आमटी (Amati)
Here is english version of the recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/turdaal-amati.html
Amti
ही साधीच तुरीची आमटी पण आज्जीच्या ५०-५५ वर्षांच्या अनुभवाची जोड असलेली...
१ वाटी तुरीची डाळ - कुकरमधे मऊ शिजवलेली
१ लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन.
१ छोटा खडा गुळ,
चवीप्रमाणे मीठ, कांदा-लसुण मसाला,
२ मध्यम लसूण पाकळ्या, थोडे ओले खोबरे , कोथिंबीर - बारीक कुटुन,
तेल आणि फोडणीचे सामान
कृती -
तेल तापवून नेहेमीप्रमाणे फोडणी करायची. फोडणी छान तडतडली म्हणजे त्यात चिंचेचा कोळ घालायचा. त्यात कांदा-लसुण मसाला, लसुण-खोब~याचा गोळा, गुळ घालुन १ वाटीभर पाणी घालायचे. आता हा कोळ साधारण मध्यम आचेवर झाकुन ५ मिनीटे छान उकळू द्यावा. त्यात आता मीठ घालुन परत २-३ मिनीटे उकळावे. गॅस बारीक करुन शिजवलेली डाळ घोटुन घालावी. गॅस मध्यम करुन झाकण न लावता आमटी ५-६ मिनीटे उकळू द्यावी.
गरम भाताबरोबर अप्रतीम लागते.
टीप - कांदा लसुण मसाला नसेल तर प्रमाणात गोडा मसाला आणि लाल तिखट वापरले तरी छान लागते.

हं... मी आणि बहीण या आमटीला ’चिंगु’ म्हणजे चिंच-गुळाची आमटी म्हणायचो! :D माझी आवडती आमटी! याच आमटीत वरणफळं पण चांगली लागतात. आई कधी कधी चिंचेऐवजी आमसूल वापरायची, तोही छान लागतो.
ReplyDeleteएक राहिलंच, या आमटीत शेवग्याच्या शेंगा पण चांगल्या लागतात. थोडं मीठ घालून वेगळ्या शिजवायच्या आणि डाळीबरोबरच आमटीत घालायच्या. नेहमीच मसाला वाटून वगैरे शेवग्याची आमटी करायला वेळ आणि उत्साह असतोच असं नाही. मग अशी शेवग्याची आमटीही छान होते.
ReplyDeletepuran-poli sobat khaatat ti aamati kashi kartaat ???
ReplyDelete