पालकाची पळीवाढी भाजी (Spinach BhaajI)


Spinach Bhaji


पालकाची पातळ भाजी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. ही रेसीपी माझी मैत्रीण रेणुका हिची आहे.

Spinach BhaajI

१ मोठी जुडी पालक
१ मुठ शेंगदाणे
१ मुठ हरभरा डाळ
१-२ टेबलस्पून बेसन
२-३ लाल मिरच्या (२-२ तुकडे करून)
२ पाकळ्या लसूण (ठेचुन)
१ लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
१ लहान खडा गूळ
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी - १ टेबल्स्पून तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग
२-३ कप पाणी लागेल तसे

कृती - डाळ आणि दाणे पाण्यात वेगवेगळे साधारण१ तास भिजत ठेवावेत. दरम्यान पालक नीट धुवुन बारीक चिरुन घ्यावा. साधारण तासाभराने डाळ, दाणे, पालक एकत्र करुन प्रेशरकुकर्मधे १-२ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावा. प्रेशर उतरल्यावर भाजी पळीने नीट घोटुन घ्यावी. त्याला साधरण १-२ टेबलस्पून बेसन लावावे. मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, गूळ, चिंचेचा कोळ, घालून भाजी उकळायला ठेवावी. खूप घट्ट झाली असेल तर किंचीत पाणी घालावे. बाजुला फोडणीच्या वाटीत तेल तापवून जिरे, मोहरी, हळद, हिंग, ठेचलेला लसूण घालावा. १ मिनीटानंतर त्यात लाल मिरची घालावी. आणी फोडणीचा गॅस बंद करावा. उकळत्या भाजीवर ही फोडणी ओतुन गॅस बंद करावा. गरम गरम भाताबरोबर अगर चपातीबरोबर खावे.

टीप - १. आवडत असेल तर फोडणीमधे ५-६ काजुच्या पाकळ्या, ५-६ खोब-याचे काप घालायला हरकत नाही. पण ते घालणार असाल तर फोडणीचे तेल साधारण २ टेबल्स्पून घ्यावे.
२. आळुची भाजी अशीच करता येते. त्यात थोडी चिंच अधीक घालावी. आळुची भाजी घेताना त्याच्या देठी पण सोलून बारीक चिरुन घ्याव्यात.

Comments

  1. Looks Nice! ताकातला पालक, वरणातला पालक माहित होता, पण ही हरभरा डाळ आणि बेसन घालून भाजी पहिल्यांदाच ऐकते आहे. पुण्यात लग्ना-कार्यात आळूची भाजी असते, ती बहुधा अशी करत असावेत. आळूचं फतफतं म्हणतात त्याला. मला त्या नावाचं खूप हसू येतं :D

    ReplyDelete
  2. Like प्रिया, I too thought this was like 'ALUchi pAtaL bhAji', but given how bad (and how rare) the ALU is here, this sounds like a lovely alternative. aga, but doesn't the spinach get overcooked in the pressure cooker?

    ReplyDelete
  3. priya- आळूचं फतफतं :)) karun bagh!

    ET - Actually it does get get little overcooked. What I tried was, cook daal, daane in cooker and then cook Spinach on stovetop. But it actually takes a little more time and more vessels to cook :P but yeah I agree with you :)

    ReplyDelete
  4. पळीवाढी हा शब्दप्रयोग पहिल्यांदाच ऐकला.
    पुण्यात लग्ना-कार्यात श्रुती मंगलकार्यालयात काय अळुचे फतफदे मिळते, झक्कास.

    ReplyDelete
  5. Thanks for the post !
    पण माझा प्रश्न वेगळा आहे. साधे पोहे जमत नाहीयेत आजकाल.खूप्र फ्रस्टेशन आलंय. आधी जमले होते.
    काय होतंय कळत नाही पण अगदी गिचका(गा) होतोय.अगदी चविष्ट लगदा.
    किती वेळ भिजवायचे आधी? आणि माझ्याकडे चाळणी नाहिये त्याच्यामुळे होतंय का अस? पोहे जाड वापरावेत की पातळ?

    ReplyDelete
  6. abhijit, khaas tujhyaasaathI pohyaache post Taakaley. ajun kaahI aaDat asel tar saang.
    Good luck!!

    ReplyDelete
  7. hi mints

    khoopach chaan aahey hi recipe.. kaalach karun pahili..vaah ..sundarach laagtey...

    thanks for sharing

    ReplyDelete
  8. Rups - Thank you for your prompt comment!

    ReplyDelete
  9. Solid ahe. Photovarun konihi olakhnar nahi ki ha palak ahe :P

    Chhan lagat asel..wow....

    ReplyDelete
  10. ET च्या कमेंटविषयी... पालक कूकरमध्ये थोडा जास्त शिजतो खरा, पण ही भाजी ’पळीवाढी’ स्टाईल मिळून येण्याकरता थोडा ’गचका’ आवश्यक आहे so it works well :) नाहीतर चोथापाणी वेगवेगळं राहील, असं मला वाटतं. मी कालच केली पहिल्यांदा. आवडली! :)

    ReplyDelete
  11. I made this yesterday, this is great, my picky eater daughter also liked it.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts