कलौंजीवाली दाल (Masoor Dal with Kalaunji)
अलिकडे ET च्या ब्लॉगवरची दुधी भोपळ्याची भाजी करुन पाहिली आणि मी पण कलौन्जीच्या प्रेमात पडले. हे प्रियाला सांगितल्यावर तिने सहज मला बंगाली पद्धतीची कलौंजी घातलेली मसुरडाळ तिची रूममेट बनवते असे सांगितले. मोहरीच्या तेलाची कलौन्जी घातलेली फोडणी असते या व्यतिरिक्त तिने मला काही सांगितले नाही. डाळीत बिघडून काय बिघडणार आहे असा विचार करुन मी डाळ करायची ठरवले. तेव्हाच ET च्या ब्लॉगवरची ही बंगाली डाळही वाचली होती. मी त्या दोन्हीचे काँबिनेशन करावे असा विचार केला. पण बाऊलला कडेने लिंच्या चकत्या लवल्या तर ती डाळ लगेचच संपवावी लागते परत गरम करता येत नाही असेही तिच्या ब्लॉगवर वाचले होते. म्हणुन मग मी लिंबाचा रस त्या डाळीत घालावा असे ठरवले. तयार झालेली डाळ किनवा बरोबर अप्रतीम लागली. आता आम्हाला ही साधी डाळ प्रचंड आवडायला लागलेली आहे. माझी रेसिपी पुर्णपणे बंगाली नसेल/नाही कदाचित पण Bengali Inspired नक्कीच आहे ....
Masoor Dal with Kalaunji
१ कप मसूर डाळ
१ टीस्पून कलौन्जी
१/४ टीस्पून हळद
२ सुक्या लाल मिरच्या
२ ओल्या लाल मिरच्या
२ लसुण पाकळ्या
१ टीस्पून तेल (ऑलिव,कनोला, सफोला कोणतेही चालेल)
१ टीस्पून मोहरीचे तेल (आवडत नसेल तर वर वापरलेलेच तेल वाढवावे)
चवीप्रमाणे मीठ
१/२ लिंबाचा रस (वगळायला हरकत नाही)
कृती - मसुरडाळ शिजवुन घ्यावी (कुकरला किंवा साधी गॅसवर). मिरच्यांचे प्रत्येकी २ तुकडे करुन घ्यवेत. लसुण ठेचुन किंवा बारिक चिरुन घ्यावा. शिजलेली डाळ पळीने किंचीत घोटावी पण खुप नको.तेल तापवुन त्यात हळद व कलौंजी घालुन अर्धा मिनीट तसेच राहु द्यावे. त्यात लाल मिरच्यांचे तुकडे, ठेचलेला लसुण घालावा. अजुन अर्धा-एक मिनीट परतून त्यात घोटलेली डाळ घालावी. गरजेप्रमाणे पाणी घालावे. डाळ खुप पातळ करु नये. मीठ घालुन एक उकळी आणावी. आवडत असेल तर लिंबाचा रस घालावा. भाताबरोबर गरम गरम वाढावी.
टीप - डाळ कुकरला शिजवली नाही तर फोडणी वरुन घालावी.

This is my favorite!
ReplyDeleteOohh looks good :)
ReplyDeleteSounds good........ will try it sometime....
ReplyDeletePriya, you were the inspiration to try this :)
ReplyDeleteTC, Khaugiri - Thanks!
is "mohriche tel" mustard oil? i love it and use it a lot, esp with greens. your dal looks great.
ReplyDeleteBee, yes 'mohariche tel' is mustard oil and I started loving the nutty flavor. Thank you.
ReplyDeleteYour dal looks delicious, Mints. I haven't cooked a lot with kalonji, but feel motivated to do so now. It's a unique flavor indeed.
ReplyDeleteVaishali, please do try. I am sure you will enjoy the flavor as I did.
ReplyDeleteI have never tried using kalonji in dal. I love the flavour so I shall try this with my next dal, though without the mustard oil. :) Haven't acquired the taste yet.
ReplyDeleteAparna, it also tastes wonderful without mustard oil.
ReplyDeleteInspiring! Karun pahayla havi!
ReplyDelete