घेवड्याची भाजी

English version here - http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/08/ghevadyachi-bhaji.html

मम्मीची ही साधी सोपी रेसिपी आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीची आहे. करायला सोपी, चवीला एकदम झक्कास  मम्मी हि भाजी अशी करते.
Ghevada/Valpapdi (Hyacinth Beans)
पाव किलो घेवड्याच्या शेंगा
१ लहान कांदा
२-३ लसुण पाकळ्या
२-३ टेबलस्पून दाण्याचे कुट
चविप्रमाणे कांदा लसुण मसाला, मीठ
फोडणीसाठी - तेल(२-३ टेबलस्पून), जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
कोथिंबीर
Ghevadyachi Bhaji
कृती: 
१. घेवड्याच्या शेंगांचे कडेचे धागे, दोन्हीबाजुची टोके काढुन टाकावेत. शेंगा उघडून नीट तपसाव्यात कारण यात कधी कधी आळ्या वगैरे असतात.
२. सोललेल्या शेंगा धुवुन निथळून बारिक (१/२ सेंटीमीटर जाडी) कापाव्यात.
३. कांदा बारीक कापावा. लसूण बत्त्याने ठेचुन घ्यावा.
४. तेलात नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यावर मंद आचेवर कांदा परतावा.
५. कांदा परतून झाल्यावर त्यात लसुण घालुन एखादा मिनीट परतावे.
६. त्यावर चिरलेल्या शेंगा घालून साधारण ४-५ मिनीटे परतावे.
७. त्यावर अगदी एखादा पळी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवुन शिजण्यास ठेवावे.
८. अर्धवट शिजले की त्यात कांदा लसूण मसाला घालावा. नीत मिसळावे आणि उरलेली भाजी शिजवावी.
९. पूर्ण शिजल्यावर त्यात दाण्याचे कूट घालून परतावे. कोथिंबीर घालून गरम भाकरी/चपाती बरोबर खावे.

टिपा: 
१. चारधारी घेवडा, काळा घेवडा, वालपापडीच्या शेंगाची अशीच भाजी करता येते.
२. कांदा लसूण मसाला नसेल तर काळा मसाला, लाल तिखट काँबीनेशन देखील वापरता येते.

Bookmark and Share

Comments

  1. दाण्याचा कूट घालून कधी केली नव्हती ही भाजी. आता करून पहायला हवी. छान आहे पाकृ! :-)

    ReplyDelete
  2. Vaishali, Kanda Lasun masala yaat garam masala, kanda, lasun khobare ekatra karun banavalela asato. Recipe ithe paha - http://www.vadanikavalgheta.com/2013/07/kanda-lasun-masala.html

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts