Strawberry Lemonade
काल-परवापर्यंत थंडी पडतेय असे वाटत असतानाच अचानक तापमान वाढायला लागले. आईस टी, स्वीट टी, लेमोनेड वगैरे काहीतरी करायला लागणार अशी टळटळीत दुपार. भारतात उन्हाळ्यात पन्हे, लिंबाचे गार सरबत, अंबील असले पदार्थ घरात नेहेमी असतात. इथे हे सगळे करायला हरकत नसते पण मग बरेचदा कंटाळा पण येतो करायचा. संत्री, टँजरीन खाउन खाउन किती खाणार? अशाच एका टळटळीत दुपारी केलेले हे स्ट्रॉबेरी लेमोनेड. समोर मैत्रिणीच्या घरची मायर लेमन्स पडलेली, कोपर्यावरच्या बाबाकडे घेतलेल्या मस्त ताज्या स्ट्रॉबेरीज पण होत्याच आणि त्या उन्हाने वाया जाउ नये म्हणुन काय करावे हा विचारच चालु होता. त्यातुनच सुचलेला हा पदार्थ मागे कधीतरी असलेच काहीतरी काकुकडे प्यायलेही होतेच. करायला हा प्रकार एकदम सोपा.
Floating Strawberry ice cube
स्ट्रॉबेरी क्युब्ज:
१०-१२ मोठ्या स्ट्रॉबेरीज
४-५ पुदिन्याच्या काड्या
१-२ टेबलस्पून साखर (वगळण्यास हरकत नाही)
चिमुटभर मीठ
कृती -
स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवुन देठ काढुन मोठ्या मोठ्या चिरुन घ्याव्यात. पुदिना धुवुन त्याची फक्त पाने काढुन घ्यावीत. एका मिक्सरच्या भांड्यात दोन्ही टाकावे. स्ट्रोबेरीज खुप अंबट असतील तर थोडी साखर आणि एक चिमुट मीठ घालुन सगळे नीट बारीक करावे. एका रिकाम्या आईस ट्रे मधे ओतुन फ्रीझरमधे सेट करायला ठेवावे. ह्या झाल्या स्ट्रॉबेरी आईसक्युब्ज.
Lemonade
स्ट्रोबेरी लेमोनेड:
नेहेमीप्रमाणे लिंबाचे सरबत करुन घ्यावे आणि फ्रीजमधे ठेवुन गार करावे. विकतचे लेमोनेड आणले तर पिंक लेमोनेड शक्यतो आणु नये. ते पण थोडे फ्रीजमधे ठेवुन थंड करुन घावे. देतेवेळी एका ग्लासमधे लेमोनेड घालुन त्यात स्ट्रॉबेरी आईसक्युब घालुन पिण्यास द्यावे. आईसक्युब जसा वितळत जाईल तसा स्ट्रॉबेरीचा स्वाद लेमोनेडला येईल.
टीप -
1. रासबेरी, ब्लुबेरी, ब्लॅकबेरी अशा कोणत्याही बेरीचे आईसक्युब्ज करता येतील. रासबेरी आणि ब्लॅकबेरी मधे बिया खुप असतात त्यामुळे तयार झालेला पल्प मी गाळुन घेते. आणि मग सेट करायला ठेवते.
2. एकदा करुन झालेले क्युब्ज फ्रीझर सेफ डब्यात घालुन ठेवले तर बरेच दिवस वापरता येतात.

bhari photo! ani strawberry icecube tar aflatun! :)
ReplyDeletemasta! yaa unhaLyaat karun baghaNaar, nakki! :)
ReplyDeleteवा फारच छान आईडिया आहे. मी नक्की करून बघणार!!!
ReplyDeleteअच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
ReplyDeleteरीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
आप भी "क्विलपॅड" www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?
delicious
ReplyDeleteअच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा तो मूज़े मिला " क्विलपॅड " / आप भि " क्विलपॅड" www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या..?
ReplyDeleteBhagyashree, Harekrishnji, thank you.
ReplyDeletePreeti, Priya, please do try out.
Santosh, I use http://www.gamabhana.com/gamabhana_ex/ for my Marathi typing as quillpad.in autocorrects the words and that can be annoying. I have also used a software called 'Baraha' which is a standalone application that you can download and can be used while working offline.
Hi Mints,
ReplyDeletePlease grab your award from my blog!!!
Khaugiri, Thanks so much :)
ReplyDelete