वांग्याचे भरीत (Khandeshi Bharit)

खानदेशी भरीत करताना केलेले हे फोटोफिचर पहा. यावरुन संपूर्ण तयारीची कल्पना येईल. 

Khandeshi Bharit


१ मोठे वांगे भरीत करण्यासाठी भाजुन घेतो तसे भाजुन घ्यावे
३-४ लसुण पाकळ्या
३-४ हिरव्या मिरच्या
१ वाटी चिरलेली कांद्याची पात
१/२ वाटी चिरलेली कोथींबीर
मीठ चवीप्रमाणे
मुठभर कच्चे शेंगदाणे
सुक्या खोब~याचे काप मुठ्भर
फोडणीसाठी तेल (नेहेमीपेक्षा थोडे जास्त)
फोडणीचे साहित्य.

कृती - भाजलेल्या वांग्याची साल काढून टाकुन गर बाजुला ठेवावा. लसुण आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यात बारीक करुन घ्याव्यात. लसुण-मिरची बारीक झाल्यावर त्यात वांग्याचा गर घालुन एकजीव करुन घ्यावा. आता कढईमधे तेल तापायला ठेवुन त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी. त्यात शेंगदाणे आणि खोबरे घालुन परतावे. खोबरे सोनेरी रंगावर भाजले गेले की त्यात कांद्याची पात घालुन २-३ मिनीटे परतावे. त्यावर वांग्याचा गर, मीठ टाकुन व्यवस्थीत परतुन घ्यावे. वरुन कोथींबीर घालुन २-३ मिनीटे परतुन घ्यावे.

टीप - हे भरीत खानदेशी पद्धतीचे आहे. व्यवस्थीत तिखट असते त्यामुळे आवडत असेल तर मिरच्या वाधवायला हरकत नाही. त्यात मसाला वगैरे कही घालत नाहीत. भाकरी, पुरी, चपाती कशाहीबरोबर अप्रतीम लागते.

Comments

  1. chan aahe recipe...khandeshi style aahe ekdam
    Mee Dhulyachi aahe, tu Karad-Sangli kadhich aahes tari hee recipe mahitey te baghun chan watal!
    tujhe dusare blogs hi nukatech pahile...aavdal mala tujh lihan
    lihit raha :)

    ReplyDelete
  2. tujhaa blog chaane.. padaarth hee khupch chaan vishehstaa miracheeche sup..
    yaa khaanadeshii padaarthaat.. ek chuk vaatali tee sangaveeshi vatali.. karn mi jalgaon chee yaat jeere moharee aani hingaacvhi fodani det naahit..!!!

    ReplyDelete
  3. अरे वा! मस्त एकदम......
    तोंडाला पाणी सुटलं.......

    टीप तर एकदम योग्य...... साधारण मध्यम तिखट करावे भरीत. जर का खाणारा खांदेशचा असेल आणि करणारा इतर ठिकाणचा असेल तर आणखी एक टीप टाकून द्या..... की काही ठिकाणी भरतात टमाटे टाकतात. परंतु खांदेशी माणसासाठी बनवताना चुकुनही त्यात टमाटे टाकू नये .... अगदी फुकट मिळाली तरी..... नाहीतर बिचारा खाणारा तुमच्या नावाने बोंब मारेल.

    त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट म्हणजे जी वांगी खांदेशच्या तापी खोर्‍यात व आसपासच्या परिसरात होतात तशी चव इतर ठिकाणच्या वांग्याना असत नाही. याचीही कल्पना देऊन ठेवावी खाणार्‍याला. अर्थात जे मिळेल ते गोड (किंवा चविष्ट) मानून घेणे.

    ReplyDelete
  4. लिखाणाबद्दल एक दुरुस्ती:
    ‘खोब~याचे’ मधे ‘~य’ चुकीचा लिहिलेला आहे. तेथे ‘र्‍य’ असे लिहावे.
    अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी पहा : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1

    ReplyDelete
  5. Prashant, I would like to differ about Khandesh vangi. I am from Krushna Khore and brinjals we get are the best ;) can beat that.

    ‘खोब~याचे’ मधे ‘~य’ चुकीचा लिहिलेला आहे. तेथे ‘र्‍य’ असे लिहावे. >> thank you for your suggestion but that post is 2 years old and that time it was not possible to write correctly back then.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. But I am talking about the 'UNIQUE' taste.
    I know we can argue endlessly when it comes to the 'best'..... so let's not do that.

    Anyway, I do invite you to try the khandeshi bhareet, produced in khandesh as well, whenever you get a chance.

    thank you anyway. But if the post is old one, then how come this post is showing up as new post in my RSS reader?

    ReplyDelete
  8. Anyway, I do invite you to try the khandeshi bhareet, produced in khandesh as well, whenever you get a chance. >> I have eaten it plenty of times made in khandesh and made by khandeshis.

    And the marathi post is old. I just translated it in English for a friend. That has the link. Not sure why it is coming as a new feed for you.

    ReplyDelete
  9. oh plz aaplya khandeshi khichadichi
    (dal tandulachi khichdi ....sabudana nahi) recipi pan dya na mala aashi lihun 1st class plz aaho ............aagdi hakkane magatoy mhanun sorry bar ka aaho ...aani manapasun thanks tumhala kharach bhari kaam aahe tumche aagdi aaplya khandeshchi sugaran aahat tumhi aagdi ......ek ek recipi chan aaste aagdi ....Ramkrishna,UK

    ReplyDelete
  10. Ramkrishna - Thanks! and I will try to put that recipe :)

    ReplyDelete
  11. खान्देशी भरीत एकदमच छान आहे ,पुण्यात अस्सल खान्देशी भरीताची चव हवी असेल तर एकच
    ठिकाण होटेल संगम (पुर्णतः खान्देशी) ४०८, नारायण पेठ, पुणे .३०. झक्कास खान्देशी चव

    ReplyDelete
  12. Made this recipe yesterday. Came out really good.
    (Don't know how to type in devanagari marathi so typing in english)

    My aunt lives in chincholi near yaval and we used to get vangi from them. Quite a classic.

    Where are you based and what type of eggplants do you buy for making bharit?

    ReplyDelete
  13. Saurabh, I am currently in US and I buy the big Italian Eggplant.

    ReplyDelete
  14. अगदी "ब्रह्मानंद" पाककृती!
    बडगी मुंबईत मिळेल काय?

    ReplyDelete
  15. Nimbhoryache bina biyanchye bharit khai paha mang sanga
    Jyoti Bonde

    ReplyDelete
  16. Kyaaa baat hai !! Aaahaa..mala khandeshi style vangyache bharit khup aavdate..Aaichya kahi khandeshi maitrininkadun hi recipy khayla milali hoti pan aata ithe recipe milalyamule gharihi karta yeil..chhan aahe tumcha blog.

    Harshada

    ReplyDelete
  17. मी खान्देशातील भरतात हिंग न टाकता चिमूट भर (1 किलो वांगांसाठी),मटर दाणे 1 किलोला 1 मूठ टाकावे. टमाटर, हिंग टाकू नये. वांगे गर mixtur मध्ये एकजीव व न करता पातेल्यात घेवून भाजी वाढणेच मोठा खोलगट चमचा ने ठेचून एकजीव करावा

    ReplyDelete
  18. वीकेन्डला इथल्या काही भारतीय फ्रेन्ड्सना जेवायला बोलावलं होतं. सगळेच अमराठी आहेत. जरा वेगळा प्रकार होइल म्हणून या पद्धतीनं भरीत केलं होतं. वांगी लोकल दुकानातलीच वापरली बाकी कृती तंतोतंत हीच. फार आवडलं सर्वांना.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts