व्हेजीटेबल कटलेट्स (Vegetable Cutlets)

ही रेसीपीदेखील माझी मैत्रीण अश्विनीचीच. मधे पार्टीसाठी खुप लहानमुले येणार होती आणि नेहेमी मुलांसाठी मोठ्यांचेच जेवण असते आणि बरेचदा खाणे तसेच टाकुन दिले जाते म्हणुन मुद्दाम मुलांसाठी म्हणुन हा पदार्थ केला होता आणि मुलांनी अगदी आवडीने खाल्ला.

१ मोठे बीट
१ मोठा बटाटा
१/२ कप फ्लॉवरचे तुकडे
१/२ कप कोबी
१/२ वाटी मटार
१-२ हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
१/२ टीस्पून जि-याची पावडर
१/२ वाटी कोथिंबीर
१ कप ब्रेड्क्रम्स

कृती - बीट आणि बटाटे कुकरमधे वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर साली काढुन मोठ्या खिसणीने खिसुन घ्यावे. त्याबरोबर फ्लॉवर, कोबी पण खिसुन अगर मिक्सरमधुन काढुन बारीक करुन घ्यावा. मटारचे दाणे थोडे ठेचुन घ्यावेत. मिरच्या मिक्सरमधुन बारीक करुन घ्याव्यात. मीठ, वाटलेल्या मिरच्या, जिरापूड, कोथिंबीर, सगळ्या भाज्या, आणि अर्धा कप ब्रेडक्रम्स एका मोठ्या बाऊलमधे हलक्या हाताने एकत्र करावे. लागले तर एका थोडे ब्रेडक्रम्स घालावेत. हे मिश्रण साधारण बटाटेवड्याच्या सारणासारखे मऊसर असावे. आता ह्या मिश्रणाचे साधरण १ इंचाचे बॉल करुन घ्यावेत. आता ओव्हन ३५० फॅरेनहाईट टेंपरेचरवर प्रीहीट करण्यासाठी चालु करावा. एका बेकिंग डीशला तेलाचा हात लावुन ठेवावा. उरलेले ब्रेडक्रम्स एका पसरट बाऊलमधे घ्यावेत. आता मिश्रणाचे बॉल थोडे चपटे करुन ब्रेडक्रम्समध्ये घोळवून बेकिंगडीशमध्ये ठेवावेत. सगळे कटलेट्स करुन झाल्यावर असेल तर ऑईलस्प्रे हलक्या हाताने मारावा. ओव्हनचे टेंपरेचर ३२५ करावे आणि ट्रे १५ मिनीटे बेक करावा. एक बाजु झाली की सगळे कटलेट्स उलटुन पुन्हा १५ मिनीटासाठी बेक करायला ठेवावेत.
पुदीना चटणी, केचप बरोबर खाण्यास द्यावेत. दिलेल्या प्रमाणात साधारण १५ कटलेट्स होतात.

टीप -
१. ह्यामध्ये गाजर, फरसबी, अशा कोणत्याही भाज्या कमीजास्त प्रमाणात घालता येतात. शक्यतो बीट व बटाट्यांचे प्रमाण कमी करु नये.
२. ब्रेडक्रम्स मिळणॅ शक्य नसेल तर शिळ्या ब्रेडचे १-२ स्लाईस कुस्करून घालता येतात अथवा थोडे तांदळाचे पीठ घातले तरी चालते.
३. वरून लावण्यासाठी बारीक रवा वापरला तरी चालेल.
४. मिरची अगदी नकळत असावी भाज्यांची चव आणि मीठ येवढ्यावर हे कटलेट्स चांगले लागतात. आणि लहानमुलेही आवडीने बर्गर म्हणुन खातात.
५. ओव्हन नसेल तर अगदी कमी तेल घालुन शॅलोफ्राय करावेत.

Comments

  1. Mints,
    I am not sure if you read my blog kasakaay.blogspot.com. I have been writing about environmental issues for almost an year now.
    As a result of my articles on veganism, some readers have asked more advise on how to take that step.
    While I can tell about all the substitutes available the market, I am not a good cook to give more specific cooking advise. So I am looking for someone like you to team up with.
    From your blogs, you seem to be quite aware of the environmental issues. I have observed that this blog of yours,even though not particulary vegan,is not very dairy/meat centered either.
    Will you be willing to start a section on vegan cooking or some thing of that sort?
    Thanks

    ReplyDelete
  2. Hi Sangita,

    Thank you for the comment and your interest in the vegan recipes.
    I do read your blog quite often and is following the environmental issues and I am also very much interested in knowing more.

    I am not 100% vegan but don't cook/eat meat, fish, eggs. My dairy intake is only a cup of coffee per day thats it :)

    But, I am very much a health 'nut'. rarely deep fry anything. I do not use any hydrogenated oils, margarine, paneer, etc. So typical Indian recipes like LaaDoo and all might be difficult to reproduce. I am also experimenting with Tofu and other soy products.

    I will add a new 'vegan' label to the recipes that I write and will make sure whenever I write any recipe that contains milk, I will consider writing a vegan version of that if I can.

    If you have getting requests for any specific recipes, please let me know and I will definitely try to write vegan versions of it.

    ReplyDelete
  3. Mints,
    That is exactly what I was looking for. Thanks a lot.
    I like Tempeh more than Tofy. Easy to digest because it is fermented.
    Have you experimented with egg replacer and coconut milk?

    ReplyDelete
  4. Not so much with egg replacer but yes I do use Coconut Milk in Kheers and all.

    ReplyDelete
  5. **Sumedha mode on**
    khaaylaa kadhi yeu?
    **Sumedha mode off**

    ;-)

    ReplyDelete
  6. Thanks Mints. This is great. 50 recipes already!!

    ReplyDelete
  7. mints,what if i don have an oven?
    microwave sathi temparature kay??
    or tavyavar hou shakel ka?
    plz reply

    ReplyDelete
  8. Anonymous, mI microwave oven fakt anna garam karaayala vaparate. paN he cutlets tavyavar thoDese tel ghaalun neet bhaajale jatat. shallow fry karaayache. ek baju jhali ki dusarI bhajayachI.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts