कच्च्या फणसाची भाजी (Raw Jackfruit bhaaji)
कोकणात कच्च्या फणसाची भाजी खुप आवडीने खाल्ली जाते. मामा कोयनेहुन येताना कधितरी छोटे फणस घेउन येत असे. ते फणस साफ करणे म्हणजे जिकिरीचे काम असे. पण भाजी फार अवडत असल्याने ते केले जायचे. विळीला तेल लावुन वरचे टणक साल काढुन टाकायची. मग आतल्या गराचे ६-७ तुकडे करुन कुकर मधे २-३ शिट्ट्या करुन शिजवुन घ्यायचे. मग त्या शिजवलेल्या तुकड्यातला मधला दांडा काढुन टाकायचा. तो तसा लगेच निघतो. राहिलेले तुकडे बोटाने कुस्करुन त्याची भाजी करावी.
कच्च्या फणसाची भाजी
ही झाली 'फ्रॉम स्क्रॅच' रेसीपी! पण माझ्या सारख्या 'डमीज' साठी सोपी पद्धत आहे ती खालील प्रमाणे -
१ कॅन कोवळा फणस
१ मध्यम कांदा मोठा-मोठा चिरुन
१/४ कप हरबरा डाळ
१-२ लसुण पाकळ्या
१-२ सुक्या मिरच्या
१ टेबल्स्पून खोबरे (ओले/सुके)
१ टेबल्स्पून तेल
चवीपुरते मीठ
१ टीस्पून काळा मसाला
चवीप्रमाणे लाल मिरची पावडर
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, हिंग
कृती - डाळ साधारण १-२ तास भिजत घालावी. कॅन फोडुन त्यातला फणस काढुन पाणी फेकुन द्यावे. फणसाचे तुकडे पाण्याने जरा धुवुन घ्यावेत. पाणी न घालता कुकरला २ शिट्ट्या करुन घ्याव्यात. गार झाल्यावर फणस कुस्करुन घ्यावा. कांदा मोठा मोठा चिरुन घ्यावा. लसुण, खोबरे, लाल मिरच्या एकत्र वाटुन घ्यावे. कढईत तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात कांदा गुलबट रंगावर भाजुन घ्यावा. त्यात भिजवलेली डाळ घालुन परतुन घ्यावी. डाळ अर्धवट शिजेल इतके परतावे. गरज लागेल तसा पाण्याचा हबका मारावा. त्यात मीठ, काळा मसाला, लाल तिखट घालावी. वरुन फणास घालुन नीट परतुन घ्यावे. मंद आच करुन कढईवर झाकण घालुन एक वाफ आणावी. चपातीबरोबर गरम गरम खावी.
टीप - १. कोवळ्या फणासाचे टीन देसी स्टोर मधे आणि चायनीज मार्केट मधे मिळतात.
२. फणस धुवुन मगच शिजवावा. त्यातले पाणी निघुन गेलेच पाहीजे.
३. हरबरा डाळीऐवजी काळे हरबरे भिजवुन कुकरला शिजवुन घातले तरी अतिशय चविष्ट लागते.

आपला ब्लॉग फ़ारच छान आहे.पण मला आपल्याला एक विचारायचे आहे. आपल्या एम्ब्रौडरीच्या ब्लॉगवर आपण नवीन पोस्ट का टाकत नाही. हा ब्लॉग आपण जानेवारी महिन्यापासुन अपडेट ठेवलेला नाही.तसेच आपल्याला शिवणकामातही रस असेल तर मला पंजाबी ड्रेस कसा शिवावा याची माहिती द्याल का?
ReplyDeleteमाझी बायको या भाजी साठी वेडीपिसी होते
ReplyDeleteमोरपीस, त्या ब्लॉगबद्दलची कॉमेंट तिकडेच सविस्तर टाकेन.
ReplyDeleteहरेकृष्णजी, तुम्ही माझ्या प्रत्येक रेसीपीचे आवर्जुन कौतुक करता त्याबद्दल अतिशय धन्यवाद.
khoopach chhan receipes
ReplyDeletemast aavadati bhaji ekdam
ReplyDelete