पावभाजी (Pav Bhaji)
२ बटाटे साल काढलेले
१ मध्यम कांदा
१ टोमॅटो
१ मध्यम ढबु मिरची
साधारण पाव किलो cauliflower
१ गाजर
वरील सगळ्या भाज्या मोठे मोठे (२-२ इंचाचे) तुकडे करुन कुकर मधे १ शिट्टी करुन शिजवुन घ्याव्यात. शिजवताना पाणी सुटेल ते बाजुला काढुन ठेवुन भाज्या पोटॅटो मॅशरने ठेचुन साधरण लगदा करुन घ्यावा.
१ मोठा कांदा (शक्यतो लाल)अगदी बारीक चिरुन
२ मध्यम टोमॅटो बारीक चिरुन
१ मोठी वाटी मटार मायक्रोवेव मधे बोटचेपे शिजवुन
१ इंच आले खिसुन
२-३ चमचे बादशहाचा पावभाजी मसाला
१-२ चमचे धणेपावडर
मीठ चवीप्रमाणे
तिखट - चवीप्रमाणे
३-४ टेबलस्पून तेल
जिरे, मोहरी, हळद
मध्यम आकाराच्या कढईत तेल तापवुन त्यात जिरे, मोहरी, हळद घालुन फ़ोडणी घालावी. त्यावर कांदा परतावा. कांदा नीट गुलबट रंगावर परतावा. त्यात टोमॅटो घालुन परातायला घ्यावे. परतताना त्यात मीठ, पावभाजी मसाला, धणे पावडर, खिसलेले आले घालावे. आता हे सर्व मिश्रण तेल सुटेपर्यंत परतावे. त्यावर शिजवलेले मटार दाणे घालुन परतावे. १-२ मि. परतल्यावर पोटॅटो मॅशरने ते ठेचुन घ्यावेत. त्यावर बकिच्या भाज्यांचे मिश्रण घालुन व्यवस्थीत मिसळावे. भाजी खुप घट्ट होत असेल तर भाज्यांचे शिजवलेले पाणी घालावे. चविप्रमाणे तिखट मीठ घालावे.
वरुन कोथिंबीर घालावी.
पावभाजीचे पाव गरम करताना तेल किंवा तुपावर भाजावेत.
टीप -
१. भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करावे.
२. मायक्रोवेव नसेल तर मटार चळणीवर वाफ़वुन घेता येतात किंवा फोडणीमधे बोटचेपे शिजवले तरी चालतात.
३. के. प्र. पावभाजी मसाला अतीशय छान आहे मिळत असेल तर तोच वापरावा.
४. गाड्यावरची पावभाजी भरपुर बटर मधे केलेली असते पण मला बटरची चव खुप अवडत नसल्याने मी बटर कधीही वापरत नाही.
५. भाजी खुप प्रमाणात केल्यास पाव पण खुप भाजावे लागतात त्यासाठी तेल किंवा बटर लावुन १५० डीग्री फॅरेनहाईट वर ओव्हन गरम करुन त्यात ५ ते ७ मिनीटे ठेवावे.
६. वरुन घालायचा कांदा कच्चा आवडत नसेल तर किंचीत तेलावर परतुन त्यावर खोडेसे मीठ आणि पाव्भाजी मसाला भुरभुरावा.

पण हॉटेल च्या पाव भाजी सारखा रंग येत नाही.
ReplyDeleteत्यासाठी काय करावे?
तंदूर कलर कसा वापरतात? त्याचे काही साईड इफ़ेक्ट्स आहेत का?
अश्विनी
Add two tea spoons of red Hungarian Red paprika and you will get the red color. It is also necessary to continuously grind and cook all the vegetables together. I use my own recipe for Pav Bhaji Masala. In my opinion EVEREST Pav Bhaji Masala is a good one. ..............from DIXIT KItchen
Deleteअश्विनी, मला वाटते हॉटेलमधे बटाटा आणि टोमॅटोचे प्रमाण अधिक असते बाकी भाज्या नावापुरत्या असतात. त्यामुळे त्या भाजीचा रंग लालसर येत असावा. मी कधी रंग घालुन भाजी करुन पाहीली नाही पण खात्रीशीर रंग मिळणार असतील तर इम्रुतीचा रंग थोडासा वापसुन पहायला हरकत नाही.
ReplyDeleteमी ढबु मिरची वापरताना लाल रंगाची वापरते त्यामुळे मग तो लाल रंग छानच दिसतो.