बेक केलेला टोमॅटो सॉस पास्त्यासाठी (Baked Tomato Sauce for My Pasta)
Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/08/baked-tomato-pasta-sauce.html
सध्या मला मैत्रिणींकडुन आणि फार्मर्स मार्केटमधुन वगैरे खुप टोमॅटो मिळत आहेत. या टोमॅटोंची चवच निराळी मस्त गोडसर. काही आठवड्यापुर्वी मला माझ्या पॉटरीच्या क्लासमधल्या एकीने तिच्या घरच्या बागेतले Heirloom टोमॅटो दिले. तसेच ते तिने क्लासमधल्या अजुन एकीला दिले. आम्ही त्या टोमॅटोविषयी बोलत असताना मी सहज तिला ती या टोमॅटोचे काय करणार आहे असे विचारले. तेव्हा मला तिने ही पास्ता सॉसची रेसीपी दिली -
Pasta is Ready!
(हे प्रमाण २-३ माणसांसाठी आहे)
४ मोठे पिकलेले टोमॅटो
१ मोठा कांदा
१ ढबु मिरची
२ टेबलस्पून ऑलिव ऑइल
२ लसुण पाकळ्या
१/४ टीस्पून प्रत्येकी सुकवलेले हर्ब्स - ओगेगनो, बेझील, रोझमेरी
चवीप्रमाणे मीठ
ताजी मीरी पावडर
पास्त्यासाठी:
२ कप पास्ता (मी पेन्ने ह्या आकाराचा whole wheat पास्ता वापरला)
चिमुटभर मीठ
१/२ टीस्पून ऑलिव ऑइल
कृती - ओव्हन ३२५ डिग्री फॅरेनहाईट तापमानावर प्रीहीट करायला ठेवावा. एका बेकींग डिशमधे अल्युमिनिअमची फॉइल लावावी. त्यावर निम्मे ऑलिव ऑइल घालुन त्याच लसुण ठेचुन घालावा. टोमॅटो, कांदा, ढबु मिरचीचे पातळ काप करुन घ्यावेत.
Layered Vegetables
टोमॅटोच्या चकत्या कापाव्यात. ढबु मिरचीतल्या बिया काढुन टाकाव्यात. मिरची आणि कांदा पण उभा कापुन घ्यावा. आता बेकिंग डिशशमधे टोमॅतो खाली लेअर करावेत. त्यावर मीठ आणि मिरीपुड भुरभुरावी. त्यावर सर्व हर्ब्स अर्धे अर्धे घेउन ते भुरभुरावेत. त्यावर कांदे आणि टोमॅटोची लेअर करुन त्यावरही मीठ, मिरपूड, उरलेले हर्ब्स भुरभुरावेत. उरलेले तेल (१ टेबल्स्पून) वरुन पसरावे. डिश ओव्हनमधे ठेवुन ४५ मिनिटे बेक करावे.
Baked Vegetables
ते बेक होत असताना पास्ता पाकिटावरच्या सुचनेप्रमाणे पस्ता शिजवुन घ्यावा शिजवताना किंचीत मीठ घालावे. शिजलेला पास्ता गाळुन बाजुला ठेवा. त्यात तेल घालुन नीट मिसळावे.
४५ मिनीटांनंतर बेकिंग डिश ओव्हनमधुन बाहेर काढुन ५ मिनीटे तशीच ठेवुन एक वाफ जाऊ द्यावी. एखाद्या फोर्कने भाज्या सगळ्या एकत्र मिसळाव्यात आणि पास्ता सॉस सारखे मिसळावे. हा सॉस शिजवलेल्या पास्त्यावर ओतुन नीट मिसळावे.गरज असेल तर थोडे मीठ, मिरपुड घालावी. आवडत असेल तर थोडे हर्ब्स चुरुन वरुन भुरभुरावेत.
टीप - Heirloom टोमॅटो खुप रसदार आणि मोठे असतात. त्यामुळे ते ४ पुरतात. ग्रोसरी स्टोअरमधले टोमॅटो वापरायचे असतील तर साधारण ५-६ तरी लागतील. रोमा टोमॅटो वापरणार असाल तर साधारण ८-९ लागतील. जर सुपर्मार्केट मधले(ग्रोसरी स्टोअरमधले) टोमॅटो वापरणार असाल तर साधारण २०-२५ मिनीटाने बेकिंग डीश अजुन एका अल्युमिनिअमच्या फॉईलने झाका म्हणाजे सॉस खुप कोरडा होणार नाही.तुम्हाला ताजे हर्ब्स मिळणे शक्य असेल तर कोरड्या हर्ब्सच्या ऐवजी बारीक शिरुन प्रत्येकी १ टेबल्स्पून वापरावेत.
हा पास्ता DK च्या AWED - Italiano या इव्हेंटसाठी!

Hey Mint, sagalya recipes mast aahet.
ReplyDeleteMaza Recipe Center blog check kar tithe tuzyasathi treat aahe
Neat recipe! Quite hassle free too.
ReplyDeleteThanks Trupti!
ReplyDeletePriya - thank you! yes indeed!