शेंगदाण्याची चटणी (Shengadaana Chutney)

(Link to English Recipe)


टेबलवर चटण्या घालुन ठेवण्यासाठी एखादे छानसे भांडे असावे असे बरेच दिवसापासुन वाटत होते. मधे २-३ बनवली पण होती. पण काही ना काही कारणांमुळे ती कोणाला तरी द्यावी लागली अथवा नीट fire झाली नाहीत. हे भांडे मात्र बनवताना मनासारखे जमले, रंग पण मनासारखा झाला. आणि टेबलवर ठेवल्यावर अगदी मनापासुन आवडले. आता यात एखादी चटणी करुन ठेवावी असे वाटले. नवीन काहीतरी करण्यापेक्षा नेहेमीची शेंगदाणा चटणी बरेच दिवसात केली नाहीये ही बाब लक्षात आणून दिली गेली म्हणल्यावर तीच केली.


१ कप भाजलेले शेंगदाणे
२-३ पाकळ्या लसूण (आवडीप्रमाणे कमी जास्त करावा)
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून साखर
१-२ टीस्पून मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करावे)
१-२ टीस्पून लाल तिखट

कृती - मिक्सरच्या भांड्यात निम्मे शेंगदाणे घालावेत त्यावर लसूण, तिखट, जिरे, मीठ, साखर घालावे. वरून उरलेले दाणे घालावेत. हळुहळू पल्स करत करत चटणी बारीक करावी. भांड्यात काढून तिखट मीठ व्यवस्थीत आहे क ते पहावे. कमी जास्त हवे असल्यास मिसळून डब्यात भरावे.

टीप - १. सोलापूरकडची दाण्याची चटणी अतीशय प्रसिद्ध आहे. ती लोखंडाच्या खलबत्त्यात कुटुन बनवली जाते. तेवढा वेळ आणि पेशन्स नसल्याने मिक्सरवर पल्स करत हळुहळू करावी त्याने दाण्यातले तेल थोडेतरी बाहेर पडते.
२. कर्नाटकत बॅडगी मिरची म्हणुन मिरचीचा एक प्रकार मिळतो. तो रंगाला अतिशय लाल आणि तिखटाला अतिशय कमी असतो. ते घालून केल्याने चटणीचा रंग एकदम सुरेख लाल येतो.
३. भाकरीबरोबर दही चटणी, आणि कांदा असा नाष्टा बरेच ठिकाणी केला जातो. तेल/तूप लावून मस्त दाण्याची चटणी लावलेली पोळीची सुरळी हे गावाला जातानाचे मोठे आकर्षण असे.

Comments

  1. आहाहा! याचं दृष्टीसुख आणि रसनासुख दोन्ही घेतलं आहे, अगदी चव ताजी ताजी आहे जीभेवर :)

    ReplyDelete
  2. wow! chaTaNee aaNi bhaanDa donhee surekh. tujhyaa pratyek recipe barobar pottery chaa ek namunaa kaa naahi Taakat? That way we get to see one more aspect of your creativity! :)

    ReplyDelete
  3. What a lovely jar, and the chutney also sounds good! I always enjoy seeing your pretty serving bowls - I assume they are all made by you?

    ReplyDelete
  4. Sumedha - :)

    Priya - I will try - doesn't occur to me.

    ET - Thank you. About 80% of the bowls are made by me.

    ReplyDelete
  5. नमस्कार कराडकार. मी पुणेकर.
    मी तुझा ब्लॉग नेहमी वाचते. मला जरा अजून माहिती हवी होती.
    मला पॉटरी शिकायची अाहे. मी bay area मधे राहते. काही चांगले पर्याय अाहेत का?

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts