कोकणातला नाष्टा - कोकमाचे सार आणि भात (Solache Saar)
प्रसंग - पप्पांना खुप भूक नाहीये किंवा त्यांच्यापुरता स्वयंपाक तयार आहे.
मम्मी - मिनू, सुबोध जेवायला काय हवेय?
सुबोध - काहीही!
मी - काहीही!
मम्मी (वैतागून) - पटकन बोला काय करु?
सुबोध - पोहे/उप्पीट काहीही!
मी - आमसुलाचे सार आणि भात? होईल पट्कन?
मम्मी - काय रे तुला चालेल का?
सुबोध - ठिकाय, मला काय काहीही चालते!
घरात कोकमाचे सार आणि भात होण्यासाठी असले प्रसंग घडतच असत. पप्पांना आमच्या काहीही अंबट चालत नाही त्यामुळे या बेतातून ते नेहेमी कटाप. मुख्य म्हणजे त्यांना घरात शिल्लक असेल ते चालत असे. आजुबाजुला सगळे 'पुरुष' लोक फक्त ताजे'च' जेवताना पहात असताना, पप्प्पंचे हे वेगळेपण नक्की जाणवत असे. होस्टेलला राहिल्यामुळे असेल त्यांना अन्नाचे महत्व वाटते. त्यांच्यामुळे लागलेल्या काही सवयी अजुनही विसरत नाही. त्यातली एक महत्त्वाची म्हणजे ताटात आलेले अन्न विनातक्रार जेवणे. होस्टेलला रहाणे त्यामुळे सुकर झाले. असो...
तर हे असे सार होण्यामागे अजुन एक प्रसंग म्हणजे रातांब्याचे सरबत करताना त्यातल्या बिया काढाव्या लागत मग त्या बियांचे असे सार करण्यासाठी पण मी मम्मीमागे भुणभुण करत असे. हे सार आवडण्यामागचे कारण म्हणजे त्याचा गुलबट रंग आणि त्याची अंबटगोड चव. नुसते वाटित घेउन प्यायचे आणि मग भातावरही घ्यायचे आणि मग परत एखादी वाटी परत प्यायचे! आहाहा! मधे एकदा मम्मीशी बोलताना कळले की तिला रातांबे मिळाले होते त्याचे सरबत घालायच्या विचार चालू होता. तेव्हा आठवण झाली ती पण इतकी की लगेच बाटलीतली सोले गरम पाण्यात पडुन भाताचे अधण ठेवले गेले!
Solachi Amti with Rice
५-६ आमसुले १/२ कप गरम पाण्यात १५-२० मिनीटे भिजवलेली
३-४ कप पाणी
१ कप भाताची पेज **
एखदी हिरवी मिरची
१ टीस्पून जिरे, तेल - फोडणीसाठी
मीठ, गूळ चविपुरते
एखादी लसुणपाकळी ठेचुन (वगळली तरी चालेल)
१ कप पाणी
कृती -
** भाताची पेज -
१ कप तांदूळ धुवुन घ्यावा. ३ कप पाणी उकळण्यास ठेवावे. एक उकळी आली की त्यात धुतलेले तांदूळ घालून शिजण्यास लावावे. भात अर्धा-कच्चा शिजेल तेव्हा भांड्यावर झाकण ठेवुनत्यात उरलेले पाणी एका भांड्यात ओतुन घ्यावे. ही झाली भातची पेज. आता उरलेल्या भातात लागेल तसे पाणी आणि किंचीत मीठ घालून नेहेमीप्रमाणे भात करुन घ्यावा.
सार -
भिजवलेली सोले पाण्यात कुस्करून ठेवावीत. एका पातेल्यात तेलाची जिरे, मिरची, घालणार असाल तर लसूण घालून फोडणी करुन घ्यावी. त्यात कुस्करलेली आमसुले पाण्यासहीत घालावीत. त्यात अजुन एक कप पाणी घालावे आणि एक उकळी येउ द्यावी. मीठ, गूळ, भाताची पेज घालुन अजुन एक उकळी आली की बरिक चिरलेली कोथिंबीर घालून तयार झालेल्या भाताबरोबर गरम गरम वाढावे.
टीप -
1. पेज काढायची असेल तर भात कुकरला शिजवता येत नाही साध्या पातेल्यात गॅसवर नुसता शिजवावा लागतो. किंवा राईसकुकरमधे शिजत असताना देखील पेज काढता येते.
2. पेज करायचा कॉन्फिडन्स नसेल तर सरळ एखादा टेबलस्पून तांदुळाचे पीठ एक कप पाण्यात मिसळून गुठळ्या काढुन सारात घालावे.
3. मिरची, लसुण अत्यावश्यक नाही. लाल तिखटाची पूड घालायला हरकत नाही.
4. हा प्रकार सूपसारखा नुसताच प्यायला मस्त लागतो.

Your recipes remind me of my mom and grandmother's kitchens...amsulache saar is the epitome of comfort food in my opinion! Love your pottery too! Wish you lived somewhere close by--would have loved to learn and interact with you!
ReplyDeleteSaee, welcome to my blog. Glad you liked recipes and pottery. We can still interact via blogs :)
ReplyDelete