एकसे भले दो

आता स्वयंपाक करणार्‍या सगळ्यानाच माहिती आहे की एखादा पदार्थ करताना एखाद्या नविन पदार्थाची आयडिया चमकते. आणि ती चमकली की आनंदी आनंद गडेच अगदी. पण आत्ता हे जे पदार्थ लिहीणार आहे ही आयडीया मात्र माझी नाही. माझ्या आज्जीकडे हे प्रकार मी गेले कितेक वर्षे केले जातात. भारतात अगदि अलिकडे पर्यंत पारंपारिक पद्धतीने चपाती, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, चटण्या हे प्रकार सकाळ संध्याकाळ कमी आधिक प्रमाणात होत असत. काही ठिकाणी अजुनही होतात. कोणत्याही परंपारिक प्रकारच्या स्वयंपाकामधे एक ठळकपणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे शक्यतो कमी वेळात खुप स्वादिष्ट स्वयंपाक करणे. याचे मुख्य कारण म्हणजे घरातली बरीचशी कामे घरच्याघरी करावी लागत. घरात जनता पण खुपच असे त्यामुळे पुरवठा येईल असे काहीतरी बनवणे. कदाचित यामुळेच असेल मला पारंपारीक स्वयंपाक करण्यात जास्त रस आहे. त्यपैकीच ह्या दोन रेसिपीज. एकच साहित्य वापरुन केलेले हे दोन पदार्थ - मुगाची उसळ आणि कटाची आमटी.

Katachi Amati And Usal
तयारी -
१ कप मुग
४ कप पाणी
मुगाची डाळ स्वच्छ धुवुन एका जाड बुडाच्या पातेल्यात घालुन मध्यम गॅसवर शिजायला ठेवावी. एक उकळी आली की झाकण ठेवुन गॅस कमी करावा आणि मूग शिजु द्यावेत. थोड्याथोड्या वेळाने झाकण उघडून पाणी कमी झाले नाही ना ते पहावे. मूग अगदी बोट्चेपे शिजवावेत अगदी गिच्च शिजवू नयेत. मुग शिजल्यावर देखील साधारण २ कप पाणी मुगात उरले पाहीजे. त्यामुळे गरज लागेल तसे पाणी घालावे आणि शेवटी २ कप तरी पाणी मुगात उरेल असे पहावे. मुग शिजवताना उरलेले पाणी एका भांड्यात गाळुन घ्यावे. त्यातच शिजलेले २ टेबल्स्पूनमूग घालावेत.

दोन्हीसाठी लागणारे साहित्य -

१ मोठा कांदा बारिक चिरुन
२ लसुण पाकळ्या, २ टेबलस्पून खोबरे (ओले, सुके कोणतेही), २ टेबल्स्पून बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र वाटुन घ्यावे
मीठ
२ टेबल्स्पून कांदा लसूण मसाला
१ टेबलस्पून गूळ
२ टेबल्स्पून तेल, फोडणीचे सामान
या व्यतिरिक्त लागेल ते सामान खाली त्या त्या रेसिपीमधे लिहिले आहे.


कटाची आमटी -


Katachi Amati
२ कप मुग शिजवलेले पाणी
१ ते १.५ कप पाणी
थोडीशी चिंच (किंवा १/२ टीस्पून चिंचेचा कोळ)

एकत्र करुन त्यात वाटलेल्या लसुण-खोबरे अर्धे घालावे. चवीपुरते मीठ, १ टेस्पून कांदा लसूण मसाला, बारिक चिरलेला अर्धा कांदा एकत्र करुन बारिक गॅसवर उकळायला ठेवावे. कांदा साधारण शिजला की त्यात चिंचेचा कोळ, गूळ घालुन उकळावे. वरुन एक टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी हिंग, हळद, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. उकळताना अगदी मंद आचेवर उकळावे म्हणजे मूग अगदी गिर्र शिजुन आमटीला दाटपणा येईल पण वरुन जास्तीचे पाणी घालायची गरज पडणार नाही.

मुगाची उसळ -




MugachI Usal
एका कढईत तेल तापायला ठेवावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद कढिपत्त्याची फोडणी करावी. त्यावर उरलेला १/२ कांदा गुलाबी रंगावर परतावा. त्यावर शिजलेले मूग, कांदा लसुण मसाला, वाटलेले लसूण-खोबरे, मीठ, गूळ घालून नीट मिसळावे.झाकण ठेवुन एक वाफ आणावी. वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालून चपाती-भाताबरोबर वाढावे.


टीप -

1. सवड असेल तर मूग भिजवून मग शिजवावेत शिजायला वेळ कमी लागतो.
2. मूग न भिजवता शिजवायला ठेवले तर २०-२५ मिनीटात शिजतील.
3. कांदा लसुण मसाला नसेल तर गोडा मसाला, लाल तिखट चवीप्रमाणे वापरायला हरकत नाही.

Comments

  1. मूग वापरायचे की मुगाची डाळ? साहित्य लिहीताना मुगाची डाळ लिहीली आहे, तर कॄतीत मूग लिहीलेत. फोटोवरूनही आख्खे मूग असावेत असंच वाटतंय. आख्खे मूग असतील तर शिजायला अंदाजे किती वेळ लागतो?

    ReplyDelete
  2. Priya, sorry it was a mistake. I added answer to both your question in the post itself to help others.

    ReplyDelete
  3. can you please post this in english.
    thanks in advance

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts