गाजराचे पॅनकेक (Carrot Pancakes)

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/carrotpancakes

मला पॅनकेक खुप आवडतात. मस्त मऊसूत पॅनकेकचा स्टॅक त्यावर मेपल सिरप आणि स्ट्रॉबेरीज असा सरंजाम असेल तर मग बाकी काही नसले तरी चालते. पण बाहेर विकत मिळणा-या पॅनकेकमधे अंडी असल्याने तो प्रकार माझ्यासाठी बंद झाला. विकत मिळणा-या पॅनकेक मिक्समधे मैदा आणि साखर असल्याने ते पण बंद झाले. त्यामुळे मग आपला हात जगन्नाथ सुरु केले. आता वेगवेगळ्या प्रकाराने पॅनकेक बनवते. मला कॅरटकेक आवडात असल्याने गाजराचे पॅनकेक करुन पाहीले आणि मस्त झाले. तोच हा प्रकार.

१/३ कप गव्हाचे पीठ
१/३ कप सोयाबीनचे पीठ
१/३ कप ओटचे पीठ **
१ टेबलस्पून जवसाची पूड
१/३ कप किसलेले गाजर
१/२ टीस्पून बेकिंग सोडा
२ टेबल्स्पून साखर
चिमुटभर मीठ
१-२ वेलदोड्याची पूड
१ कप पाणी

Carrot Pancakes

कृती - एका भांड्यात जवसाची पूड आणि १ चमचा पाणी घेउन २-३ मिनीटे नीट फेटा. त्यात साखर, गाजर, वेलदोड्याची पूड, मीठ, घालून मिसळावे. त्यात सगळी पिठे घालून नीट मिसळावे. वरुन १ कप पाणी घालुन साधारण भज्याच्या पिठाइतपत पातळ होउ द्यावे. वरुन बेकिंग सोडा घालून चमच्याने भराभर फेटावे. मिश्रणाला थोडे बुडबुडे येतील. तवा तापवुन मोठ्या पळीने एक पळी पीठ तव्यावर घालावे. डोश्याला पीठ पसरतो तसे पसरु नये. वरील बाजुने कोरडे झाले की पॅनकेक उलटावा. असे ३-४ पॅनकेक झाले की त्याचा स्टॅक करुन त्यावर केळ, स्ट्रॉबेरी, वगैरे घालावे. त्यावर मेपल सिरप घालुन खावे. मेपल सिरप नसेल तर मध पण छान लागतो.

** मी इंस्टंट कुकिंग ओट्स मिक्सरमधे बारीक करुन पीठ करते किंवा नॉन फ्लेवर्ड इंस्टंट ओट्मील वापरते.
टीप -
१. जर मध वापरला नाही तर ही रेसिपी वेगन होते.
२. आवडत असतील तर पिठात १ टेबलस्पून बेदाणे घालावेत.

ही रेसिपी अपर्णाच्या WBB: Grains in My Breakfast साठी!
ही रेसीपी सुगन्याच्या JFI- Whole grains साठी सुद्धा ....

Comments

  1. These are so good, Mints.
    We like pancakes too, and though we do eat eggs, the eggy smell and taste in most recipes puts us off.
    So I have also come up with a few recipes to suit us.
    Thanks for the entry to WBB>

    ReplyDelete
  2. These are so good, Mints.
    We like pancakes too, and though we do eat eggs, the eggy smell and taste in most recipes puts us off.
    So I have also come up with a few recipes to suit us.
    Thanks for the entry to WBB.

    ReplyDelete
  3. Harini, Priya - Thank you!

    Aparna, I did not eat eggs mainly due to the smell and later stopped due to becoming partial(?!) vegan.

    ReplyDelete
  4. good recipe..very healthy indeed and quite filling too...

    ReplyDelete
  5. जर सोयाबीनचे पीठ वापरायचे नसेल तर काय करायला पाहिजे?

    ReplyDelete
  6. Anonymous, tumhi kuthe rahata mahitu nahi. pan tumhala quinoa flour vaparataa yeil ani te hi miLat nasel tar saraL gavhaache peeth vaaparaa.

    ReplyDelete
  7. वा वा, छानच. मस्त रविवारचा सकाळची न्याहरी होणार ही :)
    गव्हाचे पीठ वापरून बघेन. मी बे एरियामध्ये आहे.

    ReplyDelete
  8. good one n new to me. but very healthy recipe. thx for sharing.

    ReplyDelete
  9. मिंटस्,
    मस्त झाले होते पॅनकेक! पहिल्यांदा जरा शंका आली पीठ एकत्र केल्यावर पण भाजल्यावर जी चव आली ती मस्तच!
    १०० पैकी १०० :)

    ReplyDelete
  10. mi saral batter vaprun pan cakes banavate....pan hi recipe aavadali...pan 2 shanka....javas pud ka vaparayachi?? aani oat nahi vaparale tar chalnar nahi ka? pls reply asap....kadhi hi recipe karun baghate asa zalay....tuzya baryach recipes karun baghate...especially mala carrot cake aani paav faar aavadale...shubhechcha...

    ReplyDelete
  11. Megha, javaspood muLe chikaTapaNaa yeto aaNi oats nahi vaparale tari chalateel tyaaivaji jastiche gavhaache peeth ghala.

    ReplyDelete
  12. Hi Mints

    Nice blog and delicious recipes!! I recently tried your Moogacha dosa recipe and it was very very tasty.

    We are great fans of pancake too!! We are currently using the instant pancake mix but like you mentioned this looks healthier too. I am definitely going to try this recipe.

    Could you please tell me If I can find javas pood and soyabean flour in indian store?

    I am in bay area so probably I should be able to get these items easily.

    ReplyDelete
  13. Sampada, Thank you.
    You will be able to get both of these in Trader Joes dont have to go to Indian store. Also you can skip the soyabean flour and use oat flour.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts