दही बुत्ती (Curd Rice)

मी लहान असताना आमचे कराड-कोल्हापूर-पुणे असे सारखे जाणे होत असे. त्याकाळात आजच्यासारखी चांगली हॉटेल्स वगैरे नसल्याने आणि प्रत्येकवेळी हॉटेलमधे जाणे शक्य नसल्याने मग जाताना चपात्या, बटाट्याची काचर्याची भाजी आणि दही बुत्ती हा डबा आज्जी, मम्मी नेहेमी करुन नेत. सोबत एका बाटलीमधे थोड्या दुधाला ताजे विरजण लावून आणि एका थर्मासमधे दूध. त्यामुळे गेल्या गेल्या दूध दही आणायला बाजारात पळायला लागत नसे. त्यातलीची ही दहीबुत्ती मधे मधीतरी आज्जीची खूप आठवण झाली तेव्हा केलेली -
Curd Rice
२ कप शिजवलेला भात
२ कप दही
चवीप्रमाणे मीठ
१/२ टीस्पून मिरीपूड (चवीप्रमाणे कमी जास्त करावी)
१ टेबलस्पून लसूण पेस्ट
१/४ कप चिरलेली कोथिंबीर


कृती - शिजवलेला भात पूर्णपणे थंड करुन त्यात एक कप दही, मीठ, लसूण पेस्ट, मिरीपूड घालुन नीट मिसळून घ्यावे. घट्ट वाटत असेल तर थोडे दही अजुन घालावे. वरून चिरलेली कोथिंबीर घालून वाढावे.

टीप - १. दही मिसळताना कधी पूर्ण मिसळू नये भात घट्ट होत जातो. लागेल तसे दही वरून घालून घ्यावे.
२. ह्या भाताबरोबर तळलेली कुटाची मिरची अप्रतीम लागते.

Comments

  1. Namaskar Thank you for all your posts. मी एकेक गोष्ट ट्राय करणार आहे. पाहुयात किती जमते ते.
    मला एक वेगळाच प्रश्न पडला होता. एका पुस्तकात रेसिपी वाचताना कडकडीत तेलाचे मोहन असा उल्लेख आहे. म्हणजे नक्की काय असते ते? कृपया इथेच रिप्लाय केला तरी चालेल मी येउन वाचेन.

    ReplyDelete
  2. कडकडीत तेलाचे मोहन याचा अर्थ अगदि सोपा - जेवढे तेल सांगितले आहे ते तेल एका कढईत गरम करावे. साधारण गरम झाले असे वाटले की त्यात एखादा चिमुट कोरडे पीठ त्या गरम तेलात घालावे. जर ते पीठ लगेल विरघळल्यासारखे झाले तर तेल बरोबर तापले आहे. पीठ विरघळाल्यासारखे झाले नाही तर तेल अजुन तापायचे आहे आणि ते पीठ लगेचच काळे पडले तर तेल खुप तापले आहे असे समजावे.

    ReplyDelete
  3. Thanks a lot ! Evdha sopa ahe hoy !!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts