लाल माठ / तांदुळजा / राजगिर्याची भाजी
(Link to English Recipe)
माझ्या आजोळी माठ आणि तांदुळजा (तांदळी) भाजी घराच्या मागच्या अंगणात लावलेली असे. घरात बरीच माणसे जेवणारी त्यामुळे सगळ्यांना पुरेल इतक्या प्रमाणात ही भाजी आज्जी लावायची. एकावेळी २-३ वाफे तयार असत. एका वाफयातली आज काढली तर दुसर्या वाफ्यातली २ दिवसांनी असे चक्र चालू असायचे. एकदा लावली की रोज संध्याकाळी पाणी शिंपायचे आणि चक्री पद्धतीने तोडणी करायची. ही भाजी मुळापासून कधी उपटत नसत. फक्त लागेल तसे खुडत जायचे. पाणी घालाल तशी भाजी परत परत येत रहाते. साधारण ३-४ महिन्यांनी तुरे आले की ते तिथेच वाढू द्यायचे. तेच पुढच्या सिझनचे बी. घरची, स्वत: तोडलेली भाजी असल्याने निवडण्यातही फार वेळ जात नसे कोणाचा. इतका साधा सोपा प्रकार रोजही खायला कोणी कंटाळत नसत.
आम्ही शेताजवळ रहात असल्याने आमच्याकडून आजूबाजूचे शेतकरी प्यायला पाणी मागून नेत. आणि संध्याकाळी घरी जाताना ही किंवा अजून कोणती तरी पालेभाजी घरी देऊन जात. त्यामुळे ही भाजी आम्ही बाजारातून फार कमी वेळा आणून खाल्लेली आहे. आता फार्मर्स मार्केट मध्ये मिळते ती आवडीने आणून खाल्ली जाते.
माठाची १ जुडी
४-५ लसूण पाकळ्या
मीठ
तेल
हिरवी मिरची
जिरे, मोहरी - वगळण्यास हरकत नाही
कृती -
माठाची पाने निवडून घ्यावीत. कोवळे दांडे देखील सोलुन घ्यावेत.
स्वच्छ पाण्यात भाजी २-३ वेळा धुवुन घ्यावी.
भाजी चिरुन घ्यावी.
कढईत तेल तापवून घ्यावे. कढई लोखंडाची असेल तर उत्तम. तेलात लसूण, जिरे मोहरी, मिरची चिरुन घालावी. वरुन चिरलेली भाजी घालून मीठ घालावे.
गॅस कमी करुन कढई २-३ मिनीटे झाकून ठेवावी. थोड्यावेळान भाजी नीट मिसळावी.
कोरडी करावी. गरम गरम भाकरी आणि ही भाजी म्हणजे स्वर्गसुख!
आता या भाज्या कशा दिसतात ते पाहूयात -
लाल माठ असा दिसतो
केलेली भाजी अशी दिसते -
तांदुळजा असा दिसतो -
केलेली भाजी अशी दिसते -
राजगिर्याची भाजी अशी दिसते -
तयार भाजी अशी दिसते -
टिपा -

- भाजी अती शिजवू नये.
- मिरची घालणार असाल तर शक्यतो उभी चिरुन घालावी म्हणजे काढुन टाकता येते. कांदादेखील घालता येतो.
- आम्ही हळद / जीरे/मोहरी वगैरे कधी घालत नाही.
- भाकरी झाल्या की त्याच लोखंडाच्या तव्यात ह्या भाज्या फोडणीला घालतात.
where does one get these vegetables? thanks
ReplyDeleteAnon, I get mine from farmers market or from Indian stores. I have seen these in Asian grocery stores as well.
ReplyDeleteNice knowledge thanks so much
ReplyDelete