डाळ कांदा (Daal Kanda)
Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2010/10/daal-kanda.html
हा एक पदार्थ सातारा भागात जास्त केला असे वाटते कारण माझ्या ब~याच मैत्रीणीना हा पदार्थ माहीती नव्हता! ऐनवेळी भाजी शिल्लक नसेल, अचानक पाहुणे आले तर करण्यासाठी झट्पट भाजी आहे ही. तुरडाळ, मसूरडाळ आणि मूगडाळ यांचा डाळ्कांदा केला जातो.
Picture of Masoor Daal
Masoor Daal Kanda
साहित्य -
१ वाटी तुरडाळ
१ मोठा कांदा
कांदा लसुण मसाला, मीठ - चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल आणि इतर साहित्य
कृती -
तुरडाळ धुवुन अगदी कमी पाणी घालुन कमी शिट्य्या करुन शिजवुन घ्यावी. फ़क्त अर्धवट शिजली पाहीजे. एकदम मऊ शिजता कामा नये. कांदा मोठा चिरुन घ्यावा आणि तेलाची फोडणी करुन त्यात परतावा. सोनेरी रंगावर परतला गेला की त्यावर डाळ, कांदा लसुण मसाला, मीठ घालावे. डाळ खुपच कच्ची असेल तर पाण्याचा हबका मारुन मारुन बोटचेपी शिजवावी. नेहेमीप्रमाणे पाणी ओतुन शिजवु नये. असेल तर वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी.
टीप -
१. मसुरडाळ, मूगडाळ पटकन शिजते त्यामुळे ह्या डाळी वेगळ्या न शिजवता २०-२५ मिनीटे भिजवुन फोडणीला टाकाव्यात. बाकीची पद्धत वरीलप्रमाणेच.
२. कांदा-लसूण मसाला नसेल तर लाल तिखट, काळा मसाला असे एकत्र घातले तरी चालु शकते.

नादच नाय. इतकी सोपी आणि सुंदर पाककृती दुसरी नसेल. मी सुद्धा बनवला आहे डाळकांदा. पावसात भिजून रूमवर आल्यावर गरम डाळकांदा आणि चपाती लाय भारी लागली होती. जियो मिंट्स. कराडला आलीस तर नक्की भेटू.
ReplyDelete