आंबट चुक्याची पातळ भाजी (Green Sorrel Maharashtrian Style)
(Link to English Recipe)
भारतात गेले कि वेगवेगळ्या पालेभाज्या खाणे हा एक मोठा कार्यक्रम असतो. इथे खूप नवीन भाज्या मिळता असल्या तरी लहानपणापासून खाल्लेल्या भाज्यांची चव जिभेवरून हलणे शक्य नाही. तिकडे गेले कि सकाळ संध्याकाळ घरीच जेवणे हा माझा मुख्य कार्यक्रम असतो. त्यातलीच हि एक आंबट चुक्याची भाजी. मम्मीने केलेली असेल तर अगदी स्वर्गसुख!
भारतात गेले कि वेगवेगळ्या पालेभाज्या खाणे हा एक मोठा कार्यक्रम असतो. इथे खूप नवीन भाज्या मिळता असल्या तरी लहानपणापासून खाल्लेल्या भाज्यांची चव जिभेवरून हलणे शक्य नाही. तिकडे गेले कि सकाळ संध्याकाळ घरीच जेवणे हा माझा मुख्य कार्यक्रम असतो. त्यातलीच हि एक आंबट चुक्याची भाजी. मम्मीने केलेली असेल तर अगदी स्वर्गसुख!
अंबटचुक्याची एक पेंडी
मुठभर हरबरा डाळ (किंवा तुरीची आणि हरबर्याची निम्मी निम्मी)
मुठभर शेंगदाणे
१-२ लहान चमचे दाण्याचे कूट
लहान खडा गूळ
लाल तिखट
मीठ
गोडा मसाला
२ पाकळ्या लसूण + २ टेबलस्पून खोबर्याचा छोटा गोळा एकत्र वाटून (वगळण्यास हरकत नाही)
फोडणीसाठी - तेल, कढीपत्ता, हिंग, जिरे, मोहरी, हळद, हिंग
पाणी लागेल तसे
कृती -
भाजी निवडून, धुवुन, चिरुन घ्यावी.
डाळ आणि दाणे धुवुन घ्यावेत.
कुकरला डाळ(किंवा डाळी), दाणे, भाजी आणि थोडे पाणी घालून शिजवुन घ्यावे.
शिजलेली भाजी नीट घोटुन घ्यावी.
उभ्या पातेल्यात तेलाची फोडणी करुन घ्यावी. त्यात लसुण खोबर्याचा गोळा घालावा. लगेच वरुन घोटलेली भाजी घालावी.
मीठ, तिखट, मसाला आणि थोडे पाणी मस्त उकळी काढावी.शेवटी गूळ आणि दाण्याचा कुट घालून एक उकळी आणून गरम असताना वाटीत घेउन मस्त ओरपावी.
भाकरी, चपाती, भात कशाहीबरोबर मस्तच लागते.
टीपा-
- ही भाजी नावाप्रमाणे अंबट असते. पाने कडक आणि गोलसर असतात. देठदेखील बरेच मौ सतात. भाजीचे एखादेच पान किडके असते. आणलेल्या जुडीतले अगदी कमी वाया जाते.
- याला मस्त बेझिलसारखे पण लालसर दिसणारे तुरे येतात. याच्या बिया देखील शेवरीच्या कापसासारख्या असतात.
- चुका आणि आळूची एकत्र भाजी करतात कारण आळूमधला खाजरेपणा चुक्यातल्या अंबटपणामुळे जातो. ती भाजी अशी करतात - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/07/blog-post.html
- चुका-चाकवत देखील एकत्र भाजी मस्तच लागते.
- शिजवलेला चुका एकदम मस्त मिळून येतो.
- भाजी शक्यतो मोठ्या उभ्या पातेल्यात करवी कारण खुप उडते भाजी ही :)
Mints, I couldn't agree more-- I do miss those wonderful leafies we ate growing up. My mouth started watering as I read your recipe. Now I wish I could go to India rightaway, or at least make a trip to your home to eat it. :)
ReplyDeleteCool, I brought this vegetable yesterday and was wondering how to prepare it. Thanks for the recipe. I love leafy vegetables:)
ReplyDeleteI brought ambak chuka today..udya banavnar..
ReplyDelete