आंबट बटाटा (Sour Potatoes)

कोकणी, केरळी, आणि बंगाली पदार्थांबद्दल मला अतिशय आकर्षण आहे. त्यातल्या त्यात रोजच्या भाज्या वगैरे तर खुपच. मासे खात नसुन देखील मी त्या रेसिपीज वाचते कारण ते करण्याची पद्धत वाचायची उत्सुकता असते. माझ्या एका मैत्रिणीचा, प्रियाचा, मला अतिशय हेवा वाटतो त्याचे एकमेव कारण म्हणजे तिची रूममेट बंगाली आणि जवळचा मित्र मल्याळी आहे. एकाहुन एक सरस पदार्थ तिला पहायला आणि चाखायला मिळतात. खोब-याचा खुप वापर करतात वगैरे कितीही खरे असले तरी एखादेवेळी खाण्यासाठी मला हे पदार्थ आवडतात. असाच एक ब्लॉग सापडला मला - अश्विनीचा -बर्याच कोकणी रेसिपीज आणि मस्त फोटो. एकदम प्रेमातच मी! हळुहळु एकेक पदार्थ करायला लागले. तिने बरेच दिवसात काही लिहिले नाही म्हणुन तिला इमेल देखील पाठवले.त्यातच मला रसचंद्रिका नावाचे एक पुस्तक मैत्रिणीकडुन मिळाले मग काय सपाटाच लावला मी हे पदार्थ करायचा. ही रेसिपी पण अश्विनीची आणि रसचंद्रिका मधुन बघुन जे पटेल ते घेउन केली आहे.



२ मोठे बटाटे
१/४ कप ओले खोबरे
१ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हळद
चविप्रमाणे मीठ
लहान खडा गूळ
१ टीस्पून जिरे
२-३ लाल मिरच्या (चविप्रमाणे कमी जस्त करायला हरकत नाही)
२ टीस्पून मेथ्या (बिया)
१/२ टीस्पून मोहरी
१ टीस्पून तेल
चिमुटभर हिंग
एका लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन

कृती - बटाटे सोलुन त्याच्या फोडी किंवा जाड उभे काप करुन घ्यावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवावे त्यात मोहरी, १ टीस्पून मोहरी घालावी. तडतडली की बटाटे घालुन थोडेसे परतावे. त्यावर हळद, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ घालावे. बटाते बुडतील इतके पाणी घालुन मंद आचेवर बटाटे शिजवावेत. ते शिजत असताना उरलेली १ टीस्पून मेथी भाजुन घ्यावी, तसेच लाल मिरच्या भाजाव्यात. मेथी, खोबरे, मिरच्या मिक्सरवर बारिक वाटावे. बटाटे शिजत आले की त्यात हा वाटलेला मसाला घालुन बारिक गॅसवर उकळावे.
गरम भाताबरोबर अथवा चपातीबरोबर खावे.

टीप -
१. मिरच्यांचा अंदाज नसेल तर लाल तिखट घालावे.
२. मी चिंचेऐवजी आमसूल घालून करुन पाहिली चव छान होते पण आमसुलाचा लालसर रंग येतो तो खुप छान नाही वाटला.
३. एकदा १/२ कप खोबरे घालुन पाहिले पण खुप खोबरे खोबरे वाटले म्हणुन मग मी कमी घालते.



Comments

  1. She also cooks Gode Batati (Contradictory to the name this veg. is spicy )

    ReplyDelete
  2. Harekrishnaji, Gode Batati chi recipe dya jamali tar :)

    ReplyDelete
  3. blog beauty parlor madhye jaun aalelaa distoy... :) chhaan aahe naveen look. aaNi naveen recipe paN jhakaas. kelyaawar saangeen nakki.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts