बेक केलेली मटारची करंजी (Baked Matar Karanji)

भारतात डिसेंबर जानेवारीमधे मटार मिळायला लागले की आठवणीने आणि आवडीने केले जाणारे पदार्थ म्हणजे मटार भात, मटार उसळ, एकुणात ज्यात म्हणुन मटार घलता येईल त्यात घालुन सिझनचा आनंद लुटायचा. त्यातलाच अजुन एक पदार्थ म्हणजे'मटारची करंजी'! सामोसा वगैरे प्रकार मला त्यामानाने खुपच उशिरा समजले त्याआधी ही करंजिच खुप आवडत असे. मग जरा शिंगे फुटल्यावर समोसे खाणे कसे ग्रेट वगैरे वाटे. घराबाहेर पडल्यावर मात्र मम्मीच्या हातच्या करंज्याची चव कश्शाला म्हणुन नाही हे चांगलेच कळले.तर अशी ही मटार करंजी स्वत: करायची वेळ आली तेव्हा मात्र जीव आगदी हैराण! अमेरिकेतल्या अपार्टमेंट मधले एवढेसे ते किचन एक दिवस तळण केले तर २ दिवस तो वास घरात भरुन राहिलेला हे सगळे आणि त्यातुन कधईत ओतलेले तेल कमी झालेले पाहिले आणि तळण या प्रकारची एकदम धस्तीच बसली ती इतकी की आता मोठे किचन असुनही एकही तळण मी करत नाही. मग एकदा धाडस करुन या करंज्या बेक केल्या त्या एवढ्या चामट झाल्या की परत कानाला खडा. खुपदा पायक्रस्ट आणुन प्रयोग कराव वाटे पण त्यातल्या बटरचे प्रमाण पाहुन धाडस मात्र कधी झाले नाही. मागच्या महिन्यात वैशालीची Empanadas रेसिपी दिसली आणि माझी ट्युब एकदम संपूर्णच पेटली. मग एक प्रयोग करुन पाहीला आणि एकदम सक्सेसफुल हो! मग अजुन एकदा केला आतले सारण बदलले पण करंजिच्या पारीमधे फार काही फरककेला नाही. आम्हा दोघान पण खूप आवडले आणि अजुन एक-दोन मैर्त्रीणीना पण. हीच ती रेसिपी. याचे सगळे श्रेय वैशालीला -

Baked Matar karanji

करंजीच्या पारीसाठी -
२ कप गव्हाचे पीठ (मी कणिक वापरली)
३ टेबलस्पून एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव ऑईल
३ टेबलस्पून अर्थ बॅलन्स (हे वेगन नॉन ट्रान्सफॅट शॉर्टनिंग आहे)
१/२ टीस्पून मीठ
१ टीस्पून ओवा भरड ठेचुन
१ टीस्पून लाल तिखट (नाही घातले तरी हरकत नाही)
बर्फाचे पाणी लागेल तसे.

कृती - पिठात तेल, अर्थबॅलन्स, मीठ, ओवा, तिखट घालुन एकदा नीट मिसळुन घ्या. थंडगार पाण्याने कणिक अगदी घट्ट भिजवा. ही कणिक पुरीच्या कणकेपेक्षादेखील घट्ट असते. पीठ जरा एकत्र आले की शक्यतो पाणी न वापरतामळुन एखाद्या हवाबंद डब्यात किंवा प्लास्टीकच्या रॅपमधे गुंडाळुन कमीतकमी १ तास फ्रीझमधे ठेवावे.

सारणासाठी -
१ ते दीड कप मटार दाणे (मी फ्रोझन वापरले)
२ लहान बटाटे (एक ते दीड कप खीस होईल इतके)
लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे
१ टीस्पून साखर
१/२ लिंबाचा रस
चिरलेली कोथिंबीर १/४ कप

फोडणीसाठी - १ टेबलस्पून तेल, १ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून हळद

कृती - मटारदाणे मायक्रोवेवमधे ३० सेकंद गरम करुन बाजुला ठेवले. तेल मध्यम आचेवर तापत ठेवावे. दरम्यान बटाट्यांची साल काढुन मोठे मोठे खिसुन घ्यावे. तेलात नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात बटाट्याचा खीस घालावा. हलक्या हाताने परतावे. खीस भांड्याला लागण्याची शक्यता आहे म्हणुन गॅस वाढवू नये. आता त्यात मीठ, तिखट घालावे. मटारदाणेवाटीने वगैरे थोडे ठेचुन घ्यावेत म्हणजे मग करंज्या फुटत नाहीत. हे ठेचलेले मटार बटाट्यात घालावेत. बारिक गॅसवर झाकण ठेवुन एक छान वाफ येउ द्यावी. बटाटे शिजलेत का बघावेत. शिजले नसतील तर झाकण ठेवुन अजुन एखादी वाफ येउ द्यावी. आता त्यात लिंबाचा रस, साखर घालुन नीट मिसळावे. कोथिंबीर घालावी. गॅसवरुन सारण खाली उतरवून त्यावर झाकण ठेवुन १५-२० मिनीटे बाजुला ठेवावे. असे थंड होताना झाकण ठेवल्याने बटाटा जर खाली चिकटला असेल तर तो वाफेने सुटुन येतो.

Step by Step!



करंजी
-
फ्रीजमधे ठेवलेले पीठ बाहेर काढुन त्याचे एकसारखे १२ गोळे करावेत. प्रत्येक गोळ्याची साधारण ४ इंच व्यासाची पुरी लाटावी. पुरीच्या मधे साधारण २ टेबल्स्पून सारण ठेवुन नेहेमीप्रमाणे(*) करंजी करावी. या करंजीच्या कडा नीट दाबुन घ्याव्यात आणि त्यावर फोर्कच्या ४ दातांनी नीट प्रेस करावे, असे केल्याने कड नीट सील होते आणि नक्षीदेखील मस्त दिसते. सगळ्या करंजा अशाप्रकारे करुन एका बेकिंगशीट वर ठेवाव्यात. एका वाटीत १ टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून दूध एकत्र करुन हे मिश्रण प्रत्येक करंजीवर लावावे. ओव्हन ४०० डिग्री फॅरेन्हाईट्ला चालू करुन करंज्या साधारण २०-२५ मिनीटे बेक कराव्यात. वरुन गुलबट सोनेरी झाल्या की ओव्हन बंद करुन शीट बाहेर काढुन थोडी वाफ जाऊ द्यावी. केचप, चटणी, हॉटसॉस कशाबरोबरही ह्या करंज्या एकदम मस्त लगतात.

(*) वर स्टेप बाय स्टेप फोटोमधे दाखवल्याप्रमाणे

टीप -
१. समोस्याचे सारण करुनही ह्या छान लागतात. बटाटेवड्याच्या सारणावरही प्रयोग करायला हरकत नाही.
२. आवडत असेल तर सारणात थोडा गोडा किंवा गरम मसाला घालू शकता. पण मला हे बिना मसाल्याचे जास्त आवडले.



Comments

  1. I can't get over how beautiful your Matar Karanjis look. And the filling sounds delicious-- you can be sure I'll be trying it. Thanks, Mints!

    ReplyDelete
  2. Hats off to your innovation. This is an elaborate affair, but sounds like something I will certainly try out when I want to indulge myself in cooking :)

    ReplyDelete
  3. Vaishali, Thank you!

    Priya, I just followed Vaishili's footsteps. Try out if u can.

    ReplyDelete
  4. I have made these coouple of times but always fried it. I have been wanting to eat it since couple of months but itke tel lagel ya vicharane avoid kele. ata bake karun try karte :)

    ReplyDelete
  5. फार छान! मला ह्या करंज्या पाहून पुण्याच्या काका हलवायाकडच्या बेक्ड करंज्या आठवल्या. ब्लॉग खूपच छान आहे. बुकमार्क केलाय.

    ReplyDelete
  6. i am kirti bhave from Italy, I enjoy reading your blog and recipes, Many thanks!

    ReplyDelete
  7. Sounds exactly what I did for a Marathi Mandal summer picnic here in Oslo.

    We too don't fry much, mostly get away with baking everything. And seeing the pie's made me think, if I just substitute the filling with something vegetarian, and simply use wheat flour, and bake the whole thing, how would it be!!

    It turned out super. Of course, I added a bit of yeast to the dough, but that was just so that the flattened dough would not be hard. Will search for the pictures and post them as well.

    ReplyDelete
  8. First time visitor to your site and already in love with the recipes. trying the methi bhaji and batata rassa tonight

    ReplyDelete
  9. Thanks PJ Pawaskar and Sabina.
    Welcome here.

    ReplyDelete
  10. मिनोती, मी ह्या करंज्या आज ट्राय केल्या. रेसिपी फार सुंदर आहे पण माझे काहीतरी चुकले. कणिक नीट लाटताच येत नव्हती. क्रंब्ज पडल्यासारखे होत होते. त्यामुळे करंज्या पण जास्तच ठिसूळ झाल्या आहेत. कणिक जरुरीपेक्षा जास्त घट्ट भिजवली गेली असेल का ? की अजून काही चुकले ? मी अर्थ बॅलन्सच्या ऐवजी साधे बटर घेणे एवढा एक फरक केला.
    पण ही रेसिपी मला फार आवडलीय. पारी नीट जमली तर अनंत प्रकारची सारणं भरता येतील आत. त्यामुळे ट्राय करत राहणार हे नक्की.
    -अगो

    ReplyDelete
    Replies
    1. AGO, I think you might have kneaded the dough little too much. You can add little water next time. Also try the recipe from HG 2010 Diwali. It is very similar dough.

      Delete
    2. थॅंक्स मिनोती, पुढच्यावेळी हे लक्षात ठेवेन.

      Delete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts