पाटवड्या (Paata Vadyaa)

(Link To English Recipe)

माझ्या आजीची ही अजुन एक रेसिपी. तिच्या हातची गव्हाची खीर आणि पाटवड्या म्हणजे स्वर्गसुख होते. ती इतक्या पटकन करत असे की बास. माझी मम्मी, माझी एक मामी पण छानच करतात. पण आज्जीच्या हातची चव वेगळीच. एखादेवेळी सामान कमी जास्त असले तरी चव तीच, कधी तिखट कमी/जास्ती नाही. कधी मीठ कमी जास्त नाही. एका एका पदार्थाची आठवण आली की खुप अस्वस्थ होते. तिच्याकडुन खुप काही शिकले पण शिकण्यासारखे पण खुप राहीले. असो! ह्या रेसीपीचे बरेचसे प्रमाण तिचेच. पण तिच्या वड्यांना तेल जास्त घालत असे त्यामुळे थोड्या जास्त खमंग लागत माझे तेवढे तेल घालायचे धाडस होत नाही त्यामुळे मी तेल मात्र जवळपास तिच्या प्रमाणाच्या १/४ घालते.


१ कप बेसन (थोडे कमी आधीक लागेल तसे)
१.२५ कप पाणी
१/४ कप सुके किसलेले खोबरे
३-४ पाकळ्या लसुन ठेचुन
१ टेबलस्पून खसखस
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ
२ टेबलस्पून तेल (फोडणीव्यतीरीक्त)
फोडणीसाठी - २ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हळद. आवडत असेल तर कढीपत्ता

कृती - बेसन नीट चाळून गाठी काढुन घ्याव्यात. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापत ठेवावे. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, खसखस, हळद घालून नीट खमंग फोडणी करावी. अर्धे खोबरे व ठेचलेला लसूण त्यात घालुन साधारण २-३ मिनीटे परतावे. वरुन सव्वा वाटी पाणी घालून व्यवस्थीत उकळी आणावी. पाणी उकळत आले की लाल तिखट, मीठ थोडी कोथिंबीर घालावी. गॅस बारीक करुन त्यात वेसन हळुहळु घालावे. गुठळ्या होऊ नयेत म्हणुन पटापट हलवावे. संपुर्ण बेसन घालून झाले की ते घट्ट पिठल्यासारखे झाले पाहिजे. खूप पातळ वाटत असेल तर त्यात थोडे बेसन अजुन घालून नीट हलवावे. गॅस बारीक करुन एक वाफ आणावी. दणदणून वाफ आली की कडेने २ टेबलस्पून तेल सोडवे. पिठाचा गोळा नीट मिसळून घ्यावा. एका ताटाला थोडे तेल लावुन त्यावर थोडी कोथिंबीर आणि थोडेसे खोबरे पसरावे. वरून पिठले घालून वाटीच्या मागील भागाने नीट पसरावे. पिठले वाटीला चिटकत असेल तर थोडे तेल किंवा पाणी लावायला हरकत नाही. नीट पसरले की त्यावर उरलेले खोबरे, कोथिंबीर, आवड असेल तर थोडी खसखस घालुन ते त्या पिठात नीट दाबावे.लगेच वड्या पाडाव्यात. गार झाल्यावर सोडवाव्यात.

टीप - १. या वड्या गार/ गरम कशाही छान लागतात. करताना थोड्या तिखट कराव्यात तर छान लागतात.
२.या वड्यात एवढा लसूण लागतोच.

माझ्या ह्या पाटवड्या Well Seasoned Cook सुझनच्या Legume Affair साठी...

Comments

  1. Is it different from Maswadi ( I am not sure about the word I have used here )I have eaten similar dish in food festival )

    ReplyDelete
  2. HKji, मासवड्या पण बेसनाच्या असतात, पण त्यात तीळ-खोबर्याचं सारण भरतात. नुसत्या किंवा आमटी/रश्शात घालून खातात. मिनोती, माझ्या पण या वड्यांच्या आठवणी तुझ्यासारख्याच आहेत. माझी पण आजी या दोन्ही वड्या फार सुरेख करत असे, आणि आता मामी करते :) तुझं पोस्ट वाचून मलाही याचा घाट घालायचं धाडस करायला आवसान आलंय! सुरळीच्या वड्या पण लिहीशील का एकदा?

    ReplyDelete
  3. How delicious this sounds. And it is so true that there is something very special about the foods made by our loved ones. Thanks for posting such a lovely recipe.

    ReplyDelete
  4. Harekrishnji, maasvadya mhanaje kaay te priya ne lihile aahech. yaa vadyana barech lok 'pithalyachya vadya pan mhanatat.

    Priya - kar g vadya ani sang kasha jhalya te. suraLichya vadyaa lihin kadhitari.

    Vaishali - Very true!

    ReplyDelete
  5. Mints, this savory treat fascinates me. I really adore besan. : }

    Thank you for sharing it for MLLA2.

    ReplyDelete
  6. I was hoping this was maswadi:( Do you know how to make it? I have had it at a frnds, but she does not seem to be giving away the recipe! Of course this is nice too, but I am really on the look out for maswadi!

    ReplyDelete
  7. Harini, I will add the maswadi recipe sometime soon. the base is same but you need to add some filling and make rolls.

    ReplyDelete
  8. mala masswadichi recipe pahije... khup chan aahe ha blog
    Archana

    ReplyDelete
  9. Mala mas wadyachi recipe kone s angel ka ply

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts