रव्याचे थालीपीठ
English recipe - http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/12/simple-light-meal-rava-thalipeeth.html
हि माझ्या एका मैत्रिणीची रेसिपी. तिच्याकडून मी बरेच कोकणी पदार्थ शिकले. पटकन होणारी हि थालीपीठे कोकणात सकाळच्या नाष्ट्यासाठी करतात.
१ कप रवा
एखादी कोवळी काकडी (मोठी असेल तर अर्धी)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ कप ओले खोबरे
मुठभर कोथिंबीर चिरुन
चवीप्रमाणे मीठ
पाणी लागेल तसे
कृती -
पाणी वगळून बाकीचे सगळे एकत्र करायचे. लागेल तसे पाणी घालत साधारण भज्याच्या पिठासारखे भिजवायचे. नेहेमीच्या डोश्याच्या पिठाहून हे पीठ घट्ट असते आणि आपल्या भाजणीच्या थालिपीठाहून बरेच सैल असते.
तवा तापत ठेवायचा. त्यावर हाताने साधारण १/४ कप पीठ घालायचे आणि हातानेच पीठ पसरवत थालिपीठासारखे करायचे. गरज लागेल तसे थोडे थोडे पाणी लावत एकसारखे थालीपीठ पसरायचे.
एक बाजू भाजून घ्यायची. उलटवून दुसरी बाजू भाजायची.
गरम गरम थालिपीठ लोण्याबरोबर आणि चटणीबरोबर खायचे.
निस्त्याच्या चटणीबरोबर हे डोसे एकदम भारी लागले.
टीपा -

- गरम तव्यावर थालीपीठे लावणे सुरुवातीला थोडे अवघड गेले तरी सवयीने पटापट जमते.
- कलिगडाचा पांढरा भाग खिसुन घालायला हरकत नाही.
छान सोपी कृती आहे. आवडली!
ReplyDeleteरवा तांदळाचा का गव्हाचा?
ReplyDeleteAbhijit, Thank you :)
ReplyDeleteSharad Nene, गव्हाचा रवा.
Mints! looks so good.
ReplyDeleteWe pigged on these that day didn't we?
She sure is missed a lot.
TC, yes we did!! She is missed dearly!
ReplyDeleteThis looks so delicious, Mints. Desi doesn't like thick pancakes, so I tend not to make uttapa and thalipeeth and such, but I am so tempted after looking at your recipe.
ReplyDelete