कढीपत्त्याची चटणी (Kadhipatta Chutney)
कराडला आमच्याकडे कढीपत्त्याचे खूप मोठे झाड आहे. एका वादळात त्याची फांदी तुटली आणि खूप लोकाना कढीपत्ता वाटून टाकुन देखील बरीच पाने शिल्लक राहीली. त्यावेळी मम्मीने प्रथम ही चटणी केली. तेव्हापाशुन माझ्या अतिशय आवडीची झाली.
Kadhipatta Chutney
१ कप कढीपत्ता
१ कप फुटाण्याची डाळ
१/२ कप भाजलेले शेंगदाणे
१/२ टीस्पून तेल
१ टेबलस्पून साखर
चवीप्रमाणे मीठ
१ चमचा लाल तिखट (चवीप्रमाणे कमी जास्त करावे)
कृती - डाळे निवडून घ्यावेत. दाणे भाजुन साले काढुन घ्यावीत. कढिपत्त्याची पाने धुवुन थोडी सुकवून घ्यावीत. पाने एका कढईत घालुन त्यावर तेल घालुन कुरकुरीत होईपर्यन्त भाजुन घ्यावे. डाळे, दाणे, कढीपत्ता, मीठ, साखर एकत्र करुन बारीक करुन घ्यावे.
टीप - १. दाणे, डाळे यांचे प्रमा आवडीप्रमाणे कमी जास्त करण्यास हरकत नाही.
२. आवडत असेल तर २-३ आमसुले घातली तरी चटणी चवीला अप्रतीम लागते.
३. ब्रेड वर तेल आणि ही चटणी खूप छान लागते.
४. इडली, डोश्याबरोबर पण ही चटणी छान लागते.

चटनी दिसते तर छान आहे करुन बघेन,
ReplyDeleteआणखेही बरेच नविन पदर्थ दिसले तुझ्या ब्लोग वर बरेच करावेसे वाटताहेत.
तु लिहिलेस की तु चार वर्ष न शिजवलेले अन्न खात होती?? कस काय?? आणि काय करत होतीस? तेव्हा चे तुझे अनुभव लिहि ना.मी वजन वाढले की शिजवलेले अन्न्खाणे बंद करते पण परत चालु करते.. :)
कढीपत्त्याची चटणी फ़क्त ऎकली होती, पण आज त्याची रेसिपी पण बघत आहे. धन्यवाद.
ReplyDeleteLopa, aga mI 'Raw Food' follower hote. ani mag kahi karanane band jhale. ata halu halu punha suru keley pan 100% hot nahi purvisarakhe :)
ReplyDeletelihave vatatey g pan khoop vel milat nahi.