कांदे पोहे (Kande Pohe)
ही रेसीपी अभिजीत साठी!
कांदेपोहे हा मराठी माणसाचा आवडता नाष्ट्याचा प्रकार. 'कांदेपोहे' ह्या प्रकाराला मराठी समाजात एक वेगळेच स्थानही आहे.
Cabbage Pohe
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
२ वाट्या मध्यम जाडीचे पोहे
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१/२ टीस्पून खिसलेले आले
४-५ कढीपत्त्याची पाने
चविपुरते मीठ
१/२ लिंबाचा रस
१ टीस्पून साखर
२ टेबल्स्पून तेल
फोडणीसाठी जीरे, मोहरी, हिंग, हळद
मुठभर चिरलेली कोथिंबीर
२-३ टेबलस्पून ओले खोबरे (वगळण्यास हरकत नाही)
कृती - कांदा शक्यतो बारीक कापून घ्यावा. एका जाड बुडाच्या कढईत तेल तापवून जीरे, मोहरी, हिंग, हळद घालावे. जिरे-मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता, चिरलेली मिरची घालावी. एखादा मिनीट परतले की त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा परतत असताना एका बाजुला पोहे नीट धुवुन शक्यतो पूर्ण पाणी काढुन टाकावे. शक्य असेल तर शक्यतो पोहे चाळणीत भिजवावेत. कांदा परतत आला की त्यावर अर्धे पोहे घालावेत त्यावर मीठ, साखर घालून उरलेले पोहे घालुन नीट परतावे. वरून लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर घालून नीट परतावे.
टीप - १. बरेचदा अमेरीकेत दुकानात मिळणारे पोहे एकतर खूप जाड नाहीतर खूपच पातळ असतात. खूप जाड पोहे असतील तर कांदा परतायला घेण्याआधी थोडावेळ आधी भिजवावेत. पातळ पोहे असतील तर अजिबात न भिजवाता सरळ फोडणीत घालून त्यावर थोडे थोडे पाणी शिंपडत पोहे करावेत. थोडेफार ओलसर झाले की त्यावर मीठ, साखर आणि लिंबूरस घालून परतावे.
२. मटार, दाणे, बटाटे यापैकी काहीजरीपोह्यात घालायचे असेल तर कांदा परतत आल्यावर त्यात परतवून घ्यावे.
३. बारीक चिरलेला कोबी घालूनही पोहे अप्रतीम लागतात. त्या पोह्यात कांदा नाही घातला तरी चालतो.

एवढ्या लवकर आणि एवढा छान रिप्लाय दिल्या बद्दल खूप खूप थॅंक्य़ू. काय चुकत होतं हे ध्यानात आलं आहे. आता नक्की उत्साहाने प्रयत्न करेन.
ReplyDeleteफक्क्ड पोहे जमल्याची पोच लवकरच देईन. धन्यवाद.
~ अभिजित
arre, we are overlapping again! :-) I had post on pohe just a few days ago.
ReplyDeleteAbhijit, good to hear!! Good Luck!
ReplyDeleteET - hehehe :)