हिरव्या सफरचंदाची कोशिंबीर (Granny Smith Apple Salad)
मागे एकदा माझी मैत्रीण प्रियाने मला सफरचंदाचे रायते कसे करायचे ते सांगितले होते. दही /दूध खूप खात नाही म्हणुन मी त्यात थोडा बदल केला आणि झालेली कोशिंबीर खालीलप्रमाणे -
Granny Smith Apple Salad
१ हिरवे सफरचंद (Granny Smith प्रकारचे)
१ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट
१ टेबलस्पून कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ टीस्पून लिंबाचा रस
किंचित साखर
कृती - सफरचंद धुवुन चार फोडी करुन बिया काढुन टाकुन टाकाव्यात. त्या फोडी मोठा खिसणीने खिसुन घ्याव्यात. खिसलेल्या सफरचंदाला लिंबाचा रस लावावा. वरुन मीठ, साखर, दाण्याचे कूट, कोथिंबीर एकत्र करुन वाढावे.
टीप - १. लिंबाचा रस सफरचंदाला लावायाला विसरु नका.
२. लिंबाच्या रसाच्या ऐवजी अर्ध्या संत्र्याचा रस घातला तर स्वाद चांगला येतो.

Nice! Very innovative :) Apple kisaNyaaaivaji ekdam baareek chirale tar bara laagel kaa?
ReplyDeletePriya - neet barik chirale kinva kaakadi kochato tase kochale tari chanach hoil.
ReplyDeleteआज केली होती. ब्येष्ट झालेली. पण तुझ्या कोशिंबीरीचा असा मस्त पांढरा शुभ्र रंग कसा? माझं सफरचंद किसता किसताच काळं पडायला लागलं. शेवटी ब्राऊन+हिरवा रंग आला होता कोशिंबीरीला. पण चवीला अप्रतीम! :)
ReplyDeletePriya, mala ase vaaatey kI tu limbu khoop piLale nasaaves. safarcha.nd lagechach kaaLe paDate. te TaaLanyaasaathI thoDyaa paaNyaat limbu piLun tyaat safarchandache tukade ghalun thevale kI kami kale paDatat.
ReplyDeleteमी आज सफरचंद किसण्याऐवजी बारीक चिरून परत केली होती. आणि चिरता चिरताच अधून मधून लिंबू पिळत गेले. त्यामुळे सफरचंद बिल्कुल काळं पडलं नाही. शिवाय किसल्याने कोशिंबीर जास्त soggy वाटली, बारीक चिरल्याने जरा crunchy झाली. एकूण प्रयोग यावेळी जास्त यशस्वी झाला. लिंबाच्या टिपबद्दल थँक्स! :)
ReplyDelete