भरल्या दोडक्याची भाजी (Bharalelya Dodakyachi Bhaji)
English version: Stuffed Ridge Gourd
कीस बाई कीस,
दोडका कीस..
दोडक्याची फोड
लागते गोड..
आणिक तोड बाई
आणिक तोड......
हे गाणे म्हणत आम्ही शाळेत एक खेळत असु. या गाण्यात म्हणल्याप्रमाणे देशात असताना दोडका कधी 'गोड' लागला नाही. दोडक्याची भाजी केली की नेहेमीपेक्षा १/२ भाकरी कमी खाल्ली जायची. 'पिकते तिथे विकत नाही' हेच खरे. खरेतर आजुबाजुल शेतात किंवा घरी लावलेल्या वेलाचे खरोखर छान ताजे दोडके नेहेमी मिळत. पण कदाचित ते नेहेमी मिळत म्हणुनच ते कधी गोड वाटत नसत. इथे आल्यापासुन सगळ्या भाज्या अगदी आवडीने खाल्ल्या जातात. मम्मी दोडक्याच्या अगदी ३-४ प्रकारच्या भाज्या करत असे. त्यातल्या त्यात आवडणारे प्रकार दोन - भरला दोडका आणि दाळदोडका. भरल्या दोदक्याचे पण २ प्रकार, एक कांदा घालुन आणि दुसरा फक्त करळे आणि दाण्याचे कूट वापरुन केलेला. दोडक्याला खुप उग्र मसाले खपत नाहीत असे माझे मत. खुप उग्र चवीची भाजी मला फार आवडत नाही. असेही वाटते की भारतात मिळणारा कांदा पण थोडा कमी उग्र असतो त्यामुळे भाजीत शिजवला की नीट मिसळून जातो आणि कांद्याची वेगळी चव लागत नाही. पण इथे कोणताही कांदा वापरा तो उग्रच लागतो अपवाद शॅलट्सचा. पण घरी नेहेमी शॅलट्स असतीलच असे नाही. त्यामुळे दोडक्याची भाजी करताना मी ही अशीच करते -
Stuffed Ridge Gourd
१/४ किलो दोडका (साधारण ३ मध्यम दोडके येतील)
१/४ कप कारळ्याचे कुट
१/४ कप दाण्याचे कुट
१ टेबल्स्पून कांदा लसूण मसाला (चवीप्रमाणे कमीजास्त करावा)
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
१/२ लहान बॉल एवढी चिंच पाण्यात कोळवुन
साधारण तेवढाच गुळाचा खडा
फोडणीसाठी - १ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता
पाणी साधारण १ ते २ कप
कृती - दोडक्याच्या शिरा काढुन घ्याव्यात आणि त्याचे २-२ इंचाचे तुकडे करावेत. आणि प्रत्येक तुकड्याला भरल्या वांग्याला देतो तशा चिरा द्याव्यात आणि ते तुकडे मिठाच्या पाण्यात १०-१५ मिनीटे बुडवुन ठेवावेत. १५ मिनीटाने ते निथळून घ्यावेत. एका जाड बुडाच्या कढईत किंवा पॅनमधे तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. त्यात दोडक्याच्या फोडी घालून ५ मिनीटे बारीक गॅसवर परतून घ्यावे. त्यावर दाण्याचे कुट, कारळ्याचे कुट, कांदा लसुण मसाला, मीठ घालावे. अजुन १-२ मिनीटे परतावे गॅस अजिबात मोठा करु नये नाहीतर मसाला आणि कुट जळु शकते. त्यावर १ कप पाणी घालुन, झाकुन उकळी आणावी अधुन मधुन दोडके शिजले का पहावे लागेल. अर्धे अधिक शिजले की त्यावर कोथिंबीर, चिंच, गुळ घालावा. गरज असेल तर अजुन थोडे पाणी घालावे. भाजी नीट शिजवून चपाती/भाताबरोबर गरम वाढावी.
टीप -
१. ही भाजी पळीवाढी असते अगदी कोरडी होत नाही. अगदी रस भातावर घेउन खाण्याइतपत पातळ करायला हरकत नाही.
२. कारळ्याचे कूट मिळणार नसेल तर दाण्याचे कुट किंवा दाण्याचे आणि तिळाचे कुट वापरावे.
३. कांदा लसूण मसाला नसेल तर लाल तिखट, काळा मसाला घालावा पण मग एखादी पाकळी लसूण ठेचुन फोडणीत घालायला हरकत नाही.
४. भरलेला दोडका नाव असले तरी दोडक्याच्या फोडीत मसाला भरायची गरज नसते कारण भरलेला मसाला ९९% वेळा पाण्यात मिसळतो आणि दोडके रिकामेच रहातात!

आईग!!!!! मस्त वाटती आहे भाजी. माझी आई आणि बहिण मंगलागौरिचे प्रोग्राम करतात तेव्हा किस बाई किस असतेच........
ReplyDeletekhaugiri, agadi agadi :)
ReplyDeleteMade this today. Totally delicious. Repeat requests are already in. :)
ReplyDeletebtw, I ran out of time to make chincha-koL so I dropped an amsul in, and didn't have karaLe so used sesame seeds.
कालच दोडका घेऊन अाले - नक्की प्रयोग करून बघीन! कृती वाचूनच तोंडाला पाणी सुटलय..
ReplyDeleteET, thank you. Aamsool is a good addition. I will try it next time. Sesame seeds tastes good as well.
ReplyDeleteDesi Knitter, welcome to my blog.
Hey Mints, just thought I should ask you before trying out - would khuskhus work instead of sesame? For some reason I want to try it, because other bhaajis with peanuts/sesame/khuskhus are sort of common, no?
ReplyDeleteI think it will taste good I have not tried actually. Now that yyou mentioned it, I will try soon. I have used khuskhus in Mirchi Ka Salan and tastes great.
ReplyDelete@ET: My Bong roomie adds khuskhus (poshto, for them) in any and every vegetable... never tatses bad. I have eaten doDka made with mustard oil and poshto that she makes. It's pretty good.
ReplyDeleteडाळ-दोडका माहित होता. पण भरला दोडका ही माझ्यासाठी नवीन रेसिपी. सुंदर आहे. फोटो पण छान!
ReplyDeletewow now i am going to try
ReplyDeleteWow khupcha chaan recipe aahe nakki karun baghen
ReplyDeleteKhupch chan recipe aajch karun baghnar
ReplyDelete