खानदेशी लग्नातल्या पंगतीतली वांग्याची भाजी

(Link to English recipe)

लग्नाच्या पंगती आता खेडी सोडली तर जवळपास संपल्यातच जमा झाल्या आहेत असे मला परवा मम्मी सांगत होती. सगळीकडे बफे असतात. ते भरमसाठ जेवण आणि लहान थाळ्या असा सरंजाम घेऊन जेवणे किती अवघड होते असा एकूण बोलण्याचा सूर वाटला. अर्थात तिच्यापरीने तिचे बरोबरच आहे म्हणा! कायम पंगतीला बसून जेवायची सवय असल्यामुळे बफे सिस्टीम अवघड जात असेलच नक्की.
मला आठवतेय आजूबाजूच्या ओळखीच्या लग्नाला गेले कि किती साधा सोप्पा मेनू असायचा. मसालेभात - आमच्या भागात त्याला काळा भात म्हणतात, सोबत वांग्याची भाजी, लिंबू. मुलीकडचे जेवण असेल तर जिलेबी, मुलाकडचे असेल तर बुंदीचे लाडू. असलाच तर मठ्ठा कधीतरी कुणाकडे असेल तर वरण-भात. क्वचित कधीतरी एखादी कोशिंबीर ती पण पहिल्या १-२ पंगतीनंतर पुरली तर ठीक नाही तर संपली. पुरी, बटाट्याची भाजी, श्रीखंड वगैरे मेनू क्वचितच कोणाकडे. कारण खेडेगावात बहुदा संपूर्ण गावाला निमंत्रण असायचे तेव्हा साधे सोपे जेवण केलेले आर्थिकदृष्ट्या आणि एकूणच व्याप पहात सोयीस्कर पडत असावे.
लहान गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात असेच सगळीकडे. अगदी माझ्या सासरी खानदेशात पण पंगतीत अगदी साधे जेवण असते. पण मला विशेष वाटलेली गोष्ट म्हणजे तिथे जेवण वरण - पोळी (चपाती) आणि वांग्याची भाजी. पोळ्यांसाठी कणिक मळून बायकांना घरी लाटण्यासाठी दिली जाते. मग पोळ्या करून बायका लग्नघरी पोचवतात. वांग्याची भाजी अगदी साधी फक्त लसूण, हिरवी मिरची, तेल आणि मीठ घालून केलेली. पश्चिम महाराष्ट्रात देखील वान्ग्याचीच भाजी करत असले तरी करण्याची पद्धत जरा वेगळी. त्यामुळे सामुग्री अगदी सारखीच असली तरी चव मात्र अगदी वेगवेगळी.
खानदेशी पंगतीचे वर्णन पहायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ पहायला विसरू नका :)



आता पाहू ही सोप्पी वांग्याची भाजी कशी करतात. खानदेशात मिळणारी लहान हिरवी वांगी यासाठी वापरली जातात. खूप प्रयत्न केला तर एखादेवेळी मला बरी हिरवी वांगी मिळतात. त्यामुळे मी ही इथे मिळालेल्या जांभळ्या वांग्याचीच ही भाजी नेहेमी करते.

३-४ लहान वांगी
२-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी-जास्त)
३-४ लसूण पाकळ्या
२-३ टेबलस्पून तेल
मुठभर कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
१/२ लिंबू

Vangyachi bhaji

कृती - 
लसून आणि मिरची वाटून एकत्र वाटून घ्या.
वांग्याच्या फोडी करून पाण्यात टाका.
कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापले की वाटलेली लसून-मिरची घाला. किंचित परता.
त्यात वांग्याच्या फोडी पाणी निथळून घाला. नीट परतून झाकण घालून आच बारीक करून ठेवा.
मधून मधून हलवत राहा. गरज असेल तर थोडे पाणी घालायला हरकत नाही. शेवटी मीठ, कोथिंबीर घालून नीट मिसळा.
पळीने अगर मुसळीने भाजी घोटून एकजीव करा.
शेवटी लिंबू पिळून परत एकदा घोटून घ्या.
गरम पोळीबरोबर खा.

टीपा - 
  1. खानदेशात लसूण-मिरचीचा ठेचा लाकडाच्या बडगी-मुसळीत करतात. तीच मुसळी भाजी एकजीव करायला वापरतात.
  2. लहान वांग्याचे थोडे देठ ठेवले तर भाजी चांगली होते असे सगळे म्हणतात पण देठ खाताना तोंडात आलेले आवडत नसतील तर ते काढून भाजी केली तरी चालते. 
  3. लाल भोपळ्याची(गांगाफळ/डांगर)  पण अशीच भाजी करतात. भोपळा गोडसर असल्याने हिरवी मिरची थोडी जास्त घालतात. 
  4. पंगतीत पोळ्या मोडून त्याचा कुस्करा करतात. त्याचे आळे करून त्यात वरण तूप घालून सोबत ही भाजी असे खातात. 

Bookmark and Share

Comments

  1. माझ आजोळ चंद्रपूर जिल्ह्यातलं....
    तुझी पोस्ट वाचून मला गावाची लग्न आठवली...एकूणच सुट्टीत गेल्यावर गावी केलेली मजा पण आठवली....त्यासाठी thanx :)
    आणि ही वांग्याची भाजी तर माझी all टाईम फेवरेट..... पुन्हा एकदा धन्यवाद....

    ReplyDelete
  2. Oh wow, it looks so similar to one of my favorite bhaajis. My version has potatoes, and no lemon/lime, and I don't mash it, but the ingredient list looks so close!: http://evolvingtastes.blogspot.com/2007/10/white-eggplant-and-potatoes-with-garlic.html

    I have to talk to you about that video sometime - I had some questions about that pangat.

    ReplyDelete
  3. :) mast. vangi pahijet changali ga asalya bhajeelaa.

    yogayoga mhanaje mee pan nukateech sangli kadachya vangyachi bhaji lihalelee. :)

    Seema

    ReplyDelete
  4. Supriya, welcome to my blog. And thank you for your lovely comment.

    ET - We do similar eggplant-potato bhaji too and do not mast - that is ghat style :)

    Seema - Please send me link via email :) I would love to see yours :)

    ReplyDelete
  5. सही! पोळ्यांच्या कुस्क-याचे आळे, त्यात तूप, वरण आणि अशी भाजी करून पाहतो एकदा!

    ’कासोटा सुटला’ ...लै भारी! एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स!:-)

    ReplyDelete
  6. minu , aaj reply pahila . pathaweete thodyawelane. :)
    Seema

    ReplyDelete
  7. laii bhari...me proper khandesh jalgaon chi ... i love this vangyachi bhaji, varan poli n pangtitali mirachi.. USA madhe you can use thai eggplant(green n small one which taste more or less khandeshi vange.. Would like to share my grand moms twist... ginger garlic n small green chilli crush karun phodnit ghalavya..ani tyat nantar tyay 1 tsp halad, 1 tsp dhane pwdr, 1tspn garam masala ghalava .. jar khandesh la janar asal tar tikadcch dipak garm masala anayala visru naka .. pangtichya bahjit hach masalA use hoto.. dipak masala vaparlyavar ekdam pangtichi taste yete bhajila..tasech lokhandacha sarata aslyas bhaji kartana to vaparava ani to tyat thoda vel thevava .. bhajila mast taste yete..

    ReplyDelete
  8. माझे बालपण नशिराबाद आणि भुसावळ (जिल्हा जळगाव ) येथे गेले
    हि पोस्ट वाचून मला लग्नाची पंगत, भरीत पार्टी, ची आठवण आली
    तसेच पोकल्याची भाजी, मेहरूण ची बोरे , वरण बट्टी , उक्कड पेंडी,
    दाल ढोकले (कणिकेचे ), कच्च्या केळाची भाजी,शिकरण, शेतातला काळा ऊस
    आठवतात. - Sunil
    ~ http://vegetablefruitscarving.blogspot.com

    ReplyDelete
  9. vangachya phodi 2-3 vela thand panine dhuvavet adrak v kadhipatta takava phodani delevar garam pani takave

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts