॥ श्री अन्नपूर्णा प्रसन्न ॥
मला स्वयंपाकाची आवड साधरण ११-१२ वी मधे असताना लागली. त्याआधी घरी स्वयंपाकाला व्यवस्थीत मदत करत होतेच पण आवड अशी नव्हती. सुट्टीमधे कोल्हापुरला रहायला गेले तेव्हा सरुताई स्वयंपाक आवडीने करयची आणि मी अगदी तिच्याचसारखे वागायचा प्रयत्न करायचे आणि स्वयंपाकाची आवड हा त्यातलाच भाग होता. तिच्याबरोबर मी पहिला पदार्थ करायला शिकले तो म्हणजे पावभाजी. कर्मधर्मसंयोगाने ती आवड अजुन टिकुन आहे आणि काही प्रमाणात वाढीसही लागलेली आहे.
आज गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन blog चालु करतेय, पूर्णपणे स्वयंपाकाला वाहीलेला.
आज गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन blog चालु करतेय, पूर्णपणे स्वयंपाकाला वाहीलेला.
वा! स्तुत्य उपक्रम! :) चांगल्या मुहूर्तावर सुरू केलास. माझी रोजचा स्वयंपाक करता करताच दमछाक होते, त्यामुळे तुझ्यासारख्या हौशी ’अन्नपूर्णां’चं भयंकर कौतुक वाटतं. चला आता या ब्लॉगवरून तुला कुठले कुठले रुचकर पदार्थ करता येतात ते मला कळेल आणि मग तुझ्याकडे आल्यावर फर्माईश करता येईल! :p
ReplyDelete