नवलकोलची भाजी (Kohlrabi Sabji)

नवलकोलची भाजी मी पहिल्यांदा बेळगावला आज्जीकडे पाहिली तेव्हा काकु विळीवर आपण खोबरे जसे खवणतो तशी खवणत होती. मला आधी वाटले की शहाळे आहे की काय इतका कोवळा पांढुरका रंग होता. त्या खवणलेल्या नवलकोलची पहिल्यांदा आवडीने खाल्ली देखील.ही भाजी आमच्या गावात मिळणे मात्र थोडेकठीण होते. कधीतरी कोल्हापुरला गेल्यावर मम्मी किंवा मी आणत असु.. बेळगावहुन आणायच्या भाज्यांमधे देखील ओले काजु, बारिक मटारच्या शेंगा (याचेच पुढे काळे वाटाणे होतात), नवलकोल आणि बारिक मसूर हमखास ठरलेले. भरतातून इथे आल्यावर एकदा आवडीने आणली ही भाजी आणि मम्मी करते त्या पद्धतीने डाळ घालून करुन पाहिली. पण का कोण जाणे थोडी उग्र लागली. त्यामुळे पुढे आणणे बंदच केले.
Purple Kohlrabi
अलिकडे मी CSA चा शेअर घेतला आहे. त्या लिस्टमधुन भाज्या निवडतना Purple Kohlrabi दिसले. रंगामुळे ऑर्डर देखील केले. पण हा प्रकार आतुन पांढराच निघाला. पण चवीला मात्र खुप उग्र नव्हता. एकदा नेहेमीप्रमाणे मुगाची डाळ घालुन भाजी केली. खुप ग्रेट नाही पण अगदीच वाईटदेखील नाही अशी झाली.नंतरच्यावेळी ऑर्डर केली तर डाळ भिजवयला विसरले होते म्हणुन मग चक्क पंचफोरण घालुन केली आणि एकदम आवडुनच गेली. त्यानंतर २-३ वेळा तरी अशी भाजी केली असेल. मस्तच लागला एकदम प्रकार. आता हेच Turnip (शलगम) चे करुन पहायचे आहे. बघु कसे लागते.ही भाजी ओरिया/बंगाली लोक अशीच करतात का? माहीती नाही. मी मात्र आवडीने करते, अगदी विळी नसली तरी हॅंडहेल्ड खोबर्‍याच्या खवणीने खिसायचा त्रास पडला तरी.

Kohlrabi Sabji

नवलकोलचे २ गड्डे
२ टेबलस्पून तेल
२ लाल सुक्या मिरच्या
१ टीस्पून पंचफोरण *
चवीप्रमाणे मीठ
थोडी कोथिंबीर

कृती -
नवलकोलाचे गड्डे धुवुन मधोमध आडवे कापावेत आणि खोबरे खवणतो तसे खवणून घ्यावेत. साल जाड असते ती टाकून द्यावी. तेल तापवुन त्यात पंचफोरण आणि लाल मिरचीचे तुकडे घालावेत. फोडणी तडतडली की त्यात नवलकोलाचा खीस घालुन परतावे. चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवुन भाजी शिजवावी. गॅस बारीक असावा म्हणजे करपत नाही, पाणी घालायची गरज पडत नाही. वरुन कोथिंबीर घालुन चपातीबरोबर खावी.

टीप -
१. नारळाची खवणी नसेल किंवा वापरायची नसेल तर साल काढणीने साल काढुन खिसणीने ते गड्डे खिसुन घ्यावेत.
२. * पंचफोरण म्हणजे मेथी, मोहरी, जिरे, कलौन्जी, बडीशेप प्रत्येकी १ टीस्पून घेउन एकत्र करावे आणि या मिश्रणातले १ टीस्पून वापरावे.

Comments

  1. करून पाह्यला पाहिजे . नवलकोल ,शलगम ह्या काही आवडीच्या भाज्या नाहीयेत.

    ReplyDelete
  2. नवल्कोला च्या मुळा कडील भाग काढून टाकावा.व भाजी चिरावी, किसू किंवा खवु नये.
    बारीक़ फोडी कराव्या व हरबरा डाळ(अर्धा तास गरम पाण्यात भिजवलेली ) घालून भाजी करावी .
    नवलकोल थोडा गोड आसल्याने तिखट जरा जास्त घालावे .
    सलगम देखिल इथे छान आणि स्वस्त मिळतात .सलगम ची साल काढून व मुळाकडील भाग काढून
    बारीक़ फोडी कराव्या व थोड्या तेलात परतून घ्याव्या म्हणजे त्याचा उग्र वास जातो .
    या फोडी आणि कांदा व थोडा बटाटा घालून परतून नेहेमी सारखी भाजी करावी ही भाजी पण
    जरा गोड लागते.

    विजय बुद्धिसागर

    ReplyDelete
  3. Purple navalkol! Looks gorgeous. Pity it was white inside.

    ReplyDelete
  4. Asha, welcome to my blog and please do try it.

    विजय बुद्धिसागर, thank you for the recipe. I will try that.

    TC, I was hoping for nice purple color.

    ReplyDelete
  5. Made it today with the same purple Kohlrabi from my CSA share and loved it! I think panchphodan makes for a good tempering for most root vegetables! Thanks for coming up with the idea :)

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts