अंबाडीची भाजी (Maharashtrian style Gongura Bhaji)
Here is link to English version of this recipe -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/09/ambadichi-bhaji.html
इथे आल्यावर पहिल्यांदा दिसलेली पालेभाजी (पालक सोडुन) कोणती तर अंबाडी. मेथी पण मिळेपर्यंत ६ महीने जावे लागले होते. इथे गोंगुरा नावने मिळणा-या बाजीकडे पाहुन एक्दम भरुन बिरुन आलेले. माझ्या नशिबाने मम्मीबरोबर म्हणा एकटीने बरेचदा भाजी आणलेली असल्याने भाज्या तरी कळत होत्या. ती पेंडी घरी आणुन निवडायला घेतली आणि कळले की भाजी जून अहे. काड्या काढुन टाकुन फक्त पाने तेवढी घेतली. भाजी शिजवायला घेताना लक्षात आहे की माझ्याकडे भाजीत घालायला ज्वारीच्या कण्या नाहीत. मग आता काय करायचे असा विचार करुन थोडावेळ थांबले आणि थोडी तूरडाळ घातली. पण त्याची चव मला खुपशी आवडली नाही. मग पुढच्या वेळी करताना थोडे तांदुळ घातले. एकदा तर दलिया पण घालून पाहीला. पण सगळ्यात जास्त तांदुळाची चव आवडली. साधारण वर्षभरात मला ब्राउन राईस चा शोध लगला. तो घालुन भाजी शिजवली ती सगळ्यात जास्त छान लागली.
आमच्या घराशेजारी शेतकरी रहात असल्याने बरेचदा शेतातुन काढलेली भाजी तव्यात आणि तिथुन ताटात पडे. त्यामुळे कोवळी ताजी भाजी खायची सवय असलेल्या माझ्या जिभेला इथली शिळी भाजी खाताना चव वेगळी आहे हे लगेच जाणावायचे. आता सगळ्याची सवय झाली.
Maharashtrian style Gongura Bhaji
१ पेंडी अंबाडीची भाजी
मुठभर तांदुळ (मिळत असेल तर ज्वारी वापरावी)
३-४ लसुण पाकळ्या (ठेचुन किंवा चिरुन)
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट
लहान खडा गुळ
२ टेबल्स्पून तेल
१/२ टीस्पून हळद, जिरे.
१/२ कप पाणी
कृती - अंबाडीच्या भाजीची फक्त पाने घ्यावी दांडे अजिबात घेउ नयेत. तांदुळ किंवा ज्वारी मिक्सरवर भरडुन रवा करावा. निवडलेली भाजी धुवुन चिरुन घ्यावी त्यात तांदळाचा/ज्वारीचा रवा घालुन पाणी घालुन कुकरला थोडे पाणी घालुन २ शिट्ट्या करुन घ्याव्यात. कुकरचे प्रेशर उतरले की भाजी पळीने घोटुन घ्यावी. त्यात मीठ, लाल तिखट आणि गुळ घालावा. एका पातेल्यात १/२ टीस्पून तेल तापवुन त्यात जिरे आणि हळद घालावी. जिरे तडतडले की त्यात घोटलेली भाजी घालावी. झाकण ठेवुन एक वाफ आणावी. फोडणीच्या पळीमधे उरलेले तेल घालुन तापवावे. तापलेल्या तेलातठेचलेल्या लसुण पाकळ्या घालुन गॅस बारीक करावा. त्यात थोडे लाल तिखट आणि मीठ घालावे. लसणाच्या पाकळ्या कुरकुरीत कराव्यात. भाजी ताटात वाढल्यावर लसणाचे एक चमचा तेल भाजीवर वाढावे. आणि ते मिसळून भाजि भाकरी किंवा चपातीबरोबर खावी.
टीप -
१. लसणीचे तेल करायचे नसेल तर भाजीवर मीठ, तिखट घालून त्यावर कच्चे तेल घालुन खावे आणि लसुण फोडणीत घालावा.
२. भाजी खुपच अंबट होइल असे वाटले तर भाजि शिजवलेले पाणी काढुन टाकावे.
ही भाजी हरिणीच्या FIC: Green साठी ....

Nice to know about the Maharashtrian way of making Gongura chutney!..looks tempting!
ReplyDeleteझकास! लसणीची फोडणी वगैरे... करायलाच हवी एकदा! आमच्या इथे Indian store नसल्याने आंबाडी मिळणार नाही. आंबट चव असलेल्या दुसऱ्या कुठल्या American grocery store मध्ये मिळणाऱ्या greens ची होऊ शकेल का अशी भाजी?
ReplyDeletePriya, itakyaa ambaT chavichi bhaji kuThali miLel kI naahI maahitI naahI. paN methIchyaa kinva paalakaachyaa bhaajit chinch ghaloon varun ashi foDaNI ghyayachi. Chaanach lagate.
ReplyDeleteThis is just mouthwatering, Mints. I haven't been able to find ambade since moving here, but I miss that tangy taste.
ReplyDeleteमिंट्स,
ReplyDeleteमला पिझ्झा बेकींग च्या टीप्स हव्या आहेत. माझ्याकडे ग्रिल व मायक्रोवेव्ह असे ऑप्शन्स असलेला मायक्रोवेव्ह आहे. (कन्व्हेक्शन नाही. कारण कन्व्हेक्शन हिटींग हे मेनली नॉन वेज साठीच उपयोगी आहे असे कळले!) तर त्यात कसे करावे? What is the difference between baking and roasting/ Grilling?
Also can I use this type of oven for 'preheating'? What is the concept of Preheating?
पिझ्झा आधी तयार करुन ठेवून आयत्यावेळी फक्त गरम केले तर चालेल का?
नविन काहीच लिहायच नाही असा निश्चय वैगरे केला आहेत काय ?
ReplyDeleteमराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ReplyDeleteही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!
दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!
आपला,
अनिरुद्ध देवधर
U can use left over rice/fresh rice just smash it little and add. Always drain water frm it otherwise it will be too sour.
ReplyDelete