हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney)

कराडच्या घरी अम्हाला रहायला जाऊन प्रवाच्या Good Friday ला २४ वर्षे पूर्ण झाली. पण त्या आठवणी अजुनही मनात ताज्या आहेत. तिथे रहायला गेलो तेव्हा मागे मस्त भुस्भुशीत काळी माती होती कारण शेतज्मीन Non-Agricultural करुन घेउन सोसायटी झालेली आमची. त्या जमीनीत त्याकाळी काय टाकाल ते उगवत असे. अशात एकदा खराब झालेला टोमॅटो मागे कचर्याच्या बादलीत ठेवला होता. तो आमच्या राजाने (म्हणजे अमच्या शिकारी कुत्र्याने) खेळत मागे कुठेतरी टाकला. वळवाच्या पावसात त्यतले बी रुजले आणि बरीचशी झाडे उगवली. आणि जवळपास दोनशे वगैरे टोमॅटो त्या १०-१२ झाडाना लागले. घरात त्यावेळी अनेक टोमॅटो सप्ताह साजरे झाले! त्यावेळी खल्लेली घरच्या हिरव्या टोमॅटोची चटणी अजुनही आठवते.


Green tomato Chutney

२ मध्यम हिरवे टोमॅटो
२-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी-जास्त करण्यास हरकत नाही)
२ टेबलस्पून भाजलेले तीळ
२ टेबल्स्पून भाजलेले शेंगदाणे
२ टेबलस्पून भाजलेले सुके खोबरे
१-२ लसुण पाकळ्या (आवडत असतील तर)
मुठभर कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ, गूळ
१ टीस्पून तेल, थोडे जिरे आणि हळद

कृती - टोमॅटो स्वच्छ धुवुन उभे पातळ कापून घ्यावेत. एका कढईत तेल तापवून त्यात जिरे आणि हळद घालावी. जीरे थोडे तडतडले की त्यात टोमॅटो घालून परतावे. सतत हलवत रहावे. तोंएटोला सुटलेले पाणी पूर्ण आटले पाहीजे आणि टोमॅटो नीट शिजेल अशे भाजले गेले पाहीजे. कदाचीत काही फोडी करपण्याची शक्यता आहे. तसे झाले तरी हरकत नाही. आता हे भाजलेले टोमॅटो थोडे नीवू द्यावेत. मीठ, मिरची, तीळ, दाणे, खोबरे, कोथिंबीर आणि गूळ एकत्र करुन भरड वाटावे. आता त्यातच टोमॅटो घालून नीट बारीक करून घ्यावे.

टीप - १. शेंगदाणे, तीळ आणि खोबरे वेगवेगळे भाजुन घ्यावे.
२. नुसत्या तिळाची चव आवडत असेल तर दाणे आणि खोबरे न घालता फक्त तीळ घालून ही चटणी करून पहावी.
३. इथे दिलेल्या पद्धतीने चटणी केली तर थोडी सरसरीत होते. थोडी कोरडी हवी असेल तर टोमॅटोच्या बिया काढुन टाकाव्यात.

Comments

  1. मला चटणी ठेवलीये ते भांड खूप आवडलं! :D

    चटणी करून बघीन तेव्हा सांगीन :)

    ReplyDelete
  2. भांडं चंगलंच आहे, चमचा काढायल पाहिजे होता फक्त! :))
    Mints - चांगलं लिहितिएस, कमेंट्स मुळे वगैरे discourage होऊ नकोस.

    ReplyDelete
  3. मला भांड्यासकट चटणी हवी :((

    ReplyDelete
  4. chaTaNI che bhande (ghari paadalele nahiye ) miLel tyasathi ithe yave lagel :P

    Abhijit - Thank you! :)

    chaTaNisahit bhande - available hou shakel ki !!

    ReplyDelete
  5. आज केली आहे. झकास झालीये! :)
    पण या देशातल्या मिक्सरांवरती आपल्या पद्धतीचं वाटण घाटण जरा अवघडच जातं :-( त्यापेक्षा पाट्या-वरवंट्यावर पटकन झाली असती :D ’भांडी कुठली वापरावीत’ सारखं ’मिक्सर कुठला वापरावा’ सांग ना...

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts