बटाटेवडे (Batata Vada)
कराडमधे दिवेकर बेकरी नावाची एक बेकरी आहे. मुळ ठिकाणाहुन आता ती दुसरीकडे हलवली गेलीय. त्यामुळे त्या दुकानात जाणे तितकेसे जाणे होत नाही. तसे नवीन ठिकाणही जुन्या दुकानापासुन खुप काही लांब आहे असे अज्जीबात नाहीये. पण जाणे होत नाही हेच खरे. आता त्यांची आठवण येण्याचे कारण काय असे डोक्यात येणे अगदीच साहजीक आहे. तर मला आठवतात त्यांचे बटाटेवडे. बाहेर जाउन काही खाणे ही त्याकाळात चैन होती आणि फ़ारसे प्रसिद्ध नव्ह्ते त्याकाळातली ही गोष्ट आहे :). एकदा पप्पा सहज सांगत आले घरी की आज लायब्ररीमधे कुणीतरी कार्यक्रमाला दिवेकरांचे बटाटेवडे आणलेले. मग असेच कधितरी मम्मी मंडईतुन येताना ते घेउन घरी आली. प्रचंड मोठा होता एकेक वडा आणि तिखट पण.
पुढे कधीतरी स्वयंपाक करायची गोडी लागल्यावर मम्मीकडुन रीतसर बटाटावडा शिकले. आणि मग त्यात माझ्या आवडीनुसार बदल करत गेले. मी करते तो बटाटेवडा खालीलप्रमाणे -
सारण -
४ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन घ्यावेत.
१ मोठा लाल कांदा बारीक चिरुन
३-४ हिरव्या मिरच्या (चवीनुसार कमीजास्त कराव्यात)
३-४ लसुण पाकळ्या
२ मुठी चिरलेली कोथिंबीर
१ लहान तुकडा आले
चवीप्रमाणे मीठ
५-६ पाने कढीपत्ता
२-३ टेबल्स्पून फोडणीसाठी तेल
जिरे, मोहरी, हिंग, हळद - फोडणीसाठी
कृती - आले, लसुण, मिरची आणि मीठ एकत्र वाटुन घ्यावे. खुप बारीक करु नये आणी फ़ार ओबड्धोबडही नसावे. बटाटे कुस्करुन ठेवावेत. फोडणीचे तेल कढईत तापायला ठेवावे. कढिपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळ्द घालुन तडतडल्यावर त्यात कांदा घालावा. कांदा साधारण परतत आला की त्यात हिरव्या मिरचीचे वाटण घालुन नीट परतुन घ्यावे. त्यात कुस्करलेला बटाटा घालावा. सारण नीट एकत्र करुन त्यावर झाकण ठेवावे. ५ मिनीटे मंद गॅसवर वाफ़ येउ द्यावी. त्यानंतर सारणात कोथिंबीर घालुन सारण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर साधारण टेबलटेनीसच्या बॉलईतके गोळे करावेत. साधारण १२ गोळे होतील.
आवरण -
१ कप बेसन
२-३ टेबलस्पून तांदुळपीठ
लाल तिखट, मीठ - चवीप्रमाणे
हळद
चिरलेली कोथिंबीर
चिमुटभर ओव्याची भरडपूड
पाणी लागेल तसे
२-३ टेबल्स्पून कडकडीत तापवलेले तेल
कृती - बेसन, तांदुळाचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओव्याची पुड, कोथिंबीर एकत्र करावे. त्यात लागेल तसे पाणी घालत थलथलीत भिजवावे. बोटाने पीठ उचलले तर पट्कन भांड्यात पडणार नाही असे असावे. साधारण डोस्याच्या पिठासारखे सरसरीत असावे. त्यात तापवलेले तेल घालुन नीट मिसळुन घ्यावे.
बटाटावडा -
तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. सारणाचा एक एक गोळा आवरणाच्या पीठात बुडवुन तापलेल्या तेलात सोडावा. दोन्ही बाजुने नीट तळुन घ्यावा.
लसणीची चटणी, खोब~याची हिरवी चटणी या बरोबर गरम गरम खायला द्यावा.
टीप -
१. बटाटावड्याच्या आवरणात खायचा सोडा अज्जीबात घालु नये. तसा वडा खुप तेल शोषुन घेतो.
२. मसाला डोसासाठी भाजी कराताना वरील पद्धतीनेच करावी म्हणजे राहीलेल्या भाजीचे वडे करुन पहाता येतील :)

हे वाचल्यावर आत्ताच बटाटे वडे खावेसे वाटतात. कर्जतला ही दिवेकरचे वडॆ प्रसिद्ध होते.
ReplyDeleteआपण सांबाराबरोबर वडॆ खाल्ले आहेत काय ?
बेसना मध्ये सोडा टाकायचा असल्यास, चमच्या मधे सोडा घ्यावा व त्यावर गरम मोहन टाकणे त्या मुळे वडे तेलकट होनार नाही.
ReplyDeleteपहिल्याच झटक्यात जमले मला बटाटेवडे. खूप छान वाटलं. बर्याच दिवसांनी खायला मिळाले.
ReplyDeleteचवीला छान झाले होते पण आवरण पातळ झालं होतं.माझ्याकडे सोडा नव्हता.
रेसिपी बद्दल थॅंक्यू.
Harekrishnji - Karjat che diwadkarche na? ho sambar vada khallay :)
ReplyDeleteDipali - will try that.
Abhijit - Thank you. use little less water next time.