ओटब्रानचा उपमा (Oat Bran Upma)

Here is link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/02/oat-bran-upma.html

Oat Bran Upma
१.५ कप ओट ब्रान
३.५ कप पाणी
१ लहान कांदा बारीक चिरुन
०.५ वाटी मटारदाणे
२-३ हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करुन
चवीप्रमाणे मीठ
२ लहान चमचे तेल
१ लहान चमचा तुप
उपम्यासाठी लागणारे फोडणिचे साहित्य, कोथींबीर, ओले खोबरे, अर्ध्या लिंबाचा रस.

कृती -
तेल तापवुन फोडणी करुन घ्यावी. हिरव्या मिरच्या आणि कांदा व्यवस्थीत सोनेरी रंगावर भाजुन घ्यावा. त्यात मटार दाणे घालुन ३-४ मिनीटे परतावे. त्यात १ चमचा तुप घालुन १-२ मिनीटे परतावे. आता त्यावर पाणी घालुन मीठ, लिंबाचा रस, कोथींबीर, ओले खोबरे घालुन झाकुन एक उकळी आणावी. त्यावर गॅस बारीक करुन ओटब्रान त्यात हळुहळु घालुन गुठळी न होऊ देता मिक्स करुन घ्यावे. भांड्यावर झाकण ठेवुन ५ मिनीटे ठेवावे. चमच्याने व्यवस्थीत मिक्स करुन गॅस बंद करावा. वरुन लिंबु, ओले खोबरे, कोथींबीर घालुन वाढावे.

टीप - नेहेमीच्या उपम्यात घालतो तशी उडदडाळ, हरभराडाळ फ़ोडणीत छान लागते. साध्या रव्यापेक्षा ओटब्रान मधे fiber आणि protein जास्ती असल्याने हा प्रकार जास्त healthy होतो.

Comments

  1. hi,
    Tuzi site chhan aahe. Bharapur recipes milalya. Mala oat bran cha upama try karayacha hota pan Oat bran kai ahae? flour aahe ka? ani kuthe milel te? Mi california madhye aahe, Tyamule ekhadya grocery store la milel ka? Like Safeway kinva Ralph?
    Please let me know ,
    Thank you.
    Goduli

    ReplyDelete
  2. OatBran mhanaje Oat hya dhanyacha konda asato. mala Trader Joes madhe miLala. Whole Foods madhe miLaayala pan harakt nahi.

    ReplyDelete
  3. तुझा हा healthy उपमा आमच्याकडे जाम popular झालाय. मी आता साधा रव्याचा उपमा करणं कित्येक महिने झाले, बंद केलंय! माझ्याकडे खाऊन आणिक एक-दोघीजणी शिकल्यात हा उपमा - and all of them are thanking you! :)

    ReplyDelete
  4. एक हेल्थी रेसिपि.. नक्कीच ट्राय करून पाहेन..

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts