फ्लॉवर चटपटा (Chaptpata Cauliflower)

प्ह्लॉवरची भाजी माझी तशी फार आवडती भाजी नाही. अगदीच काही मिळाले नाही तर ही भाजी आणावी लागते आणि मग त्याचा तो उग्र वास घालवण्याचे अनेक उपाय करुन पाहावे लागतात. हे रामायण काहीवर्षांपुर्वी अश्विनीला ऐकवल्यावर तिने मला हा प्रकार सांगितला आणि माझा अगदी फेवरीट झाला.
Chaptpata Cauliflower
साहित्य -
१ फ्लॉवरचा गड्डा
५-६ काजु पाकळ्या
१०-१२ बेदाणे
१ टेबल्स्पून तेल
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि हळद

कृती -
फ्लॉवरचे तुरे साधारण अर्धा ते एक इंच जाडीचे कापुन घ्यावेत. खालच्या गड्ड्याचे पण तसेच लहान तुकडे कापून घेउन सर्व धुवुन घ्यावे. पाणी शक्यतो पूर्ण निथळु द्यावे. एका जाड बुडाच्या कढईत तेलाची जिरे, मोहरी आणि हळद घालुन फोडणी घालावी. त्यात काजुच्या पाकळ्या व बेदाणे घालावेत. वरुन फ्लॉवर घालुन परतायला घ्यावे. त्यात लाल तिखट, गोडा मसाला घालुन परतावे. बारीक गॅसवर साधारण ५ एक मिनीटे परतल्यावर चवीप्रमाणे मीठ घालावे. आता कदाचीत फ्लॉवरला पाणी सुटेल परत बारीक गॅसवर फ्लॉवर पूर्ण कोरडा होईल इतके परतावे. फ्लॉवर नीट शिजला की खाली उतरवून कोथिंबीर घालुन गरम गर्म फुलक्यांबरोबर वाढावे.

टीप -
१. ह्या भाजीला शक्यतो हिंग घालु नये उग्र वाटतो.
२. भाजी पूर्णपणे कोरडी करावी.
३. फ्लॉवरचा गड्डा कितीही मोठा असला तरीही भाजी खूपच कमी होते.

Comments

  1. saadhee, sopee vaaTatey.. karun pahaaylaa havee :)

    ReplyDelete
  2. Aattach banavali... aaNi chaan zaali aahe.
    MazyasaaThi goda masala kinchit jasta aahe (kadachit maza masala jara strong asel).. baaki ekdam uttam..
    aaNi ugra waas bilkul naahi.
    Kaaju-bedaaNe takaychi idea tar khoopach aawadali !

    Thanks for the recipe :-)
    -Archana

    ReplyDelete
  3. I made this yesterday. Got a thumbs up at the dinner table! :-)

    ReplyDelete
  4. I made this veggie today, with a bit of variation, by adding little bit lime juice & sugar, it was tasting great! Thanks for sharing this recipe.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts