मोडाच्या मसुरांची आमटी (Sprouted Lentil Amati)

बेळगावला मंगळवारी दुकाने बंद असतात आणि त्यादिवशी काका लोक घरी असत. मग रात्रीच्या जेवणाला नेहमीच्या भाजी भाकरी भात यापेक्षा काहीतरी वेगळे करायची टूम निघायची. अशावेळी मग ही मसूर आमटी म्हणजेच चन्नंगी सारू आणि ब्रेड असा फंडु मेनु असायचा. तेच हे चन्नंगी सारु -

Sprouted Lentil Amati


२ कप मोड आलेले मसूर
१ टेबलस्पून आले लसुण पेस्ट
१ टेबलस्पून गोडा मसाला
मीठ, लाल तिखट चवीप्रमाणे
२ अमसुले
गुळाचा छोटा खडा
१ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता
१/२ कप बारीक चिरलेला कांदा (वगाळला तरी हरकत नाही)
गरम पाणी जरुरीप्रमाणे
थोडी चिरलेली कोथिंबीर

कृती - मोड आलेले मसुर एका पसरट भांड्यात घ्यावेत. त्यात आले लसुन पेस्ट, थोडेसे लाल तिखट, सगळा गोडा मसाला आणि १-२ चमचे पाणी घालुन ते मसुरांना नीट चोळावे. मसाला लावलेले मसुर साधारण एक ते दिड तास तसेच ठेवावे.
त्यानंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात तेलाची जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालुन फोडणी करावी. त्यात मसाला लावलेले मसूर घालुन साधारण २-३ मिनीटे नीट परतून घ्यावे. त्यावर लाल तिखट घालावे वरुन पाणी घालावे. त्यावर बारीक चिरलेलेआ कांदा घालावा आणि झाकण लावून मसुर मध्यम आचेवर शिजू द्यावेत. मसूर शिजत आले की त्यात मीठ, अमसुले, गूळ घालुन नीट हलवावे. एक उकळी आणुन त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप - १. मसुराला मोड आणण्यासाठी मसूर कोमट पाण्यात भिजवून ७-८ तास ठेवावेत. त्यावर उपसून १-२ तासाने एका फडक्यात घट्ट बांधुन ओव्हन वगैरे सारख्या उबदार जागी २४ तास ठेवावे.
२. कांदा घालणे आवश्यक नाही. घातला तरी न परतत वरुन घालावा.
३. ही आमटी खूप पातळ अथवा खूप घट्ट करु नये.
४. ब्रेड, चपाती, भात कशाबरोबरही ही आमटी चान लागते.

Comments

  1. मी टोमॅटो घालून मसूराची आमटी बरेचदा करते, पण मोड आणून केली नाही कधी. करून बघीन आता तुझ्या पद्धतीने! :)

    ReplyDelete
  2. तोंडाला पाणी सुटले

    ReplyDelete
  3. Priya - Tomato ghatalelI vegali lagate aani hI vegali lagate. karun paha.

    Harekrishnji - fakt baghunach? :D

    ReplyDelete
  4. ya. What else to do ? I am totally at mercy of my wife.

    Till she cooks and feed me, I have to satisfy my quest by looking at those delicious pics and receipes.

    ReplyDelete
  5. पहिल्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे कृती करून बघेन. जरा वेगळी वाटली नेहमीपेक्षा!

    मी भाताबरोबर खाणार! :-)

    ReplyDelete
  6. pl share recipe of goda masala as the masala available in market is not of good taste n quality.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts