अडाई (Adai)
मी अडाई पहिल्यांदा खाल्ली त्याला बरीच वर्षे झाली. मग अचानक विसरून गेले. मग अचानक एका मैत्रिणीकडे खिसलेले गाजर आणि कोबी घातलेले अडाई खाल्ले टोमॅटोच्या चटणीबरोबर आणि मला ते खूपच आवडले. हे तिला सांगितल्यावर अमचे एकदम साटेलोटे ठरले, मी तिला पालक डाळ करुन द्यायची आणि तिने मला अडाई पीठ करुन द्यायचे. हे वर्षभर नीट चालले पण मग ती देशात निघुन गेली आणि मग तिला माझी पालक डाळ मिळेनाशी झाली आणि मला अडाई. मग रेसिपी एक्स्चेंज झाले मी ब्लॉगवर पालक डाळ तिच्यासाठी लिहिली आणि तिने इमेलमधे मला अडाईची रेसिपी पाठवली :) तर तिची ही मस्त रेसिपी लिहुन ठेवायची तर ब्लॉगवरच का नको? म्हणुन मग मी जरा त२-३ वेळा करुन पहिल्यानंतर लिहितेय -
Adai Rolls
१ भाग हरभरा डाळ (चणा डाळ)
१ भाग मूग डाळ (शक्यतो साल असलेली)
१ भाग उडीद डाळ (शक्यतो साल असलेली)
१ भाग तूर डाळ
१ भाग तांदूळ (मी ब्राउन राईस वापरला)
४ लाल सुक्या मिरच्या
२-३ पाकळ्या लसूण
चवीप्रमाणे मीठ
२ टेबल्स्पून खोबरे (सुके/ओले कोणतेही चालेल)
कृती -
सर्व डाळी आणि तांदूळ नीट निवडून धुवुन पाण्यात कमीतकमी ६-७ भिजत ठेवावे. भिजवतानाच त्यात लाल मिरची आणि लसूण घालावा. ६-७ तासानंतर त्यातले पाणी बाजुला काढुन घ्यावे आणि भिजवलेली धान्ये मिक्सरमधे / फूडप्रोसेसरमधे बारीक करावीत. शक्यतो जितके बारीक करता येईल तितके करावे. त्यात गरज लागेल तसे ते धान्य भिजवलेले पाणीच घालावे. शेवटी मीठ आणि खोबरे घालावे. पीठची कन्सिस्टंसी साधारण डोश्याच्या पिठासारखी असते. गरम नॉनस्टिक तव्यावर नेहेमीच्या डोस्यासारखे डोसे करावेत. अडाई नेहेमीच्या डोस्यापेक्षा थोडे जाडसर असतात. चटणीबरोबर खायला द्यावेत.
टीप -
१. अडाई पीठ तयार केल्या केल्या लगेचच करता येतात किंवा पुढे २ दिवसात कधीही करता येतात.
२. पीठ अंबवले नाहीतरी हरकत नाही. पण पीठात खिसलेल्या भाज्या वगैरे घालणार असाल तर मात्र पीठ खुप दिवस ठेवु नये.

Hi Mints, nice idea to roll the adais-- they look so pretty. We love them really thin and lacy too in our house, just the way you made them.
ReplyDeleteDo check out my blog-- I have an award for you. :)
you can have this Adai with avial...they are a good match..nice recipe..
ReplyDelete-mugdha
mugdhajoshi.wordpress.com
Nice Adai recipe Mints. I have had it before at a friends house long time ago. What is the first daal you mentioned? I am not sure since my marathi is not that good. :)
ReplyDeleteAlso, I too have an award for you, possibly the same one that I passed on to Vaishali and she is passing on to you too. :)
Thanks Vaishali, I will get to it soon :)
ReplyDeleteMugdha, I will try it next time :)
Jaya, thanks to you too :) I will get to the award part soon :) and that is Chana daal I will add that in there.
This is extremely protein rich and nutritious. Quick-fix too, if u have the batter ready in the fridge. A keeper recipe indeed.
ReplyDeleteAdai tar kalali pan mag palak dalichi pan recipe dya na plz...
ReplyDeleteArre, hee tar baghitleech navhti! Looks lovely. Do you add carrot and cabbage to the batter just before cooking? Together?
ReplyDeleteWhat is that yellowish chutney in the background (if you remember!)? Looks delicious.
ET, I have used carrots more than cabbage just because of availability at home.
ReplyDeleteYellow chutney in the background might be this one if I remember correctly.
hi, do you have khandeshi edani (of moog) recipe??.
ReplyDeleteGive me few days, I will post it!! Thank you for reminding me to make it too!!
DeleteHi, i am glad that I found you. Thank you so much for sharing all these recipes. When you are new to US and dont know what to cook everyday, when you are getting use to local vegetables n exploring recipes, yet you want that same Aai ni banavlela swad, your recepies really gives me home feeling. Thank you so much. Especially focusing on Maharashtrian food.
ReplyDeleteCan you share one more receipe
How to cook pange, bitte or bati on gas stove with that same coal flavor? This is my favorite food. Its been a decade i haven’t had them.I thought you would be the best person who can answer my long term wish.