खानदेशी कढी
(Link to English Recipe)
कढी म्हणजे किती प्रकार होतात ना आपली नेहेमीची आले-लसूण-मिरची वाटून लावलेली कधीतरी खोबरे घातलेली. पंजाबी कढी म्हणजे मस्तपैकी पकोडे तळून घातलेली. गुजराती कढी म्हणजे थोडी गोडसर आणि लसूण वगैरे न घालता दालचिनी, लवंगा घालून केलेली. तामिळनाडूमधे केलेली कढी म्हणजे तूरडाळ-तांदूळ-धने वाटून लावून केलेली. कर्नाटकातली कढी साधारण महाराष्ट्रातल्या सारखीच पण कधी पडवळ तर कधी भेंडी घालून केलेली!
यात आता अजून एक कढीचा प्रकार म्हणजे खानदेशी कढी. आता खानदेश आहे महाराष्ट्रात पण त्यांची कढी करायची पद्धत आहे थोडीशी वेगळी. लसूण-मिरची-आले एकत्र करून तो गोळा घट्ट तुपात मिसळतात. हा तूप-मसाल्याचा गोळा तयार होता तो, थोडे दगडफूल आणि कढीपत्ता असे सगळे एका वाटीत घेतात. लहान कोळश्याचा तुकडा लाल होईपर्यंत फुलवतात. आणि लाल फुललेल्या कोळश्याच्या निखाऱ्यावर तूप-मसाल्याचे मिश्रण घालून त्याची फोडणी करतात. आणि हे सगळे केले जाते मातीच्या मडक्यात! कोळसा, मडके, दगडफूल या सगळ्याची एकत्र चव जी काय लागते ती एकदम कमाल असते.
ही कढी बरेचदा फुनके किंवा वाफोल्यांबरोबर केली जाते. खानदेशातला हा एक माझा आवडता प्रकार आहे. पहिल्यांदा कढी कशी करायची ते पाहू आणि वाफोले पुढच्या पोस्ट मध्ये देईन.
कढीचे साहित्य -
१ कप दही (शक्यतो आंबट)
३-४ टेस्पून बेसन
१-२ टीस्पून साखर
चवीप्रमाणे मीठ
मुठभर चिरलेली कोथिंबीर
४-५ कप पाणी लागेल तसे
वाटण -
२ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी जास्त कराव्यात)
१ इंच आले
३-४ लसूण पाकळ्या
फोडणीसाठी -
८-९ पाने कढीपत्त्याची
४-५ दगडफूल
२ टेस्पून तूप
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जिरे
कृती -
दह्याचे पाणी घालत टाक करून घ्यावे. सगळे पाणी एकदम न घालता थोडे थोडे घालावे. ताक खूप पातळ किंवा घट्ट नसावे. ताकात बेसन घालून सगळ्या गुठळ्या काढाव्यात. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी. मंद आचेवर कढी करायला ठेवावी. सतत हलवत रहावे, आच मोठी करू नये त्याने कढी फुटायची शक्यता असते.
दरम्यान, हिरव्या मिरच्या, लसूण आणि आले एकत्र करून गोळा वाटून घ्यावा. वाटण करताना पाणी न घालता करावा, अगदी बारीक वाटले नाही तरी चालेल.
एका वाटीत तुपाचा गोळा आणि वाटणाचा गोळा एकत्र करावा. त्यातच जिरे, मोहरी, कढीपत्ता, आणि दगडफूल एकत्र करून बाजूला ठेवावे.
कढी उकळत आली की एका लहान कढई किंवा कढले तापायला ठेवावे. त्यात तूप-वाटणाचा गोळा घालावा, तूप पातळ होऊन तापते, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि दगडफूल घालावे. मोहरी तडतडली आणि लसूण आले खमंग भाजले की फोडणी उकळत्या काढीत ओतावी. अजून एखादी उकळी आली की गॅस बंद करावा.
ही गरम कधी साध्या खिचडीबरोबर, फुनक्यांबरोबर अप्रतीम लागते.
टीपा -

- दही अंबट नसेल तर साखर कमी घालावी.
- तूप-वाटणाचा गोळा न करता तुपाची नेहेमीप्रमाणे फोडणी करून त्यात मिरची-लसूण-आल्याचा गोळा खमंग भाजून ती फोडणी उकळत्या कढीत ओतली तरी चालते.
- कोळसा, मातीचे मडके असेल तर, पातेल्यात कढी उकळून घ्यायची, मडक्यात तापलेला कोळसा ठेवायचा त्यावर मसाला-तूप, फोडणीचे साहित्य घालून खमंग भाजाले की त्यावर उकळलेली कढी ओतायची.
Chaan aahe. DagaDful aaNale ki karato :-)
ReplyDeleteThank you Abhijit! kelyavar avaDali ka te sang!
DeleteLoved ur recipe for the kadhi. Tondala paani sutlay ekdum zhakkas kadhi aahe.....bookmark keli....
ReplyDeleteThank you Nayana. I hope you will like it.
DeleteWow vachun agdi tondala pani sutle bagh! Kai masta, pun hya sathi Gavi java lagel, madka, kolsa...khandeshi padartha barech vegle aahet nahi. vafole mahit aahet pun phunke Kai astat ga?
ReplyDeleteThank you Anjali. maDakyat karun bagh, tula nakki avadel. Khandeshi padarth apalya nehemichya marathi padarthanpeksha barech vegaLe asatat.
DeleteVafole mhaNajech Funake, DaLiche banavatat. Dein recipe lavakarach.