कैरीची कढी (Kairichi Kadhi)

Here is the link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/kaireechikadhi

अलिकडच्या भारतवारीत मामाकडे गेले होते. घरच्या सगळ्या आंब्याच्या झाडांची वाट लागलेली आहे. आजीकडे तोतापुरी आंब्याचे एक झाड होते. मस्त आंबटगोड चवीचे पोपटी रंगाचे आंबे लागत त्याला. पिकल्यावर त्या आंब्यात किडा होतो असे कुईतरी सांगितल्यामुळे त्या झाडाचा आंबा पिकण्याआधीच उतरवला जायचा. त्या झाडावर सतत पोपटांचा थवा असे. झाडाला इतके आंबे असत तरी घरच्यांच्या वाटेला शक्यतो फुटलेला, पोपटांनी खाल्लेला आंबाच येत असे कारण तो आंबा विक्रीला पाठवु शकत नसत. आणि एवढा फुटका आंबा संपवल्याशिवाय कशाला चांगल्या आंब्याला हात लावायचा असा आज्जीचा सरळ हिशोब असे. अशा आंब्याचे ती लगेच खाता येईल असे लोणचे करत असे. फुटलेल्या आंब्याचे करे म्हणुन नाव फुटं लोणचं. आमच्या घरचा आंबा पण असाच चविला आंबट गोड आहे. कैरी या नावाला अगदी न शोभणारा! अगदीच आंबटपणा कमी आहे त्याला. त्यामुळे आमच्याकडे पण उन्हाळ्यात फुटं वगैरे प्रकार बरेचदा असतो. बरोबरीने मग मम्मी त्याचा चुंदा पण करुन ठेवते.

इथे मिळण-या कै-या पण त्याच प्रकारात मोडणा-या असल्याने माझे पण मम्मीला विचारुन काही ना काही प्रयोग चालु असतात. पण हा प्रकार मात्र अगदी टाकावुतून टिकावु या प्रकाराने जन्माला आला आहे. एकदा कैरीचा तक्कू करायला ठेवला आणि त्यात चुकुन पाणी ओतले गेले मग त्यावर थोडे सोपस्कार करुन तयार झालेली ही कढी. पण परत करताना मात्र मग थोडा फेरफार करुन नीट केली आहे.

Kaireechi Kadhi

(हा जांभळा बाऊल अलिकडे केलेल्या कुंभारकामाचा नमुना आहे. तो निळसर रंग फोटो काढताना पडलेल्या लाईटमुळे आलेला नसुन भांडे भाजायच्या भट्टीतल्या तापमानच्या बदलामुळे आलेला आहे.)

१ कैरी
३ कप पाणी
२-३ टेबलस्पून बेसन
२ मिरच्या (हिरव्या किंवा लाल)
मुठभर कोथिंबीर
फोडणीसाठी - १ टेबलस्पून तेल, हिंग, हळद, कढीपत्ता, १/२ टीस्पून मेथ्या
चवीप्रमाणे मीठ, गुळ

कृती - कैरी धुवुन, साल काढुन बारीक खिसुन घ्यावी. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेलाची हिंग, मेथी, कढीपत्ता, हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात कैरीचा खिस घालुन एखादा मिनीट परतावे. त्यात पाणी घालुन उकळायचा ठेवावे. पाणी उकळत असताता बेसन थोड्या पाण्यात कालवून त्यात मीठ, गूळ घालुन ठेवावे. एक उकळी आली की कालवलेले बेसन त्यात ओतावे. गॅस बारिक करुन नीट उकळी आणावी. वरुन कोथिंबीर घालावी. गरमगरम भाताबरोबर वाढावे. नुसते सूपसारखे प्यायला पण मस्त लागते.

टीप -
१. किसलेली कैरी कधी कधी दातात येते ते ब-याच लोकाना आवडत नाही त्यामुळे थोडे पाणी घालून मिक्सरमधुन काढून घेतले तरी हरकत नाही.
२. कैरी नसेल तर एखाद्या हिरव्या सफरचंदाचा पण हा प्रकार करता येईल.

ही आंबटगोड कढी हरिणीच्या FIC-Yellow साठी ...


Comments

  1. Minoti, I understood but I want everybody else to understand too! This is a great recipe and I would like it if you send me the English version in mail - it is alright if you not post it! I have stopped making kadhi because I avoid milk products as much as possible and I am sure there are many vegans here who are going to love this - thank you and do send me the English version, dear!!

    ReplyDelete
  2. Me again, to say I found the English link and will use that! Thank you:)

    ReplyDelete
  3. Matichi bhandi tumhi Ghari banavta ka? For your personal use?

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts