डाळ इडली(Dal Idli)

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/daalidli2

मायबोलीवर बरेच लोक आपापल्या रेसिपी देत असतात. ब-याच रेसीपीसज करुनही पाहिल्या जातातच असे नाही. पण मला एका मैत्रीणीने सांगितले की प्राचीने दिलेली ही डाळ ईडली अप्रतिम होते म्हणुन मग मी लगेच करुनही पाहीली. तिच ही रेसिपी. तिने लिहिले होते तसेच केले सगळे फक्त माझ्याकडे गाजरं होती ती मिक्सरवर बारिक करुन घातली.

Dal Idli

१ कप मूगडाळ
१/२ कप उडीदडाळ
२ पाकळ्या लसुण
२-३ लाल मिरच्या
१ टीस्पून जिरे
मीठ चवीप्रमाणे
१ मोठे गाजर

कॄती -
दोनही डाळी एकत्र करुन धुवुन कमीत कमी ४-६ तास भिजत ठेवाव्यात. भिजवतानाच त्यात लसुण आणि मिरच्याही घालाव्यात. ४-६ तासांनी वाटताना त्यात मीठ आणि जिरे घालुन वाटावे. गाजर मिक्सरमधुन काढुन तेदेखिल पिठात मिसळावे. पिठ अंबवायची गरज नाही. लगेचच नेहेमीप्रमाणे इडलीपात्रात इडल्या कराव्यात. पिठाची कन्सिस्टन्सी इडलीच्या पिठासारखी असावी. गरम गरम इडल्या चटणीसोबत वाढाव्यात.

टीप -
गाजराऐवजी कोबी, मटार वगैरे एखादा वाटी घातला तरी हरकत नाही.

या इडल्या श्रीवल्लीच्या Legume Love Affair-Seventh Helping साठी जो सुझनने चालू केला आहे.


Comments

  1. तू हे असं नेहमी कुणालातरी पदार्थ डेडिकेट का करतेस?

    ReplyDelete
  2. Its not dedication. I send it to various events. and there are so many events going on, my recent posts have been for events only ;)

    ReplyDelete
  3. I just told Priya the recipe for Adai. The exact same batter (except I add as many lentils as available and little bit of rice in the mixture). But I do "adai" of this, not Idli. Should try Idli too! For those who don't have Idli paatra/steamer handy, or need a quicker recipe, Adai may be better :)

    ReplyDelete
  4. Thats a innovative dish mints..thanks for sending it across!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts