फोडणीचे आंबट वरण (ambat Varan)

ambat Varan


श्रावण सोमवारी घरी लवकर यायला मिळे आणि घरी स्वयंपाकही पूर्ण तयार असे. त्यातले हे फोडणीचे वरण म्हणजे माझा जीव की प्राण. सकाळी जाताना साबुदाणा खिचडीपेक्षा संध्याकाळच्या ह्या वरणाचे जास्ती अप्रुप असे.

१ वाटी तुर डाळ - कुकरला मऊ शिजवुन घेतलेली
३-४ टेबलस्पून ओले खोबरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ पाकळ्या लसुण
छोटा आल्याचा तुकडा
लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
१ छोटा तुकडा गूळ
मुठभर कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ टेबलस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी - तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद

कृती -
मिरची, आले, लसुण, खोबरे आणि थोडी कोथिंबीर बारीक वाटुन घ्यावी. तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करुन घ्यावी. त्यात शिजवलेली डाळ चमच्याने घाटुन घालावी. त्यात मीठ, चिंचेचा कोळ, खोब-याचे वाटण, मसाला, आणि गुळ घालावे. वरण जितके कमी जास्त घट्ट पाहिजे त्याप्रमाणात पाणी घालुन नीट उकळी आणावी. वरुन कोथिंबीर घालावी. गरम गरम भाताबरोबर खावा.

टीप -
उन्हाळ्यात चिंचेच्या कोळाऐवजी एखादी कैरी खिसुन घातली तरी अप्रतीम होते.

Comments

  1. साधे वरण चवदार का फोडणीचे वरण जास्त रुचकर ?हा प्रश्न मला नेहमीच पडतो. अर्थात मनाच्या त्यावेळच्या स्थितीवर ते अवलबुंन असते म्हणा.

    ReplyDelete
  2. I tried this today and it was really awesome....Thanx

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts