काळ्या हरब-याची उसळ (Black Chana Usal)

Here is link to English Version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/blackchanausal

Black Chana Usal

मालवणमधे काळ्या वाटाण्याचे सांबार आणि वडे हा प्रकार अतिशय आवडीने खाल्ला जातो. मायबोलीवर ब-याच वर्षापुर्वी मी एका मुलीला रेसीपी दे म्हणाले आणि तिने पण अगदी पटकन दिली मला रेसीपी. काळाच्या ओघात आणि माझ्याकडे असलेल्या सामानानुसार मी त्यात थोडेफारबदलही केले. माझ्याकडे काळे वाटाणे भारतातुन आणले तरच असतात. इथल्या भारतीय दुकानांमधुन मला महाराष्ट्रीयन मसाले वगैरे फार अलिकडे मिळायला लागले. तोपर्यंत भारतातुन थोड्या प्रमाणात आणायचे आणि जितके दिवस जातील तितके दिवस पुरवायचे असेच असायचे.
साधारण २-३ महिन्यापुर्वी एका ब्लॉगर मैत्रिणीने मला मालवणी मसाला दिला. तो मसाला वापरुन मग मी मसुर उसळ केली. अजुन काय करता येईल असा विचार चालु असताना काळ्या वाटाण्याच्या सांबाराची आठवण झाली. पण मग वाटाणे मिळेनात म्हणुन मग काळ्या चण्याची उसळ केली आणि अप्रतीम झाली. त्यात थोडेफार बदल करुन झालेली ही उसळ.

Black Chana Usal

३ वाट्या भिजवून मोड आणलेले काळे चणे (हरबरे) *
३-४ टेबलस्पून ओले खोबरे
३-४ आमसुले
२ टीस्पून मालवणी मसाला (के.प्र. मसाला)
२ पाकळ्या लसुण
छोटा तुकडा आले
लहान खडा गुळ
मीठ चवीप्रमाणे
लाल तिखट आवश्यकते नुसार
१/२ वाटी कांदा बारीक चिरलेला (वगळला तरी हरकत नाही)
फोडणीसाठी - १ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद

कृती - कृती - भिजवुन मोड आणलेले हरबरे कुकरला लावुन मऊ शिजवून घ्यावेत. शिजवताना १/२ टीस्पून मीठ घालावे. खोबरे, आले, लसुण एकत्र वाटुन घेणे. वाटण खुप बारीक असु नये.चणे शिजवुन थोडे थंड झाले की एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालुन तापवावे. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करावी. जिरे मोहरी तडतडली की हळद, हिंग घालावा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून नीट गुलबट रंगावर परतावा.कांदा परतून झाल्यावर त्यावर शिजवलेले चणे घालावेत. पातेल्यावर जाकण ठेवुन ३-४ मिनीटे नीट वाफ येउ द्यावी. झाकण काढुन लसुण-आले-खोब-याचे वाटण, मालवणी मसाला, मीठ घालून नीट हलवावे. उसळ थोडी रसदार असते त्यामुळे गरज असेल तर थोडे पाणी घालावे. परत झाकण ठेवुन एक वाफ येउ द्यावी.झाकण काढुन गुळ आणि आमसूल घालावे. एक उकळी आणुन बंद करावे. वरुन चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप - १. * चणे ८-९ तास भिजवुन उपसावेत. थोडे कोरडे होउ द्यावेत. नंतर एका फडक्यात बांधुन कमीत कमी २४ तास उबदार जागेत ठेवावेत. उन्हाळ्यात नीट मोठे मोठे मोड येतात. पण थंडीत येत नाहीत. अशावेळी नुसतेच भिजवून कुकरला शिजवून घ्यावेत.
२. भिजवलेले चणे कुकरमधेच ठेवुन ३ शिट्ट्या कराव्यात. भांड्यात ठेवुन शिजवले तर ४-५ शिट्ट्या तरी कराव्या लागतात.
३. उकळताना मीठ, अमसूल, गूळ शक्यतो शेवटी घालावा.

ही उसळ दीपाच्या RCI: Konkan साठी आणि Lucy's My Legume Love Affair.

My Legume Love Affair चे आगामी होस्ट्स इथे आहेत -- http://thewellseasonedcook.blogspot.com/2008/09/my-legume-love-affair-host-lineup.html

Comments

  1. Just beautiful!

    Thank you so much for joining us in the event.

    ReplyDelete
  2. Mints, I love all those flavors you have going on there, with the kokum, jaggery and coconut. I've never had Malvani masala before, so am intrigued. Have to look for it on my next visit to the Indian grocery store.

    ReplyDelete
  3. I did not realize it only takes about twenty four hours to sprout beans.

    This is a lovely recipe, Mints. I do adore channa in everything.

    ReplyDelete
  4. Lucy, my pleasure!

    Vaishali - I got inspired by the combo of kokum, jaggery and Coconut. Somehow I associate with my Mom's cooking. Let me know if you can get the Malvani Masala. I will be happy to share some of mine as well.

    Susan, in warm summer days you can get Black Chana to sprout in 24 hrs. I don't even try in winter, it gets frustrating ;) I am lucky to be in Bay Area so I get sprouted beans if I needed in jiffy.

    ReplyDelete
  5. नमस्कार कराडकार.
    मी तुझा ब्लॉग नेहमी वाचते. मला जरा अजून माहिती हवी होती.
    मला पॉटरी शिकायची अाहे. काही चांगले पर्याय अाहेत का?
    - मी पुणेकर. (सध्या Santa Clara व Fremont भागात)

    ReplyDelete
  6. PMK - Blossom Hill Crafts in Los Gatos (private studio)
    Sunnyvale Community school, Sunnyvale
    Fremont Community school, Fremont

    has pottery classes. You can Google these names to get more info.

    ReplyDelete
  7. Got one imp. tip here - k.pra.masala = Malvani Masala. - Thank you for that.
    For the past 2 years Kale/Hirve/Safed Vatane have just disappeared from the asian shops here. Substite of Kale vatane from Spain cant give expected results. Looking forward to a trip to India.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts