अंबील (Ambil)
२ टेबलस्पून नाचणीचे पीठ
१/४ कप अंबट ताक
३ कप पाणी
चवीप्रमाणे मीठ
२ टेबलस्पून बारीक कापलेला कांदा - इच्छेप्रमाणे
१ लहान पाकळी लसूण बारीक खिसुन - इच्छेप्रमाणे
अंबट ताक - आवश्यकतेप्रमाणे
कृती - अंबट ताकात नाचणीचे पीठ रात्रभर भिजवावे. सकाळी उठुन ३ कप पाणी गरम करायला ठेवावे. त्यात साधारण १ टीस्पून मीठ घालावे. साधारण उकळीला येईल असे वाटले की गॅस बारीक करुन ताकात भिजवलेली नाचणी त्यात घालावी गुठळ्या होऊ न देता ती नीट मिसळुन चमच्याने ते मिश्रण हलवत रहावे. उतू जाणाची शक्यता असल्याने गॅस मोठा करु नये. एक उकळी आली की गॅस बंद करून अंबील थंड करायला ठेवावी.
प्यायला देताना त्यात आवडीप्रमाणे कच्चा कांदा, बारीक केलेला लसूण आणि अंबट ताक घालुन द्यावी.
टीप - १. नाचणीचे पीठ ताकात रात्रभर भिजवणे शक्य नसेल तर किमान २ तास तरी भिजवावे.
२. पीठ पाण्यात घालतना गुठळ्या होतील अशी भिती वाटत असेल तर त्यात १/२ कप पाणी घालुन सरसरीत करुन ते गरम पाण्यात घालावे.
३. कच्चा लसुण आणि कच्चा कांदा ऐच्छीक आहे. हे घातलेली अंबील कर्नाटकात जास्त प्रचलीत आहे. पण घालणार असाल तर ऐनवेळीच घालावी.
४. अंबील शरीरासाठी थंड असते त्यामुळे शक्यतो थंडीमधे खाऊ नये.
http://www.namitaskitchen.com/2013/04/10/ambilambli-ragifinger-millet-cooler/
ReplyDeleteCouldn't help noticing that its the exactly same recipe in the link above just in English.....of course that is 5 yrs after your original
Thank you for letting me know. I will try and send email and see what happens.
Delete