून मीठ
कृती - सर्व लिंबे धुवुन स्वच्छ कोरडी करुन घ्यावीत. ५ लिंबांच्या, एका लिंबाच्या साधारण ८-१० अशा प्रमाणात फोडी कराव्यात. २ लिंबाचा रस काढुन घ्यावा. एका जाडबुडाच्या स्टीलच्या पातेल्यात लिंबाच्या फोडी, साखर, मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस असे एकत्र करुन नीट हलवून साधारण अर्धा एक तास तसेच ठेवून द्यावे. तासाभरानंतर पातेले गॅसवर ठेवुन मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. साखर विरघळून पाकाला एक उकळी आली की पातेले उचलून बाजुला ठेवावे. झाकण झाकू नये. पूर्णपणे थंड झाल्यावर बाटलीत भरुन ठेवावे. रस लगेच खाता येतो. पण फोडी मुरायला साधारण ५-६ दिवस लागतात.
टीप -
१. अमेरीकेमध्ये मेयर लेमन नावाची खुप रसदार आणि केशरट लिंबू मिळतात त्याचे लोणाचे अप्रतीम होते.
२. हिरवे लिंबाचे लोणचे पण चांगले लागते पण मुरायला थोडा वेळ लागतो.
श्रावणात केळीच्या पानावर भोजन व त्यात गोडाचे लिंबु लोणचे ! अहाहा . केव्हा बरे येणार श्रावण ?
ReplyDeleteमी पण लोणच्यांची फार फॅन नाही, पण कधीतरी मेथीच्या थेपल्यांबरोबर किंवा थालीपीठाबरोबर खायला बरं वाटतं. ह्या प्रकारात जास्त कष्ट नाहीयेत त्यामुळे थोडं करून पहायला हरकत नाही :)
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteकाल करून पहिलं. Few things I learnt the hard way:
ReplyDeleteफार उकळू नये. या कॄतीत सांगितल्याप्रमाणे पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. मी जरा जास्त उकळलं तर लिंबाची साल कडक झाली, शिवाय सालीचा कडवटपणा पाकात उतरलाय! :( रंगही काळा पडलाय. मुरल्यावर जऽऽरा बरं लागेल अशी आशा ठेवून आहे. मी हिरव्या सालीची लिंबं वापरली होती (US मध्ये मिळणारी Persian Limes). त्यांची साल जास्तच कडवट असते. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.
आज परत पिवळ्या सालीच्या लिंबाचं करून पाहिलं. ते छान झालं. त्याची साल जरा जाड असली तरी लोणचं चांगलं होतं.पहिल्यांदा करताना शक्यतो पिवळ्या सालीच्या लिंबाचंच केलेलं बरं! :D छोट्या छोट्या फोडी कराव्यात. मी दुसऱ्यांदा करताना एका लिंबाच्या १६ फोडी केल्यात. सुरेख झालंय!