अननसाची भाजी (Pineapple Bhaaji)
भुवया उंचावल्या ना? गोडसर चवीच्या भाज्या आवडत असतील तर हा प्रकार करुन पहा.
२ कप अननस (मध्यम आकाराच्या फोडी करुन)
२-३ लाल सुक्या मिरच्या
३-४ टेबल्स्पून ओले खोबरे
चवीप्रमाणे मीठ व किंचीत साखर
फोडणीसाठी थोडे तेल, जिरे आणि मोहरी
कृती - पातेल्यात तेल गरम करुन जिरे मोहरीची फोडणी करुन घ्यावी. त्यावर लाल मिरच्या घालुन किन्चीत गरम कराव्यात त्यावर अननस घालावा. ओले खोबरे थोडे भरड वाटुन त्यावर घालावे. मीठ व साखर घालुन एकदा हलवावे आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. हवी असेल तर वरून कोथिंबीर घालायला हरकत नाही.
टीप - मी शक्यतो ताज्या अननसाच्या फोडी वापरते. पण कॅनमधला वापरायचा असेल तर Packed in its own juice अशा प्रकारचा कॅन आणुन रस काढुन फोडी वापराव्यात.

होय हो भुवया उंचावल्या. आमच्या घरी अननसाचे, सफरचंदाचे , द्राक्षाचे सांबार करतात पण भाजी ?
ReplyDeleteकधीतरी बायको प्रसन्न मुड मधे असेल तर ही फर्माईश करायला हवी .