भरली वांगी (Stuffed Eggplant)

Bharali Vangi



कृष्णाकाठच्या वांग्याना एक वेगळीच चव असते. कराड, सातारा भागात जांभळी वांगी तर कोल्हापुर, सांगली भागात जांभळ्याबरोबर हिरवी/पांढरी वांगी आवडीने खाल्ली जातात.

४-५ लहान कमी बियांची वांगी
१/२ लाल कांदा (कांदा लालच वापरावा)
१ मुठभर भाजलेल्या दाण्याचे कुट,
साधारण तेवढ्याच भाजलेल्या तीळाचे कुट,
१-२ लहान चमचे कोरडे खोबरे भाजुन त्याचे कुट
कांदा-लसुण मसाला, मीठ, गुळ, गरम मसाला चवीप्रमाणे
२ लसुण पाकळ्या बारीक करुन
मुठभर कोथींबीर बारीक चिरुन
थोडी चिंच पाण्यात कोळून

कृती -
चिंच पाण्यात कोळुन घेउन ते पाणी बाजुला ठेवावे. कांदा एकदम बारीक कापुन घ्यावा. आता दाणे, तीळ, खोब~याचे कुट, मसाला, मीठ, गुळ, लसुण, कोथींबीर कांद्यावर घालावे. एक लहान चमचा तेल त्या मिश्रणात घालावे व मिश्रण नीट एकजीव करावे. आता वांग्यांचे देठ चांगले असतील तर अर्धे करावेत आणि हिरवा भाग थोडा कमी करावा. वांगी भरुन करण्यासाठी कापतो तशी ४ भाग करुन कापुन मीठाच्या पाण्यात घालावीत. एकेका वांग्यात मसाला ठासुन भरुन ती बाजुला ठेवावीत. राहीलेला मसाला पण बाजुला ठेवावा.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापायला ठेवुन मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यात भरलेली वांगी शेजारी शेजारी ठेवावीत (शक्यतो वांगी शेजारीच मावतील असे पातेले निवडावे). राहीलेला मसाला त्यावर पसरावा. हलक्या हाताने, मंद गॅसवर वांगी थोडावेळ हलक्या हाताने परतावी. आता त्यावर चिंचेचा कोळ आणि थोडे पाणि घालुन गॅस बारीक करुन शिजायला ठेवावे. साधारण ७-८ मिनीटानी वांगी हलक्या हाताने उलटावीत. लागणार असेल तर थोडे पाणी घालुन दुस~या बाजुने ५-६ मिनीटे शिजु द्यावीत.

ज्वारीच्या अगर तांदळाच्या गरम भाकरीबरोबर ही भाजी झक्कस लागते.

टीप - कांदा आवडत नसेल तर घातला नाहीतर चालतो पण मग कुटांचे प्रमाण वाढवावे लागेल. ही भाजी थोडी रसदार होते. एकदम कोरडी करायची असेल तर मात्र भरपुर तेलाची फोडणी घालुन मंद आचेवर झाकणात पाणी ठेवुन शिजवावी लागेल.

Comments

  1. व्वा ..झकास !
    अजुन कोल्हापुर-सांगली-कराड स्पेशल पाककृती येवु देत.
    फोटो पण टाकता आले तर बघ.

    ReplyDelete
  2. I agree with Prasad Deshmukh. We need assal Maharashtrian Dishes. I really congragulate the blogger who started this blog.

    ReplyDelete
  3. आमची पण भाजी पहा.http://abhijitn.blogspot.com/2008/08/blog-post.html

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts