ऑरेंज रसम (Orange Rasam)
अलीकडे मला खुप सर्दीसारखे झाले होते आणि सतत चहा कशाला करायचा म्हणुन मी रसम करावा म्हणुन फ्रीज उघडला तर टोमॅटो संपले होते पण ऑरेंज ज्युस होता घरात. मग थोडा ऑरेंज रसमचा प्रयोग करायचे ठरवले आणि मला वाटते प्रयोग बराच यशस्वी झालाय असा माझ अंदाज आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो ह रस्सम
Orange Rasam
२ कप ऑरेंज ज्युस
१.५ कप पाणी
१ टेबलस्पून रसम पावडर
१ चमचा साखर
चवीप्रमाणे मीठ
१/४ चमचा चिंचेचा कोळ
१ टीस्पून तेल
जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता - फोडणीसाठी
कृती - एका मध्यम आकाराच्या पातेल्यात तेलाची जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालुन फोडणी करावी. त्यात पाणी, चिंचेचा कोळ, साखर, मीठ, रसम पावडर घालावी आणि एखादा मिनीट मध्यम गॅसवर उकळावे. गॅस बारीक करुन ऑरेंज ज्युस घालावा आणि परत गॅस मध्यम आचेवर करुन एकच उकळी आणुन गॅस बंद करावा.
टीप -१. मी ऑरेंज ज्युस घेताना पल्पसहीत घेते आणि त्याची चव छान येते असे मला वाटले.
२. घरच्या बागेतल्या संत्र्यांचा रस काढुन जर हे रसम केले तर अप्रतीम चव येते.
३. मी हे रसम भाताबरोबर खाल्ले नही कधी पण नुसते प्यायला अतीशय मस्त वाटले.
अगदी वेगळी अन् छान पाक कृति.
ReplyDeleteinnovative!
ReplyDeletezakas..
ReplyDeleteekdam original idea! try karoon baghate.
चाखायला कधी येऊ?
ReplyDeleteमाझॊ बायको हे सार करुन देईल तेव्हा खरे, तो पर्यंत वाचण्यावरच समाधान
ReplyDelete