मेथीचे पिठले (Methiche Pithale)

(Link to English Recipe)

आमचे कराडचे घर अगदी शेतात होते पूर्वी. शेतकरी घरच्यापुरती का होईना मेथी, चकवत, पालक, पावटे, वांगी असली पिके लावत आणि आम्ही शेजारी असल्याने आणुनही देत असत. शेतातल्या ताज्या भाजीचा स्वाद अगदी वेगळाच. असली भाजी घरी आल्य आल्या केली जायची आणि त्यामुळे जेवताना ४ घास नक्कीच जास्त जात. आता आजुबाजुला इतकी भरपूर भाजी विकत मिळते पण त्या ताज्या भाजीची चव नक्कीच कुठे मिळत नाही. त्यावेळी मम्मी मेथीचे असंख्य प्रकार करत असे त्यातलेच एक मेथीचे पिठले!

मधे एका मैत्रिणीला जेवायला बोलावले होते. त्या दोघाना साधे आणि मराठी असे कहीतरी खायचे होते. काय करावे असा विचार करत देसी स्टोअरमधे गेले तर समोर मेथीची एकच पेंडी दिसली ती घेतली, थोडी ताजी वांगी वगैरे घेऊन घरी आले. मेथीची भाजी करायचा विचार होत पण मग अचानक मेथीचे पिठले करावे असा विचार आला. तिच ही रेसिपी -




१ जुडी मेथी
३-४ लसुण पाकळ्या
३/४ ते १ कप बेसन
१/२ कांदा बारीक चिरुन (वगळण्यास हरकत नाही)
फोडणीसाठी २ टीस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे

कृती - मेथी निवडून, धुवुन बारीक चिरुन घ्यावी. काMदा घालणार असाल तर बारीक चिरुन घ्यावा. लसुण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेलाची खमंग फोडणी करावी. त्यात लसुण घालून किन्चीत परतावे. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यात चिरलेली मेथी घालून साधारण ३-४ मिनीटे परतावे. लाल तिखट, मीठ घालुन एकदा नेट मिसळून घ्यावे. गॅस बारीक करुन मेथीमधे बेसन हळूहळू घालुन परतत जावे. साधारण ३/४ कप ते एक कप बेसन लगेल. मेथीला पाणी जास्त सुटले असेल तर बेसन थोडे जास्त लागण्याची शक्यता आहे. बेसन घालून नीट मिसळले गेले की कढईवर झाकण ठेवुन एक वाफ आणावी. गरम गरम पिठले भाकरी बरोबर वाढावे.

टीप - १. उत्तर कर्नाटकात, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात घट्ट पिठल्याला पिठले आणि पातळ पिठल्याला झुणका म्हणतात (महाराष्ट्रात अगदी उलट म्हणतात). त्यामुळे याची consistency घट्ट पिठल्यासारखी करावी.
२. लसूण शक्यतो ठेचुनच घालावा.
३. कांदा घातला नाहीतरी चव अप्रतीम येते.

Comments

  1. Anything peeth peroon is my favourite and just wait till I get some methi - this is one recipe I will make and get back....Mouth watering:)

    ReplyDelete
  2. minoti, masta vatatey recipe. karun nakki baghen. adhi mala thalipith type vatla. pan vegla ahe prakaar.

    ReplyDelete
  3. SunshineMom - Welcome to my blog! Please try and let me know :)

    Sayo - Welcome to my blog! Try it tastes yummy!

    ReplyDelete
  4. Mints,tuzhya recipes phar aavadlya...very healthy!
    Tuzhya sathi ek surprise aahey ....check out my blog!

    ReplyDelete
  5. Thanks Diksha!
    Welcome to my blog and thank you for sharing the awards!

    ReplyDelete
  6. khup chhan aahet tuzya pak-kruti.zakaas..!!

    ReplyDelete
  7. Hey, I have a question: Will this formula work for Beet greens, turnip greens, mustard greens and other greens available in American supermarkets?

    ReplyDelete
  8. Priya, Beet greens, Radish greens - yes.

    Turnip Greens may be. Mustard Greens - Not sure.

    Works great with Spring Onions!

    ReplyDelete
  9. paani bhaji hi sudha ek beedchi prasidh bhaji aahe tya vishai tumhi kahi saangu shakal ka?

    ReplyDelete
  10. khupach zakas try karanar nakki.

    ReplyDelete
  11. You are brillent!!!

    ReplyDelete
  12. डाळ मेथीची भाजीची रेसिपी कोणी सांगेल का? मेथीचे दाणे वापरून. माझी आई छान बनवते.

    ReplyDelete
  13. मस्त आयडिया! सोप्पी कृती आहे. मला जमेल!

    ReplyDelete
  14. Made this today and it turned out lovely (not that I expected anything less from your recipe). I forgot the onion, but next time I will add it for sure - it seems like some onion will go well with methi and besan. btw, my methi did not generate much moisture, so I added a couple tablespoons of water, and then added the besan. The result was a nice dry bhajee, not a ghatta pithale. Oh well, it was delicious.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts