धानसाक (Dhansaak)

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/dhansaak

पुण्याला काकुकडे जायचे तेव्हा ती आवर्जुन नवीन काहीतरी करुन घालत असे. त्यातलाच एक पदार्थ धानसाक- पारसी पद्धतीचा डाळ भात (धान - भात, शाक्/साक = डाळ/भाज्या). वेगवेगळ्या डाळी असलेली मस्त डाळ आणि थोडासाच मसाला घातलेला 'ब्राउन' राईस. लग्गेचच तिच्याकडुन शिकुन घेतला होता. पुढे बरेचदा केला पण होता. भारतातुन इकडे आल्यावर अभ्यास आणि नोकरी या चक्रात आडकल्यावर कधि विसरुन गेले ते समजलेच नाही. पण माझी हेअर ड्रेसर आहे ती आहे पारसी. तिने मला बरेचदा हा पदार्थ नंतर खाउ घातला. तसेच मसाला पण दिला, रेसिपी दिली. तो दिलेला मसाला असा किती दिवस पुरणार. मग तिच्याकडुनच एका पुस्तकातुन मसाल्याची रेसीपी आणली. तो मसाला १-२ वेळा करुनही पाहीला. ती वही नंतर कुठेतरी हरवली. मग माझे हात परत ठप्प. मधे कधीतरी सहज शोधत असताना नुपुरच्या ब्लॉगवर आणि Zlamushka च्या ब्लॉगवर मला धानसाक मसाल्याची रेसीपी दिसल्यावर मला एखादी जुनी मैत्रिण भेटावी तसा आनंद झाला! त्यात मी माझ्या पद्धतीने थोडासाच (अगदी थोडासाच) बदल करुन झालेला हा धानसाक मसाला -

१ टेबल्स्पून जीरे
१ टेबलस्पून धणे
३ लाल मिरच्या
१ टीस्पून खसखस
१ टीस्पून मेथी
१ टीस्पून बडीशेप
१ इंच दालचिनी (पुर्ण सुरळी असते ती)
५-६ मिरे
८-१० लवंग
१/२ टीस्पून जायफळ (जायपत्री असेल तर ती वापरावी)
१ मोठी वेलची किंवा २ लहान वेलच्या

सर्व मसाले कोरडे भाजून गार केल्यावर बारीक पूड करून ठेवावी. ही पावडर साधारण ५-६ टेबल्स्पून येवढी होते. हा मसाला एखाद्या कोरड्या बाटलीत भरुन कोरड्या ठिकाणी ठेवला तर ३-४ महीने टिकु शकतो.

Dhansaak

हा धानसाक मसाला वापरून बनवलेली ही डाळ -
१ कप तुरीची डाळ
१/२ वाटी भोपळ्याचे तुकडे (बटरनट स्क्वाश वापरला तरी चालतो)
१ कप चिरलेला पालक
१/२ बटाटा (मुठभर मोठ्या आकाराचा)
१ लहान वांगे
२ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी २ लवंगा, एक लहान वेलची, २ तमालपत्रे, १/२ इंच दालचिनीचा तुकडा, हळद, जिरे
१ टेबलस्पून धानसाक मसाला
चवीप्रमाणे लाल मिरची पावडर (१/२ टीस्पून ते १ टीस्पून)
चवीप्रमाणे मीठ
लागेल तितके पाणी

डाळ धुवुन कुकरच्या भांड्यात घ्यावी. त्यात पालक सोडुन बाकीच्या सर्व भाज्या चिरुन घालाव्यात. हे डाळ आणि भाज्याचे मिश्रण कुकरला ३ शिट्ट्या करुन मऊ शिजवुन घ्यावे. प्रेशर उतरल्यावर रवीने किंवा बीटरने नीट घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून, तमालपत्र, जिरे, वेलची, लवंग, दालचिनी घालून तांबूस रंगावर भाजावे. त्यात हळद घालुन अगदी १०-१५ सेकंद परतावे. त्यात घोटलेली डाळ घलावी. त्यात थोडे पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, धानसाक मसाला घालावा. त्याचे वेळी चिरलेला पालक घालुन नीट ढवळावे. झाकण झाकुन नीट उकळी आणावी. डाळ घट्ट वाटत असेल तर अगदी थोडेच पाणी एकावेळी घालावे. नीट उकळले केले की खाली उतरावे. एकदम फार पाणी घालु नये कारण ही डाळ पिठल्याइतपतच पातळ असते आमटीइतकी पातळ नसते.

त्या धानसाक साठी बनवायचा स्पेशल भात -
१ वाटी तांदूळ
१ लहान खडा गुळ
१ दालचीनीचा तुकडा
१/२ चमचा जिरे
१/२ टीस्पून धानसाक मसाला
चवीप्रमाणे मीठ
१ टीस्पून तेल
२ वाट्या गरम पाणी

तांदुळ धुवुन बाजुला ठेवावेत. एका जाडबुडाच्या पातेल्यात तेलतापवुन त्यात जिरे, दालचीनी घालुन तांबुस होईपर्यंत परतावे. त्यात गुळाचा खडा फोडुन घालावा. गुळ वितळून नीट कॅरामल होईपर्यंत परतावे. गुळ नीट वितळाला की त्यात तांदुळ घालून परतावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. वरुन २ वाट्या पाणी गरम करुन घालावे. नीट ढवळून गॅस बारीक करुन भात नीट मऊ शिजवुन घ्यावा.

एखादे साधे सॅलड सोबत असेल तर हा एकवेळचा पूर्ण आहार होतो. भातात आणि डाळीत दोन्हीमधे मसाला असल्याने लाल तिखट खुप घालु नये. कारण मसाल्याचा चटका येतो.


Comments

  1. Hmm... mee haa prakaar kadhi khaallaa naahiye. Karun pahaaylaa havaa! pohyaachyaa masalyaabarobar haa paN aalaa tar jamu shakel ;-)

    ReplyDelete
  2. waa ga waa, pohyacha masala itaka motha prawas karun tikade yenare? mag bay olandun ikade ka nahi? ;) ;)

    ReplyDelete
  3. Priya - vaat bagh ;)
    sumedha tu pan vaat bagh :P

    ReplyDelete
  4. my wife does make Dhansak and Brown rice many times.
    Actully this is primarly non-veg dish as Parsis add maeat, mutton in Dhansak.

    But the Veg. version tastes equally terrific.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts