घोळीची भाजी (GhoLichi Bhaji)


देशात घोळीची भाजी ही पावसाळ्यानंतर कधीकधी बाजारात दिसते. इथे मात्र फार्मर्स मार्केट सुरु झाले की हमखास मिळते. याचे इथले एक कॉमन नाव म्हणजे 'Pigweed'

घोळीची भाजी एक जुडी
१/२ वाटी मुगाची डाळ
कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे
तेल, मीठ, दाण्याचे कूट, फोडणीची साहित्य

मुगाची डाळ भिजत घालावी.
घोळूची भाजी निवडून पाने आणि कोवळे देठ घ्यावेत. भाजी धुवुन निथळत ठेवावी.
तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करून त्यात मूगाची डाळ परतावी, किंचीत पाण्याचा हबका मारून झाकण लावून अर्धवट शिजू द्यावी.
धुतलेली भाजी, मीठ, कांदा लसूण मसाला घालून नीट परतावे.
पुन्हा झाकण घालून भाजी नीट शिजवावी .
शेवटी दाण्याचे कूट मिसळून एक वाफ काढावी.

घोळीची भाजी अशी दिसते -

अवांतर माहिती -
आमच्या भागात घोळूची भाजी विकायला फारशी येत नसे पूर्वी . कारण ह्या भाजीची वेगळी लागवड केली जात नाही. शेतात तण म्हणुनच उगवलेले असते तेच शेतकरी काढून आणून भाजी करतो.
भाजीला कधीकधी थोडासा अंबटपणा असतो तसेच भाजीला भेंडीसारखी तार असते पण तेवढ्या प्रमाणात नाही.

ह्याचीच ताकातल्या पालकाप्रमाणे पण भाजी होते. तसेच पातळ डाळमेथी असते तशी पण तुरीच्या डाळीबरोबर शिजवून गरगट्यासारखी भाजी करतात.

या भाजीची माहिती इथे मिळेल - http://en.wikipedia.org/wiki/Portulaca_oleracea

चिवईची भाजी आणि घोळीची भाजी जवळपास सारखी दिसली तरी त्या दोनही वेगळ्या भाज्या आहेत .

Bookmark and Share

Comments

  1. हो, छान चव असते या भाजीला! इथे मिळणारी घोळू स्वच्छ खूप करावी लागते.

    ReplyDelete
  2. Uh oh, I passed off on a bunch of Purslane at the market last weekend because I didn't have ready ideas on what to do with it. It is one of these things that you never actually find when you want, but I will watch out for it because I really want to try this recipe, with your kl masala!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts