गुळाचा सांजा (Goolacha sanja)
(English Version)
गोड पदार्थ खाण्यासाठी आणि करण्यासाठी फार काही कारण लागत नाही. आज काय घरची आठवण झाली, उद्या काय बरेच दिवसात काही गोड केले नाही असले कोणतेही कारण पुरते. हा सांजा पण असाच कारण नसताना बनवला जातो माझ्याकडे.
आम्हाला गावाकडुन आज्जी बरेचदा घरचे शेंगदाणे, लाल तिखट पाठवत असे. त्याबरोबरच एक लहान पुरचुंडी असायची गव्हाच्या रव्याची. आजीने आणि काकुने घरी सडलेल्या गव्हाचा रवा. मस्त केशरी रंग असे. घरचा गहू काही खुप निघायचा नाही. तिकडे घरच्यापुरता झाला तरी पुरे असा प्रकार होता. पण ज्वढा मिळे त्यात आज्जी सगळ्यांचा वाटा म्हणुन हा रवा तरी पाठवत असे.त्या जाड रव्याचा सांजा अगदी अप्रतीम लागत असे. मम्मी तूप वगैरे घालुन करयची. पण नेहेमी म्हणायची यात तुपाची तेलाची काही गरज नसते. मधे एकदा मला अचानक या सांज्याची आठवण झाली म्हणुन मग लगेच करुन पाहीला. छानच झालेला. मला एका मैत्रीणीने यात सुंठ घातली की छान लागतो असे सांगितल्यावरुन मग सुंठ घालुन केला. एकदम मस्त लागला.
Godacha sanja
पॉटरी क्लासला गेले कित्येक वर्षे जातेय. प्रत्येक भांडे करताना वेगवेगळे इन्स्पिरेशन घेउन बनवले जाते. मात्र हे भांडे रंगवताना त्यावर्षीचा स्प्रिंगचा खुपच प्रभाव होता माझ्यावर. म्हणुन तेच चित्र काढुन रंगवले. ते हे भांडे परवा हा सांजा केला तेव्हा एकदम आठवले म्हणुन मग लगेच काढुन वापरले.
Spring Inspired Bowl
१ वाटी केशरी रवा (ब्रोकन/क्रॅक्ड व्हीट सगळ्यात लहान)
१ वाटी गुळ
३-४ कप पाणी
१ टीस्पून सुंठ
१ टीस्पून वेलची पूड
१/४ टीस्पून जायफळपूड
१ टेबल्स्पून तेल
बदामकाप, काजुचे तुकडे, बेदाणे - आवडीप्रमाणे
कृती:
रवा कोरडा भाजुन घ्यावा. भाजत आला की १ टेबलस्पून तेल घालावे आणि नीट परतून बाजुला ठेवावा, साधारण पिवळसर रंगाचा दिसेल. एका पातेल्यात ३ कप पाणी आणि गूळ एकत्र करुन मध्यम गॅसवर उकळायला ठेवावे.पाण्याला उकळी आली की सुंठ, वेलची, जायफळ पूड, बदामकाप, काजुचे तुकडे, बेदाणे घालावेत. त्यानंतर लगेच रवा घालुन एकदा हलवून झाकण झाकुन गॅस एकदम बारिक करुन ठेवावा. ५ मिनीटानंतर एकदा सगळे नीट हलवून परत एकदा झाकुन ठेवावा. असे साधारण २-३ वेळा करावे लागेल तेव्हा रवा नीट शिजेल. त्यातील पाणी पूर्ण आटले आणि जर रवा अजुन शिजला नसेल तर मात्र १/२ कप पाणी अजुन घालुन नीट मिसळून एक वाफ काढावी लागेल. सांजा पूर्णपणे तयार झाल्यावर गॅस बंद करुन अजुन ५ मिनीटे झाकुन ठेवावे. आणि मग वाढावे.
टिपा:
१. रवा मोठा आहे म्हणजे जास्त फुलुन येईल आणि जास्त लोकाना पुरेल असे वाटते पण तसे या रव्याचे/सांज्याचे होत नाही.
२. हाच सांजा पोळीसाठी पण वापरता येतो पण मग् सांजा करताना बदामकाप, काजुचे तुकडे, बेदाणे घालु नयेत.

Sanja looks good, and the bowl too :)
ReplyDeleteThanks Priya.
ReplyDeleteWill be making this tonight for sure.
ReplyDeleteDoesn't the 'suntha' overpower the nutmeg?
I guess I'll find out soon enough.
I hope it came out well. you can distinctly taste both nutmeg and suntha.
ReplyDeleteMints, why don't you please blog in english, I would love to read the posts..the picture looks gerat..so sad I can read..nor can I find that translation page..
ReplyDeleteValli, I will try soon :) its just time consuming sometimes :) but work is in progress.
ReplyDeleteMinoti,
ReplyDeleteThanks for your kid lable
mast aahe
ReplyDeleteअस्सल मराठी पध्दतीचे सगळी व्यंजन एकाच site वर आहेत ही खरच आनंदाची आणि आपल्या कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या या उपक्रमास माझ्या अनेक शुभेच्छा... :)
ReplyDeleteआज हा सांजा नक्कीच बनवणार मी, बघू कसा बनतोय.
ReplyDelete